Numerology Today 6 February 2024 : तुमची जन्मतारीख सांगेल तुमचे भविष्य, आजचा तुमचा लकी नंबर आणि रंग कोणता?
अंकशास्त्रानुसार व्यवसाय, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल. आज तुम्हाला किती लाभाच्या संधी मिळतील? जाणून घेऊया,
Numerology Today 6 February 2024 : आज षटतिला एकदशी आहे. एकादशीच्या अनुषंगाने न्यूमरॉलॉजी (Numerology) अर्थात अंकशास्त्र काय सांगतं, याची माहिती घेऊ या. त्यामुळे एका वेगळ्या बाजूने त्या संदर्भात विचार करणं शक्य होऊ शकेल.अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. अंकशास्त्रानुसार व्यवसाय, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल. आज तुम्हाला किती लाभाच्या संधी मिळतील? चला जाणून घेऊया, जन्मतारखेनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाईल.
मूलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 5 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 5 असेल. परंतु जर तुमचा जन्म 15 किंवा 18 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 1+5 = 6, 1+8 = 9 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 19 असेल, तर 1+9 = 10, 1+0 = 1 असेल, तर व्यक्तीचा मूलांक 1 असेल.
मूलांक 1 - आजचा दिवस शुभ असणार आहे. तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे.अनेक दिवसांपासून असलेल्या समस्या सुटणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. आज ऑफिसमध्ये नव्या सहकाऱ्यांशी ओळख होणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर मित्रांच्या मदतीने आज तुम्हाला नोकरीच्या नव्या संधी मिळतील.
शुभ अंक- 52
शुभ रंग- सिल्वर
मूलांक 2 - तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील तुमच्या समस्या सुटतील. आज नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवी जबाबदारी मिळेल.जीवनत आलेल्या समस्यांना घाबरण्यापेक्षा त्यांना सामोरे जा. उद्याची चिंत करण्यापेक्षा आजचा दिवस जगा. घरात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक समस्या सुटतील.
शुभ अंक- 22
शुभ रंग- ग्रे
मूलांक 3 - नवी जबाबदारी मिळेल. आज मेहनतीने केलेल्या कामाचे फळ मिळेल. मित्रपरिवारासोबत वेळ घालवाल.आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. घरात शुभकार्याचे आयोजन केल्याने पैसे खर्च होतील. व्यावसायिकांनी आज कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा
शुभ अंक- 12
शुभ रंग- हिरवा
मूलांक 4 - आज आर्थिक व्यवहारात व्यस्त राहण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि मित्रांची आज मदत मिळेल. आर्थिक मदत मिळण्याती शक्यता आहे. काही योजना आखत असाल तर त्या पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल.
शुभ अंक- 2
शुभ रंग- क्रीम
मुलांक 5 - आज नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कलागुणांना वाव मिळण्याची शक्यत आहे. ऑफिसमधील राजकारणामुळे तुम्ही व्यथीत होण्याची शक्यता आहे. आज कोणताही आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. कुटुंबातील वादापासून दूर राहा.
शुभ अंक- 15
शुभ रंग- पिवळा
मूलांक 6 - आज तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.व्यवसायात प्रगती होईल. घरात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. वैवाहिक जीवनातील समस्या दूर राहतील.
शुभ अंक- 3
शुभ रंग- गोल्डन
मूलांक 7 - तुमच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. शुभकार्यात येणाऱ्या समस्या दूर होतील. घरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. भाऊ- बहिणीचा सपोर्ट मिळेल. प्रेमसंबध सुधारतील. आर्थिक समस्या दूर होतीस. जुन्या मित्रांची भेट होईल
शुभ अंक- 27
शुभ रंग- वॉयलेट
मूलांक 8 - आज तुमचे मन प्रसन्न राहील. व्यावसायात मोठा नफा मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. भविष्यात मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील.
शुभ अंक- 14
शुभ रंग- लाल
मूलांक 9 - ऑफिसमधील आपली कामगिरी चांगली असणार आहे. व्यावसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींनी तुम्ही भेटवस्तू देण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत आज जास्त वेळ घालवाल.
शुभ अंक- 12
शुभ रंग- लेमन
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)