एक्स्प्लोर

Numerology Today 21 January 2024 : आजचा दिवस 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी अनुकूल; कामाच्या ठिकाणी होईल कौतुक

Numerology Today 21 January 2024 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या.

Numerology Today 21 January 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.

मूलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.

आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.

मूलांक 1

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप भाग्यवान आहे. तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर सुरक्षित प्रवास करा. शैक्षणिक क्षेत्रात आज तुमचा मान-सन्मान मिळेल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे. बरेच दिवसांपासून एखाद्या आजारांनी त्रस्त लोकांची स्थिती सुधारेल.

मूलांक 2

कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 असलेल्या लोकांच्या आयुष्यात आज अनेक बदल घडणार आहेत. मालमत्तेचे कोणत्याही प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. 2 मूलांकाचे विद्यार्थी आज अभ्यासात चांगली कामगिरी करतील आणि त्यांचा नावलौकिक वाढवतील. आज तुम्हाला एखादी चांगली व्यक्ती भेटेल, त्या व्यक्तीशी तुम्ही मन भरुन बोलू शकता.

मूलांक 3

कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम घेऊन आला आहे. तुमच्या लाईफ पार्टनरशी काही मतभेद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवणे चांगले राहील. तुम्हाला कौटुंबिक सदस्याला आर्थिक मदत करावी लागेल, ज्यामुळे आर्थिक परिस्थितीवर परिणाम होईल.

मूलांक 4

कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 असलेल्या लोकांनी आज स्वत:वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तणावमुक्त राहण्यासाठी ध्यान करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीत चढ-उतार असतील. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. जर तुम्हाला कामाचा खूप ताण वाटत असेल तर काही काळ ब्रेक घ्या.

मूलांक 5

कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो.  तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष द्यावं लागेल, तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. आहार बिघडणार नाही याची काळजी घ्या. ऑफिसमध्ये आज तुम्हाला कामाचा जास्त ताण पडेल. घरातील वातावरण तितकं चांगलं नसण्याची शक्यता आहे.

मूलांक 6

कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मालमत्तेचे कोणत्याही प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. 6 मूलांकाचे विद्यार्थी आज अभ्यासात चांगली कामगिरी करतील आणि त्यांचा नावलौकिक वाढवतील. आज तुम्हाला एखादी चांगली व्यक्ती भेटेल, त्या व्यक्तीशी तुम्ही मन भरुन बोलू शकता.

मूलांक 7

कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. तुम्ही कोणत्याही मोठ्या प्रकल्पात गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा. आज किरकोळ आजार वाढू शकतात, त्यामुळे सतर्क राहा. ऑफिसमध्ये प्रलंबित समस्या ओझं ठरू शकते. घरगुती गोष्टी योग्यरित्या हाताळण्याची आवश्यकता पडू शकते.

मूलांक 8

कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चढ-उताराचा असेल. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. आज तुम्हाला अधिक उत्साही वाटेल. तुमचं लव्ह लाईफ रोमँटिक असेल.

मूलांक 9

कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त असणार आहे. काही लोक आज नातेवाईकांना भेटण्यासाठी शहराबाहेर जाऊ शकतात. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही गोष्टींना आज हात लावू नका. आज तुमचा दिवस खर्चिक असेल, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Astrology : 22 जानेवारीला जन्मणाऱ्या मुलांची कुंडली कशी असेल? पालकांचं नशीब पालटणार? जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget