एक्स्प्लोर

Numerology Today 10 January 2024 : आजचा दिवस 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी भाग्याचा; मिळणार चांगलं फळ

Numerology Today 10 January 2024 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या.

Numerology Today 10 January 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.

मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.

आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.

मूलांक 1

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष द्यावं लागेल, तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. आहार बिघडणार नाही याची काळजी घ्या. ऑफिसमध्ये आज तुम्हाला कामाचा जास्त ताण पडेल. घरातील वातावरण तितकं चांगलं नसण्याची शक्यता आहे.

मूलांक 2

कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर सुरक्षित प्रवास करा. शैक्षणिक क्षेत्रात आज तुमचा मान-सन्मान मिळेल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे. बरेच दिवसांपासून एखाद्या आजारांनी त्रस्त लोकांची स्थिती सुधारेल.

मूलांक 3

कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा, तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या सतर्क राहावे लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्यासोबत आनंदाने वेळ घालवाल. काही लोकांना परदेश प्रवासाची संधी मिळू शकते.

मूलांक 4

कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मालमत्तेचे कोणत्याही प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. 4 मूलांकाचे विद्यार्थी आज अभ्यासात चांगली कामगिरी करतील आणि त्यांचा नावलौकिक वाढवतील. आज तुम्हाला एखादी चांगली व्यक्ती भेटेल, त्या व्यक्तीशी तुम्ही मन भरुन बोलू शकता.

मूलांक 5

कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. आज तुम्ही गुंतवणुकीसाठी काही चांगले पर्याय पहा. तुमची संपत्ती वाढवण्यासाठी काही सकारात्मक पावलं उचलण्यात तुम्ही आज यशस्वी व्हाल. आज तुमची तब्येत उत्तम असेल. मालमत्तेचं कोणतंही प्रकरण सामंजस्याने सोडवलं जाईल. दिवस धकाधकीचा जाईल, संध्याकाळची वेळ तुम्हाला दिलासा देणारी असेल.

मूलांक 6

कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चढ-उताराचा असेल. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. आज तुम्हाला अधिक उत्साही वाटेल. तुमचं लव्ह लाईफ रोमँटिक असेल.

मूलांक 7

कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. तुम्ही कोणत्याही मोठ्या प्रकल्पात गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा. आज किरकोळ आजार वाढू शकतात, त्यामुळे सतर्क राहा. ऑफिसमध्ये प्रलंबित समस्या ओझं ठरू शकते. घरगुती गोष्टी योग्यरित्या हाताळण्याची आवश्यकता पडू शकते.

मूलांक 8

कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. काही लोक आज नातेवाईकांना भेटण्यासाठी शहराबाहेर जाऊ शकतात. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही गोष्टींना आज हात लावू नका. आज तुमचा दिवस खर्चिक असेल, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.

मूलांक 9

कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. तुम्हाला तुमच्या आर्थिक गोष्टींवर बारकाईने नजर ठेवण्याची आवश्यकता असू शकते. तुमचं आरोग्य आज चांगलं असेल आणि तुम्हाला उत्साही देखील वाटेल. कुटुंबातील सदस्याशी चांगले वागा. आज तुम्ही लांबचा प्रवास कराल. मालमत्ता खरेदीबाबत तुम्ही गंभीर असू शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Rajyog : जानेवारी महिन्यात अनेक ग्रहांच्या स्थितीत बदल; 'या' राशींना येणार अच्छे दिन

महत्त्वाच्या बातम्या

Deep Amavasya 2026: दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
Ashadh Amavasya 2026: 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget