Numerology Today 1 November 2023 : जन्मतारखेवरुन जाणून घ्या तुमचं आजचं भविष्य; पाहा अंकशास्त्र काय सांगते
Numerology 2023 : अंकशास्त्रात संख्यांच्या मदतीने व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती दिली जाते. मुलांकाद्वारे हे भविष्य समजतं, या आधारे तुमचं आजचं भविष्य जाणून घेऊया.
Numerology Today 31 October 2023 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.
मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
1 - आजचा दिवस सकारात्मकता वाढवणारा आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. व्यवहार करताना खबरदारी बाळगा, तर आज आर्थिक लाभ होण्याची चिन्हं आहेत. आज थोडा तणाव जाणवेल. इतरांशी असलेले नातेसंबंध सुधारतील.
2 - आजूबाजूचं वातावरण चांगलं राहील. आज बुद्धिचा योग्य वापर कराल. व्यवसायात तुम्ही चांगली कामगिरी कराल. आज प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवाल. काही नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. आजचा दिवस नियोजनानुसार नीट पार पडेल. शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतात.
3 - आज तुम्हाला एकही निर्णय नीट घेता येणार नाही. घेतलेले निर्णय अंगलट येतील. कुटुंबात वाद होऊ शकतात. आज कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळतील. इच्छित ऑफर मिळतील. वाईट लोकांची संगत टाळा, खर्चावर नियंत्रणात ठेवा. आज तुमचा दिवस व्यस्त असेल.
4 - आजचा दिवस शुभ आहे. व्यावसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. नोकरीत कामाची जबाबदारी वाढू शकते. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामातील प्रयत्न चांगले राहतील. आज तुम्हाला पगारवाढ मिळू शकते, पण तुमच्या वेतनवाढीमुळे तुमची निराशा देखील होऊ शकते.
5 - आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या ऑफर मिळू शकतात. पण ऑफर आलेली नोकरी योग्य आहे का हे पडताळून पाहा. आजचं आजूबाजूचं वातावरण चांगलं राहील. व्यक्तिमत्व सुधारेल.
6 - आज कौटुंबिक जीवन सुखाचं असेल. कठीण प्रसंगावर सहज मात कराल. काही कौटुंबिक कार्यक्रमाचं आयोजन होऊ शकतं. घरी पाहुण्यांचं आगमन होईल. तुम्ही सर्वांची काळजी घ्याल. फक्त आज रागावर नियंत्रण ठेवा.
7 - आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला असेल. तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडाल. घर किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे. आज मुलांकडे विशेष लक्ष द्या, त्यांचा अभ्यास पाहा. कौटुंबिक जीवनात आज आनंदी असाल. आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
8 - करिअर किंवा व्यवसायात यश मिळेल. आज ऑफिसचं काम चोख पार पाडाल. आज तुम्हाला नवीन कामात रस असेल, कामात बढती मिळू शकते. तुमच्या जोडीदारासोबत आज तुमचा काही कारणास्तव वाद होऊ शकतो.
9 - तुम्हाला मित्रांकडून सहकार्य मिळेल. आज नातेसंबंध चांगले राहतील. तोंडावर ताबा न राहिल्यास मात्र वाद होऊ शकतात. व्यावसायिक लोक प्रगती करतील. नोकरदारांचा आजचा दिवस चांगला जाईल. जोडीदाराशी प्रेम वाढेल. कौटुंबिक जीवन सुखाचं असेल.
(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Kartik Month 2023: कार्तिक महिना सुरू; या पवित्र महिन्यात 'ही' कामं केल्याने होईल भरभराट