![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Numerology : यंदा तुमचं प्रमोशन होणार? 'या' जन्मतारखेच्या लोकांना मिळणार मजबूत पगारवाढ, तर यांच्या पदरी येणार घोर निराशा
Numerology For Promotion : एप्रिल महिना येऊन गेला तरी अजून अनेकांना पगारवाढ मिळाली नसेल, तर अनेकांचं प्रमोशन देखील रखडलं असेल. यंदाच्या वर्षी कोणाला जास्त पगारवाढ मिळणार आणि कुणाच्या पदरी निराशा पडणार? जाणून घ्या
![Numerology : यंदा तुमचं प्रमोशन होणार? 'या' जन्मतारखेच्या लोकांना मिळणार मजबूत पगारवाढ, तर यांच्या पदरी येणार घोर निराशा Numerology regarding appraisal these date of birth people will get promotion and increase in salary know by moolank 1 to 9 ank shastra news marathi Numerology : यंदा तुमचं प्रमोशन होणार? 'या' जन्मतारखेच्या लोकांना मिळणार मजबूत पगारवाढ, तर यांच्या पदरी येणार घोर निराशा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/25/e387cc6466a6622491dcae9168eba4d81714023709309874_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Numerology For Appraisal : आजच्या काळात चांगली आणि सुरक्षित नोकरी मिळवणं हे एक आव्हानच आहे. आता चांगली नोरपी मिळाली तरी त्याच वेळेवर पगारवाढ आणि पदोन्नती मिळते का? हा एक प्रश्नच असतो. सध्या बहुतांश कंपन्यांमध्ये मूल्यांकन प्रक्रिया सुरू आहे, ज्याच्या आधारावर पगारवाढ आणि पदोन्नती ठरवली जाते. पगारवाढ आणि बढती ही कुंडलीतील ग्रहांशी जोडलेली असते.
करिअरसाठी सूर्य आणि गुरू हे दोन ग्रह जबाबदार मानले जातात. कुंडलीत या दोन ग्रहांची स्थिती मजबूत असेल तर नोकरीत भरपूर लाभ मिळतो, पदोन्नती आणि पगारवाढ मिळते. अंकशास्त्र (Numerology) देखील व्यक्तीच्या करिअरबद्दल बरंच काही सांगते. अंकशास्त्रानुसार, कोणत्या जन्मतारखेच्या लोकांना किती पगारवाढ मिळणार? जाणून घेऊया.
पदोन्नती, पगारवाढीचा लाभ कोणत्या जन्मतारखेच्या लोकांना?
मूलांक 1
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 च्या लोकांना या वर्षी अपेक्षित पगारवाढ मिळेल अशी आशा आहे. मूलांक 1 असलेल्या लोकांना या वर्षी चांगली पगारवाढ मिळेल. यावर्षी तुम्हाला केवळ 10 ते 14% मूल्यांकन मिळू शकेल.
मूलांक 2
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 असलेल्या व्यक्तीच्या उत्पन्नात अचानक घट होणार आहे किंवा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागेल. या वर्षी तुम्हाला केवळ 6 ते 9% पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.
मूलांक 3
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 असलेल्या लोकांना यावर्षी चांगली बढती किंवा पगारवाढ मिळू शकते. तुमचे वरिष्ठ आणि सहकारी तुमच्या कामावर खूश आहेत आणि तुम्हाला तुमच्या अपेक्षेनुसार किंवा सरासरीपेक्षा चांगली पगारवाढ मिळेल. या वर्षी तुम्हाला 11 ते 14% पगारवाढ मिळू शकेल.
मूलांक 4
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो.या जन्मतारखेचे लोक अद्याप त्यांच्या कामाच्या ठिकाणी व्यवस्थित जुळवून घेऊ शकलेले नाहीत आणि तुम्हाला त्यांची कार्यशैली नीट समजू शकलेली नाही. तुमचे वरिष्ठ यावर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि या वर्षी तुमचे मूल्यांकन केवळ 7 ते 9% दरम्यान राहण्याची दाट शक्यता आहे.
मूलांक 5
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. यंदा तुम्हाला चांगली पगारवाढ मिळेल. या वर्षी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. मूलांक 5 साठी हे वर्ष आर्थिकदृष्ट्या अनुकूल मानू शकतो. तुम्हाला करिअर वाढीच्या अनेक संधीही मिळतील. यावर्षी तुम्हाला केवळ 9 ते 14% पगारवाढ मिळू शकेल.
मूलांक 6
कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. यंदा तुम्हाला चांगली पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. मूलांक 6 असलेल्या लोकांना प्रमोशन मिळणार आहे आणि तुमच्या पगारात वाढ झाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. या वर्षी तुम्हाला 12 ते 15% पगारवाढ मिळेल.
मूलांक 7
कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. तुमचं मूल्यमापन तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगलं होईल, अशी अपेक्षा आहे. तुमच्या आयुष्यात आर्थिक वाढ आणि स्थिरता येणार आहे. जर तुम्ही चांगल्या पगारवाढीची अपेक्षा करत असाल तर तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. तुमचं मूल्यांकन खूप चांगलं होईल, असे संकेत आहेत.
मूलांक 8
कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल आणि तुमची पगारवाढ चांगली होणार आहे. एकंदरीत तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. मूल्यांकन अपेक्षेपेक्षा जास्त होईल. करिअरच्या विस्तारासाठीही भरपूर संधी मिळतील. या वर्षी तुम्हाला 11 ते 15% मूल्यांकन मिळू शकतं.
मूलांक 9
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 च्या लोकांचे वरिष्ठांशी संबंध अनुकूल नसतात आणि परिणामी तुम्हाला पगारवाढीत त्रास सहन करावा लागू शकतो. तुम्हाला या वर्षी फक्त 9 ते 11% च्या दरम्यान पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)