एक्स्प्लोर

Numerology :'या' जन्मतारखेच्या लोकांना प्रेम प्रकरणांत मिळत नाही यश; प्रेमाच्या बाबतीत असतात कमनशिबी, खरं प्रेम मिळणं तर अवघडच

Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेच्या लोकांना खरं प्रेम मिळत नाही. प्रेमाच्या बाबतीत या लोकांचं नशीब अत्यंत खराब असतं.

Numerology Of Mulank 5 : अंकशास्त्रात प्रत्येक जन्मतारखेला जन्मलेल्या व्यक्तीशी संबंधित विशेष गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व, स्वभाव आणि भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून कळू शकतं. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन (Numerology) त्या व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी समजतात. तर आज आपण मूलांक 5 असलेल्या व्यक्तींबद्दल जाणून घेऊया.

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 5 असते. 5 या मुलांकाचा स्वामी बुध आहे. 5, 14 किंवा 23 जन्मतारखेला जन्मलेले व्यक्ती खूप हुशार, धाडसी आणि मेहनती असतात. परंतु त्यांना खरं प्रेम मिळत नाही. या मूलांकाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.

प्रेम प्रकरणात लवकर यश मिळत नाही

मूलांक 5 चे लोक आयुष्यात खूप काही मिळवतात, पण प्रेमसंबंधांच्या बाबतीत ते खूप कमनशिबी असतात. या लोकांचे प्रेमसंबंध फार काळ टिकत नाहीत. छोट्या-छोट्या मुद्द्यांवरून ते त्यांच्या जोडीदाराशी वाद घालत राहतात आणि त्यांचं नातं फार काळ टिकत नाही. खऱ्या प्रेमासाठी त्यांना बराच काळ वाट पाहावी लागते. 

सहज मित्र बनवणं यांना जमतं

हे लोक अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे असतात आणि कोणाशीही सहज मैत्री करतात. त्यांच्यातील गुणांमुळे हे लोक इतरांना त्यांच्याकडे सहज आकर्षित करतात.  5, 14 किंवा 23 जन्मतारखेच्या लोकांना नवीन लोकांना भेटायला आवडतं. हे लोक कोणत्याही परिस्थितीशी सहज जुळवून घेतात.

जोखीम घेण्यास घाबरत नाहीत 

या लोकांची कल्पनाशक्ती अप्रतिम असते. हे लोक कला, संगीत किंवा लेखन यासारख्या क्षेत्रात यशस्वी होतात. हे लोक जोखीम घेण्यास घाबरत नाहीत आणि नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी नेहमी तयार असतात.

आत्मविश्वासाने भरलेले असतात या जन्मतारखेचे लोक

 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक आत्मविश्वासाने भरलेले असतात आणि ते कोणत्याही गोष्टीत सहज यश मिळवतात. हे लोक जन्मजात जिज्ञासू असतात आणि नवीन गोष्टी शिकण्याची ओढ त्यांना असते. मूलांक 5 च्या व्यक्तींची स्मरणशक्ती खूप तीक्ष्ण असते आणि त्यांना गोष्टी लवकर समजतात.आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हे लोक त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती करतात.

फिरण्याचे शौकिन असतात हे लोक

मूलांक 5 च्या लोकांना नेहमी कोणत्या न कोणत्या कामात व्यस्त रहायला आवडतं. त्यांना खूप फिरायलाही आवडतं आणि ते एकाच ठिकाणी थांबत नाहीत, सतत प्रवास करत राहतात. मूलांक 5 च्या लोकांची ऊर्जा पातळी खूप जास्त आहे आणि त्यांना थकवा जाणवत नाही.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांना मिळते सरकारी नोकरी; साधेसुधे नाही, थेट सरकारी अधिकारी बनतात हे लोक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Women's Day Wishes 2026 : जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांवर करा शुभेच्छांचा वर्षाव; पाठवा 'हे' हटके मेसेजेस
जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांवर करा शुभेच्छांचा वर्षाव; पाठवा 'हे' हटके मेसेजेस
Horoscope Today 8 March 2026: आजचा रविवार दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने अडचणींतून सुटका, आजचे राशीभविष्य वाचा..
आजचा रविवार दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने अडचणींतून सुटका, आजचे राशीभविष्य वाचा..
Weekly Numerology: मार्चचा दुसरा आठवडा...'या' जन्मतारखांचं राज्य! आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट, कोणत्या जन्मतारखांनी सावध राहावं? अंकशास्त्र
मार्चचा दुसरा आठवडा...'या' जन्मतारखांचं राज्य! आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट, कोणत्या जन्मतारखांनी सावध राहावं? अंकशास्त्र
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, लक्ष्मीच्या पावलांनी घरात येणार पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, लक्ष्मीच्या पावलांनी घरात येणार पैसा; साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget