Numerology Of Mulank 4 : खरं बोलणं टाळतात 'या' जन्मतारखेच्या मुली; नेहमीच घेऊन फिरतात सत्याचा मुखवटा
Numerology Of Mulank 4 : अंकशास्त्रानुसार, ज्या महिलांचा, मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला झाला आहे.

Numerology Of Mulank 4 : वैदिक ज्योतिष शास्त्रात ज्याप्रमाणे राशीभविष्याला महत्त्व आहे. त्याचप्रमाणे अंकशास्त्राला (Ank Shastra) देखील महत्त्व आहे. जसा राशींनुसार (Zodiac Signs) माणसाचा स्वभाव ओळखता येतो. त्याचप्रमाणे अंकशास्त्रानुसार, माणसांचा स्वभाव, त्यांच्यातील गुण, अवगुण ओळखता येतात. अंकशास्त्रानुसार, ज्या महिलांचा, मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक 4 (Mulak) असतो. त्यानुसार आज आपण मूलांक 4 विषयी जाणून घेऊयात.
खरंतर मूलांक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे. राहू ग्रह प्रचंड रहस्यमयी आहे. त्यानुसार, या जन्मतारखेच्या महिला फार रहस्यमयी स्वभावाच्या असतात. त्यांच्याशी बोलून यांचा कल नेमका कोणत्या दिशेला जाणारा आहे याबाबत अंदाज लावता येत नाही.
कसा असतो मूलांक 4 च्या महिलांचा स्वभाव?
मूलांक 4 च्या महिला फार रहस्यमय स्वभावाच्या असतात. तसेच, कर्मठ, प्रामाणिक असतात. राहू ग्रहाप्रमाणेच या महिला गूढ, स्वतंत्र विचारांच्या आणि आत्मविश्वासू असतात. यांच्या डोक्यात कधी काय चालेल याचा अंदाज लावता येत नाही. तसेच, या जन्मतारखेच्या महिला सहजा सहजी आपल्या भावना कोणाशी शेअर करत नाहीत. यांना ज्यावेळी जे योग्य वाटतं ते त्या करतात. थोडक्यात आपल्या मनाच्या मालकीण असतात.
कठीण काळातही सोडत नाहीत हिंमत
मूलांक 4 असणाऱ्या महिला कधीच कोणाची खोटी स्तुती करत नाहीत. तसेच, आपल्या मनात जे काही चाललंय ते त्या स्पष्ट बोलतात. त्यांचा हाच स्पष्टवक्तेपणा अनेकदा नात्यात दुरावा निर्माण करतो. मात्र, या महिला कधीच माघार घेत नाहीत. उलट कठीण काळातही या हिंमत सोडत नाहीत.
फार जिद्दी असतात
या जन्मतारखेच्या महिला फार जिद्दी स्वभावाच्या असतात. मात्र, अनेकदा या महिला आपल्या भावना इतरांशी शेअर करत नाहीत. त्यामुळे अनेकदा यांच्या वैवाहिक जीवनात फार अडचणी निर्माण होतात. भावना व्यक्त करत नसल्यामुळे यांना खोटं बोलावं लागतं. अनेकदा लोक यांचं खोटं वागणं पकडतातही त्यामुळेच यांच्यावर विश्वास पटकन ठेवता येत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















