Numerology : प्रचंड ऊर्जावान आणि साहसी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; आपल्या कर्तृत्वावर हवं ते करतात साध्य
Numerology Mulank 9 : अंक शास्त्रानुसार, मूलांक 9 हा अनेक अर्थांनी खास आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला झाला आहे त्या लोकांचा मूलांक 9 असतो.
Numerology Mulank 9 : अंक शास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तित्वाचा संबंध त्यांच्या जन्माची वेळ आणि तारखेशी संबंधित आहे. राशीभविष्यानुसार, अंकशास्त्रात (Numerology) 1 ते 9 अंकाला मूलांक म्हटलं जातं. त्यानुसार, प्रत्येक व्यक्तीचा मूलांक व्यक्तीच्या जन्मतिथीनुसार असतो. आज आपण अशाच एका मूलांकाबद्दल जाणून घेणार आहोत.
अंक शास्त्रानुसार, मूलांक 9 हा अनेक अर्थांनी खास आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला झाला आहे त्या लोकांचा मूलांक 9 असतो. या मूलांकावर साहस आणि पराक्रमाचा कारक असलेल्या मंगळ ग्रहाचं अधिराज्य असतं. त्यामुळे या जन्मतारखेचे लोक मंगळ ग्रहाने प्रभावित असतात. चला तर जाणून घेऊयात मूलांक 9 ची खासियत.
कसा असतो यांचा स्वभाव?
ज्योतिष शास्त्रानुसार, 9, 18 आणि 27 या जन्मतारखेचे लोक फार साहसी , परिश्रमी आणि ऊर्जावान असतात. या लोकांना हसणं, चेष्टा करायला फार आवडते. यामुळेचे हे लोक आपल्या मित्रपरिवारातही प्रचंड लोकप्रिय असतात. पण,मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्या कारणाने या लोकांना राग देखील फार लवकर येतो. या जन्मतारखेचे लोक प्रचंड शिस्तीचे असतात. यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की, कोणतंही संकट आलं तरी हे लोक घाबरून मागे हटत नाहीत. तर, त्या समस्येचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करतात.
कसं असतं करिअर?
ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 9 असणारे लोक खेळ, आर्मी, पोलिस सेवा या क्षेत्रात चांगलं प्रदर्शन करू शकतात. सुरुवातीला या लोकांना थोडा संघर्ष करावा लागतो. पण, आपल्या दृढ इच्छा शक्तीच्या बळावर हे लोक आयुष्यात यश निर्माण करतात.
लव्ह-लाईफ कशी असते?
लव्ह लाईफच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, मूलांक 9 च्या लोकांची लव्ह-लाईफ फारशी चांगली नसते. यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. राग आणि अहंकारामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर या जन्मतारखेच्या लोकांना वैवाहिक जीवनातही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
आर्थिक स्थिती कशी असते?
अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असते. वडिलोत्पार्जित संपत्तीचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. तसेच, आपल्या धन-संपत्तीचा कसा वापर करायचा हे या लोकांना चांगलंच ठाऊक असतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: