Numerology 25 December 2023 : नाताळच्या दिवशी 'या' जन्मतारखेचे लोक करणार चांगली कामगिरी; आजचा दिवस आनंदी, तुमचं आजचं भविष्य काय?
Numerology 25 December 2023 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या.
![Numerology 25 December 2023 : नाताळच्या दिवशी 'या' जन्मतारखेचे लोक करणार चांगली कामगिरी; आजचा दिवस आनंदी, तुमचं आजचं भविष्य काय? Numerology 25 December 2023 future by date of birth ank shastra ank jyotish Numerology 25 December 2023 : नाताळच्या दिवशी 'या' जन्मतारखेचे लोक करणार चांगली कामगिरी; आजचा दिवस आनंदी, तुमचं आजचं भविष्य काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/4adb390031d900a9962c0f7f4e6b1c201685007437895223_1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Numerology 25 December 2023 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.
मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
मूलांक 1
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. मूलांक 1 च्या लोकांना लव्ह लाईफमध्ये काही धक्का बसू शकतो. तुमच्या प्रेमसंबंधांत तणाव निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला थोडे सावध राहावे लागेल. प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवताना तुम्ही दोनदा विचार करावा. तुम्ही सर्वांवर विश्वास ठेवू नका.
मूलांक 2
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. या लोकांसाठी त्यांचे जुने छंद पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जायचे असेल तर तुमचे मत स्पष्टपणे मांडायला शिका. घरी आई-वडील आणि भावंडांसोबत आज मज्जा कराल.
मूलांक 3
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. या आठवड्यात बचत कमी होण्याचे संकेत आहेत. आर्थिक समस्या देखील असू शकतात, म्हणून आधीच बॅकअप योजना तयार करा. आज कोणत्याही निरुपयोगी गोष्टींमध्ये अडकू नका. या आठवड्यात कुटुंबात काही चांगली बातमी मिळू शकते. ऑफिसमध्ये दुप्पट मान मिळेल.
मूलांक 4
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 च्या लोकांनी आज पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नये, अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागेल, त्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे. कार्यालयात बदल संभव आहे. परीक्षेत उत्तम यश मिळू शकते. घरामध्ये शुभ कार्ये होतील.
मूलांक 5
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. तुम्ही खूप मेहनत करत आहात, पण तुम्हाला गोष्टी सकारात्मक होताना दिसत नाहीत, त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टींची कमतरता भासत आहे त्यांची यादी बनवा. कौटुंबिक समस्या सोडवण्याची संधी मिळेल. आज ऑफिसमध्ये मान-सन्मान वाढेल.
मूलांक 6
कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. आज तुम्हाला शांतता आणि संयम राखण्याची गरज आहे. मात्र, जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायात लाभ होईल. कोणत्याही कामाच्या चांगल्या-वाईट बाजू न तपासता घाईघाईने कोणतेही काम करू नका.
मूलांक 7
कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. आज तुमच्यावरील कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायात आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.आर्थिक स्थिती सुधारेल आणि शैक्षणिक कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
मूलांक 8
कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 च्या लोकांनी भावनिकता टाळा. स्वत:वर नियंत्रण ठेवा. आज तुमचे मन जास्त खर्चामुळे अस्वस्थ राहू शकते. प्रेमसंबंध सुधारतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या बॉसकडून तुम्हाला तुमच्या कामाची प्रशंसा मिळेल. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल, परंतु आज चैनीच्या वस्तूंची खरेदी टाळा.
मूलांक 9
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 च्या लोकांसाठी आज तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे यशस्वी होतील आणि कामातील अडथळे दूर होतील. गुंतवणुकीच्या नवीन संधी आणि उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Somvar Upay : आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सोमवारी करा 'हे' उपाय; नांदेल सुख-समृद्धी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)