Navratri Navami 2022: महानवमीला शनीची आशीर्वाद मिळण्यासाठी बनतोय खास योगायोग, 'या' मंत्राचा जप अवश्य करा
Navratri Navami 2022: शनीची महादशा असलेल्या राशीच्या लोकांसाठी देवी दुर्गा आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळावा यासाठी महानवमीचा हा विशेष दिवस आहे.
Navratri Navami 2022: सध्या शारदीय नवरात्र(Navratri 2022) सुरू आहे. नवरात्रीची महानवमी 4 ऑक्टोबरला येत आहे. तसेच मंगळवार हा विशेष दिवस आहे. ज्या लोकांना शनीची महादशा, साडेसाती आणि ढैय्यामुळे सतत त्रास होत असेल त्यांच्यासाठी हा दिवस खूप शुभ असणार आहे. नवरात्रीची महानवमी आणि शनीची कृपा अनेक राशींच्या जीवनातील शनीचा अशुभ प्रभाव कमी करू शकतो. शनिवार हा शनिदेवाला समर्पित मानला जातो. ग्रहांचा अधिपती असलेल्या शनिदेवाची सध्या काही राशींवर तिरकी नजर आहे. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या महानवमीला दुर्गा देवीची पूजा केल्यास आणि शनिदेवाशी संबंधित उपाय केल्यास दोन्ही देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. अशा परिस्थितीत शनीच्या महादशा त्रस्त असलेल्या राशीच्या लोकांसाठी देवी दुर्गा आणि शनि महाराजांचा आशीर्वाद मिळावा यासाठी हा विशेष दिवस आहे.
नवरात्रीची नवमी कधी आहे?
शारदीय नवरात्रीची नवमी तिथी 3 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 4:37 वाजता सुरू होत आहे. 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2:20 वाजता संपेल. तिथीनुसार, नवरात्रीची नवमी 4 ऑक्टोबर 2022 रोजी साजरी केली जाईल. हा दिवस शारदीय नवरात्रीची महानवमी आहे. या दिवसाचे विशेष धार्मिक महत्त्वही सांगण्यात आले आहे. महानवमीचे पुण्य पौराणिक ग्रंथांमध्येही तपशीलवार वर्णन केले आहे. हिंदू पंचागानुसार, नवरात्रीच्या उपवासाची वेळ यावेळी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 02:20 नंतर असेल.
'या' राशींवर शनीची साडेसाती
यंदा दसरा हा पवित्र सण 5 ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. यावेळी मकर, कुंभ, धनु राशीमध्ये शनीची साडेसाती सुरू आहे आणि मिथुन, तूळ राशीमध्ये शनीची ढैय्या सुरू आहे. शनीची साडेसाती आणि ढैय्यामुळे व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
नवमीच्या दिवशी 'या' मंत्राचा करा जप
नवरात्रीच्या महानवमीला स्मरण केला जाणारा ''ऊं ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाऐ विच्चे'' हा एक शक्तिशाली मंत्र आहे. या मंत्राविषयी असे म्हटले जाते की याच्या प्रत्येक अक्षराचा देवी आणि ग्रहांशी थेट संबंध आहे, या मंत्राचे तीन देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन देवता आहेत. हा मंत्र दुर्गा माता, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या नऊ शक्तींच्या प्राप्तीसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. ग्रहांच्या संबंधामुळे या मंत्राचा जप केल्याने शनिदेवाची कृपा होण्यास मदत होते. त्यामुळे या दिवशी या मंत्राचा जप किमान तीन वेळा करावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या
- Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत
- Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय