Narali Purnima 2024 : उद्या नारळी पौर्णिमेचा सण...जाणून घ्या अचूक पूजा, विधी आणि शुभ मुहूर्ताची वेळ
Narali Purnima 2024 : नारळी पौर्णिमेच्या वेळी भक्त वरुण राजाची पूजा करतात. भक्त वरुणराजाला नारळ अर्पण करतात आणि त्याचा आशीर्वाद मागतात.भक्त वरुण राजाची पूजा करतात आणि शांत पाणी मागतात.
Narali Purnima 2024 : विविध सणांचा, उत्सवाचा आणि आनंदाचा असा श्रावण (Shravan) महिना सुरु झाला आहे. या महिन्यात अनेक सण-समारंभ साजरे केले जातात. त्याचबरोबर रक्षाबंधन (Raksha Bandhan) आणि नारळी पौर्णिमेचा (Narali Purnima) सण देखील याच महिन्यात साजरा केला जातो. हिंदू धर्मात, नारळी पौर्णिमेला फार महत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण अगदी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
नारळी पौर्णिमेच्या वेळी कोळीबांध वरुण राजाची म्हणजेच दर्या राजाची पूजा करतात. भक्त वरुण राजाला नारळ अर्पण करतात आणि त्याचा आशीर्वाद मागतात. भक्त वरुण राजाची पूजा करतात आणि शांत पाणी मागतात.
नारळी पौर्णिमा 2024 तारीख आणि वेळ (Narali Purnima Date And Time 2024)
नारळी पौर्णिमा 2024 तारीख : 19 ऑगस्ट 2024
पौर्णिमा तिथीची सुरुवात : 03:04 AM, 19 ऑगस्ट 2024
पौर्णिमा तिथी समाप्ती : 11:55 PM, 19 ऑगस्ट 2024
या शुभ मुहूर्तावर नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे.
नारळी पौर्णिमा पूजा विधी 2024 (Narali Purnima 2024)
नारळी पौर्णिमेला, हिंदू भक्त समुद्र देव वरुण यांना आदराचे प्रतीक म्हणून नारळ अर्पण करतात. या दिवशी ते उपवास करतात. तसेच सागरी धोक्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. महाराष्ट्रात कोळी बांधव यादिवशी श्रावणी उपकर्म व्रत पाळतात. यादिवशी ते धान्य वर्ज्य करून फलहार करतात. या दिवशी कोळी बांधव निसर्ग मातेच्या कौतुकाचे प्रतीक म्हणून, नारळाची झाडे किनाऱ्यावर लावतात.
पूजा विधींनंतर, मच्छिमार त्यांच्या सुशोभित केलेल्या बोटीतून लहान प्रवासाला निघतात. तसेच थोड्या अंतरावर गेल्यानंतर पुन्हा उत्सवांचा आनंद घेण्यासाठी किनाऱ्यावर परततात. या प्रसंगाच्या स्मरणार्थ, नारळापासून बनवलेला एक खास गोड पदार्थ तयार केला जातो आणि तो देवाला अर्पण केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटला जातो.
नारळी पौर्णिमेचे पारंपरिक खेळ
नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक कोळीवाड्यात पारंपरिक खेळ खेळण्याची देखील प्रथा आहे. या सर्वात प्रसिद्ध खेळ म्हणजे नारळ फोडणे. हातात नारळ घेऊन तो एकमेकांवर आपटून फोडण्याची कोळीवाड्यात फार जुनी प्रथा आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: