Mercury Transit 2024 : 10 मे पासून 'या' राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू; बुधाचा मेष राशीत प्रवेश, संपत्तीत होणार बक्कळ वाढ
Mercury Transit 2024 : बुध ग्रह लवकरच मेष राशीत मार्गक्रमण करणार आहे, ज्यामुळे काही राशीचं नशीब पालटेल. या राशींचा चांगला काळ 10 मे पासून सुरू होणार आहे, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या
Budh Gochar In Aries : वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध (Mercury) हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. बुध हा एक महिन्यानंतर राशी परिवर्तन करतो. बुध ग्रह 10 मे रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे, ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण या काळात अशा 3 राशी आहेत, ज्यांचं नशीब चांगलंच उजळू शकतं. या राशींची करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया
धनु रास (Sagittarius)
बुध ग्रहाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मे ते जून या काळात तुमचं नशीब पालटेल. या वेळी तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच, या राशीचे लोक या काळात बक्कळ पैसा कमावतील आणि तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता देखील आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. जर तुमचे प्रेमसंबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकतं. तुम्ही विद्यार्थी दशेत असाल तर तुम्हाला एखाद्या नावाजलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो.
मकर रास (Capricorn)
बुधाचं संक्रमण होताच तुमचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल. तसेच, या काळात तुम्ही कोणतेही वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्ही या काळात सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकाल आणि अनेक उत्तम संधी तुमच्या वाट्याला येतील. तुमच्या कुटुंबात सुख-समृद्धी वाढेल. तसेच, यावेळी तुम्ही एखादा छोटा-मोठा प्रवास करू शकता, जो तुमच्यासाठी शुभ ठरेल. या काळात तुमच्या कुटुंबात देखील सुख-शांती नांदेल.
कर्क रास (Cancer)
बुध राशीतील बदल तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण या संक्रमणाचा परिणाम तुमच्या करिअर आणि व्यवसायावर होणार आहे. त्यामुळे यावेळी तुमचे काम आणि व्यवसाय चमकतील. तसेच, नोकरदार लोकांना त्यांच्या नोकरीत बढती किंवा वाढ मिळण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. यावेळी व्यावसायिकांना चांगला आर्थिक लाभ होईल. तसेच, यावेळी मोठा व्यवसाय करार होऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :