May 2026 Monthly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी मे महिना चांगला की वाईट? कोणत्या राशींना लागणार लॉटरी? मासिक राशीभविष्य
May 2026 Monthly Horoscope : आपल्यासाठी नवीन मे महिना कसा असेल? याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. यासाठीच या ठिकाणी आपण तूळ ते मीन राशींचं मासिक राशीभविष्य जाणून घेणार आहोत.

May 2026 Monthly Horoscope : एप्रिल (April 2026) महिना संपून उद्यापासून मे (May 2026) महिन्याला सुरुवात होणार आहे. मेचा महिना अनेक आव्हानं आणि शुभवार्ता घेऊन येणार आहे. त्यामुळे आपल्यासाठी नवीन महिना कसा असेल? याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. यासाठीच या ठिकाणी आपण तूळ ते मीन राशींचं मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेणार आहोत.
तूळ रास (Libra May 2026 Monthly Horoscope)
तूळ राशींसाठी मेचा महिना भाग्यशाली असणार आहे. या कालावधीत तुमचं आयुष्य संतुलित तसेच स्थिर असेल. कोणत्याच गोष्टीसाठी तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, नातेसंबंधांत थोडेसे खटके उडू शकतात. अशा वेळी संयमाने गोष्टी हाताळा. जर तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे. महिन्याच्या मध्यात तुम्हाला नोकरीच्या बाबतीत शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास (Scorpio May 2026 Monthly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी मेचा महिना मिश्रित स्वरुपाचा असणार आहे. या कालावधीत भविष्याशी संबधित तुम्ही अनेक योजना राबवाल. त्या पूर्णही करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या बाबतीत तुम्हाला समाधान लाभेल. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लवकरच लग्नाचे प्रस्ताव येतील. नवीन सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला घेता येईल. पैशांच्या बाबतीत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कोणालाही पैसे उधार म्हणून देऊ नका.
धनु रास (Saggitarius May 2026 Monthly Horoscope)
धनु राशीसाठी मेचा महिना सामान्य असणार आहे. या महिन्यात तुम्हाला खूप काही गोष्टी साध्य करायच्या आहेत. तसेच, स्वत:ला सिद्ध देखील करायचं आहे. त्यामुळे तुमच्या कामातून, तुमच्या वागण्यातून तुमचा परफॉर्मन्स दाखवा. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. तसेच, कोणाकडूनही पैसे उधारी घेऊ नका. आणि कोणाला देऊही नका. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल अशा गोष्टी शिका. व्यवसायात तुम्हाला चांगल्या ऑर्डर्स मिळतील. मात्र, त्यासाठी संयम गरजेचा आहे.
मकर रास (Capricorn May 2026 Monthly Horoscope)
मकर राशींच्या बाबतीत मेचा महिना चढ-उतारांचा असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेलच असं नाही. त्यामुळे तुम्हाला नैराश्य येऊ शकतं. अशा वेळी खचून जाऊ नका. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. स्वत:वर विश्वास ठेवा. तसेच, जे अविवाहित आहेत त्यांच्या नात्यात गोडवा टिकून राहील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
कुंभ रास (Aquarius May 2026 Monthly Horoscope)
कुंभ राशीसाठी मे महिना काहीसा आव्हानात्मक असणार आहे.या काळात पैशांच्या बाबतीत तुम्हाला सावधानता बाळगायची गरज आहे. कोणालाही पैसे देऊ नका. तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहा. जर तुम्हाला नवीन घर किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ योग्य नाही. त्यामुळे संयम ठेवा. ग्रहांच्या स्थितीत शुभ परिणाम दिसल्यावर महत्त्वाची कामे हातात घ्या. काही निर्णय वेळेवर आणि परिस्थितीवर सोडून द्या.
मीन रास (Pisces May 2026 Monthly Horoscope)
मीन राशीसाठी उद्यापासून सुरु होणार मे महिना सामान्य असणार आहे. या कालावधीत तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकता येतील. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, मुलांच्या सुट्ट्या असल्या कारणाने प्रवासाचे योग जुळून येणार आहे. सुट्टीचा छान आनंद घ्या. मात्र, महिन्याच्या मध्यात पुन्हा करिअरवर फोकस करा. ध्येय गाठण्याची जिद्द मनात ठेवा. नवीन व्यवसायाची सुरुवात तुम्ही करु शकता. घरातील वातावरण देखील आनंदी राहील. महिन्याच्या शेवटी एखादी शुभवार्ता मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
May 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी उद्यापासून सुरु होणारा मे महिना कसा असेल? कोणत्या 3 राशींचं नशीब पालटणार? मासिक राशीभविष्य



















