एक्स्प्लोर

Mauni Amavasya 2023 : मौनी अमावस्येला 'या' राशीच्या लोकांचे नशीब उजळणार, शनिदेवाच्या कृपेने होतील सर्व अडथळे दूर 

Mauni Amavasya 2023 : मौनी अमावस्येदिवशी गंगास्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी मौन धारण करून जप आणि तपश्चर्या केली जाते.

Mauni Amavasya 2023 : दर महिन्याला अमावस्या येत असते. परंतु, यातील मौनी अमावस्येला वेगळं महत्व आहे. या वर्षातील मौनी आमास्या आज म्हणजेच 21 जानवारी रोजी आहे. आजच्या दिवसापासून काही राशींचे भाग्य उजळणार आहे. नशीब या राशींना एवढी साथ देईल ती आजपासून या राशीच्या लोकांच्या आयुष्यतील प्रत्येक गोष्ट यशस्वी होईल.  

मौनी अमावस्ये दिवशी गंगास्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी मौन धारण करून जप आणि तपश्चर्या केली जाते.  मौनी अमावस्येला भगवान विष्णू आणि शिवाची पूजा केल्याने मोक्षाचा मार्ग खुला होतो अशी श्रद्धा आहे. आजपासून काही राशींचे नशीब चमकणार आहे. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल. 

मेष : तुमच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडणार आहेत. तुम्हाला लाभ आणि बक्षिसे दोन्ही मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला चांगल्या स्तरावर नफा मिळेल. नोकरीच्या ठिकाणीही प्रगती होऊ शकते. शनिदेवाची कृपा तुमच्यावर होणार आहे आणि तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. शुभ ग्रहांच्या प्रभावाने तुम्हाला प्रत्येक कामात चांगले फळ मिळेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांनाही यश मिळण्याची शक्यता आहे. 

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी उत्तम योग बनत आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडाल. घरात आणि बाहेर सर्वत्र तुमचा आदर वाढेल. सद्यपरिस्थितीत तारे पूर्णपणे तुमच्या बाजूने आहेत. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये वेगाने यश मिळवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश मिळेल. या काळात तुम्हाला तुमच्या पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळही मिळेल. 

सिंह : सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. जवळच्या नातेवाईकांची अचानक भेट होऊ शकते. तुम्हाला चंद्रदेवांचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप शांत व्हाल. येणाऱ्या प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीसाठी स्वतःला आधीच तयार करणे तुमच्यासाठी चांगले राहील. चांगले परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या वडिलांचे सहकार्यही घ्याल.

वृश्चिक : ग्रहांची सध्याची स्थिती तुमच्या उत्पन्नात सतत वाढ होण्याचे संकेत देत आहे. खर्चही वाढतील पण त्याचा परिणाम तुमच्यावर फारसा दिसणार नाही. उत्पन्न आणि खर्चात समतोल राखा. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला खूप शुभ परिणाम मिळतील. या दरम्यान तुम्हाला सर्व अपेक्षित परिणाम मिळतील. करिअर आणि व्यावसायिक जीवनात तुम्ही तुमचे ध्येय आणि महत्त्वाकांक्षा साध्य करण्यात यशस्वी व्हाल. चांगली बातमी मिळू शकते.

धनु : गुंतवणुकीत फायदा होईल. व्यवसायात गुंतवणूक कराल. योग्य रणनीती अवलंबल्यास तुम्ही लवकरच पैसे दुप्पट कराल. व्यावसायिकांना विशेष लाभ होणार आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती गोळा करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शिक्षणाशी संबंधित बाबींसाठी वेळ योग्य आहे. बाहेरून शिक्षण घेण्याचीही शक्यता आहे. ग्रहयोग तुमच्या अनुकूल आहेत आणि तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळू शकतात.

मीन : लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळू शकतात. तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सुधारतील. योग्य निर्णय घेण्यात यश मिळेल. तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रीत करू शकाल. ग्रह-नक्षत्रांच्या संयोगामुळे यश तुमच्या पायाशी लोळण घेईल. तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि स्वतःला योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करावा लागेल.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्वाच्या बातम्या

Shani Amavasya 2023 : आज शनि अमावस्या; आजच्या दिवशी जाणून घ्या शनिशिंगणापूरचं महत्त्व आणि त्यामागची आख्यायिका 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Embed widget