Mangal Gochar 2024 : मंगळ ग्रहाचं मकर राशीत मार्गक्रमण; 'या' 3 राशींसाठी ठरणार लाभदायी, सर्व मनोकामना होणार पूर्ण
Mars Transit in Capricorn 2024 : मंगळ ग्रह 5 फेब्रुवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रहाचं हे मार्गक्रमण काही राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Mars Transit in Capricorn 2024 : ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला साहस आणि पराक्रमाचा कारक म्हटलं जातं. मंगळ (Mars) ग्रह लवकरच मकर राशीत प्रवेश करणार आहे. 5 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 9 वाजून 7 मिनिटांनी मंगळ मकर राशीत प्रवेश करेल.
मंगळ ग्रहाचं मकर राशीतील मार्गक्रमण अतिशय शुभ समजलं जातं. जेव्हा मंगळ मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळी व्यक्तीची सर्व कामं पूर्ण होतात, आखलेल्या योजना यशस्वीपणे पार पडतात. या वेळी होत असलेलं मंगळ ग्रहाचं मार्गक्रमण काही राशींसाठी अतिशय फलदायी ठरणार आहे, या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांना मकर राशीतील मंगळ प्रवेशाचा फायदा होऊ शकतो. मेष राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यावसायिकांना जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तुमच्या नोकरीत तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुमचा सन्मानही वाढेल. या काळात तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल. तुम्हाला कुटुंबाकडून सर्व प्रकारचं सहकार्य मिळेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. नोकरीमध्ये अनेक चांगल्या संधी मिळतील. या राशीच्या लोकांना नवीन नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळेल, तुम्ही व्यवसायात काही नवीन योजना आखाल.
वृषभ रास (Taurus)
मंगळाचं राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. या काळात तुमच्याकडे पैसा येण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. तुम्हाला कामानिमित्त परदेशातही जावं लागेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळू शकते. तुमचे कौटुंबिक जीवन खूप चांगले असेल. उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील. पैसे जमा करण्यात, पैशांची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांना मंगळाच्या संक्रमणामुळे शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात तुमच्यात सकारात्मक ऊर्जा दिसेल. तुमचं कामावर लक्ष राहील. तुम्हाला खूप प्रोडक्टिव्ह वाटेल, या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला धार्मिक गोष्टींमध्ये रस राहील. फेब्रुवारी महिन्यात तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. तुमचं काम आणि वैयक्तिक जीवनात संतुलन ठेवा. ऑफिसमध्ये तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. व्यवसायात यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: