Mangal Gochar 2024 : ब्रम्हांडात प्रथमच मंगळाचं 158 दिवस नीच स्थितीत भ्रमण; 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Mangal Gochar In Cancer : मंगळ ग्रहाने नुकताच कर्क राशीत प्रवेश केला आहे आणि प्रथमच तब्बल 158 दिवस तो नीच स्थितीत राहणार आहे, ज्याचा भरघोस फायदा 3 राशीच्या लोकांना होणार आहे.
Mangal Planet Transit In Cancer 2024 : वैदिक ज्योतिषानुसार, मंगळ ग्रह सुमारे 18 महिन्यांनंतर संक्रमण करतो, आपली राशी बदलतो. तसं पाहिलं तर, मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. तसेच, कर्क ही त्यांची कनिष्ठ राशी आहे. मंगळाच्या राशी बदलाचा परिणाम या 3 राशींवर सर्वाधिक होतो. नुकताच 20 ऑक्टोबरला मंगळ ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. प्रथमच मंगळ 158 दिवस नीच स्थितीत असल्याने कमजोर दिसेल. मंगळ ग्रह 158 दिवस कमकुवत असेल. हा काळ 3 राशींसाठी लाभाचा असणार आहे, या 3 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मंगळाचं नीच स्थितीतील भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. कारण मंगळ तुमच्या राशीतून चौथ्या भावात प्रवेश करणार आहे, त्यामुळे यावेळी तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. भौतिक सुखही मिळेल. त्याचबरोबर नोकरदार लोकांचे अधिकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील, ज्याचा तुम्हाला फायदा होताना दिसेल. मंगळाच्या संक्रमण काळात तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होईल आणि तुम्हाला चांगले आर्थिक लाभही मिळू शकतात. तसेच ज्या लोकांचे काम किंवा व्यवसाय प्रॉपर्टी आणि रिअल इस्टेटशी संबंधित आहे त्यांना फायदा होऊ शकतो.
कर्क रास (Cancer)
मंगळाचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होऊ शकतं. कारण मंगळ तुमच्या कुंडलीच्या चढत्या घरात मार्गक्रमण करेल. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास, धैर्य आणि शौर्य वाढेल. तसेच मंगळाच्या राशी परिवर्तनाच्या शुभ प्रभावामुळे वैवाहिक जीवन चांगलं राहील आणि पती-पत्नीमध्ये चांगला समन्वय राहील. या काळात तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते. तसेच, कुटुंबात सुरू असलेल्या समस्या हळूहळू संपुष्टात येतील आणि अविवाहित लोकांना चांगली स्थळं येऊ शकतात. या काळात तुम्हाला भागीदारी व्यवसायातून फायदा होऊ शकतो.
वृश्चिक रास (Scorpio)
मंगळाचा राशी बदल तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. कारण मंगळ तुमच्या राशीच्या नवव्या घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या कालावधीत तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता, यातून तुम्ही जास्तीत जास्त नफा मिळवू शकाल. त्याच वेळी, आपण कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तसेच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. या काळात विद्यार्थी चिकाटीने अभ्यास करतील आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: