Makar Sankranti 2026 : सूर्य संक्रमणानंतर मकर, सिंहसह 'या' राशींचं उजळणार भाग्य; तर, 'या' राशींसाठी नवं वर्ष धोकादायक
Makar Sankranti 2026 : 14 जानेवारी 2026 रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. हा काळ कर्म, शिस्त आणि जबाबदारी यांचं प्रतीक मानला जातो.

Makar Sankranti 2026 : नवीन वर्ष 2026 (New Year 2026) सुरु झाल्यानंतर येणारी मकर संक्रांत (Makar Sabkranti) ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 14 जानेवारी 2026 रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. हा काळ कर्म, शिस्त आणि जबाबदारी यांचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे या सूर्य संक्रमणाचा परिणाम सर्व 12 राशींवर वेगवेगळ्या स्वरुपात दिसून येणार आहे.
कोणत्या राशींना होणार फायदा?
या काळात मकर, मेष, सिंह आणि मिथुन राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळतील. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, तुमचं स्थैर्य टिकून राहील. मेष राशीच्या लोकांना नवीन काम, स्टार्टअप किंवा नोकरीत संधी मिळण्याची शक्यता आहे. या काळात प्रमोशन देखील तुम्हाला मिळू शकतं. सिंह राशीच्या व्यक्तींना नेतृत्वगुण दाखवण्याची संधी मिळेल, तर मिथुन राशीच्या लोकांना मीडिया, डिजिटल, शिक्षण क्षेत्रातून फायदा होऊ शकतो.
पैसा आणि करिअरचं काय?
मकर संक्रांतीनंतर पैसा मेहनत आणि नियोजन करणाऱ्यांकडे वळेल, असं ज्योतिष शास्त्रात सांगितलं आहे. मकर आणि सिंह राशीच्या लोकांना आर्थिक स्थैर्य लाभू शकतं. मात्र कर्क, वृश्चिक आणि मीन राशींनी गुंतवणूक करताना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. या राशींना अनावश्यक खर्च, फसवणूक किंवा आर्थिक गोंधळाला सामोरं जावं लागू शकतं.
कोणत्या राशींनी घ्यावी विशेष काळजी?
मकर संक्रांतीनंतर कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशींवर संकटाची छाया असू शकते. कर्क राशीला भावनिक अस्थिरता आणि घरगुती तणाव जाणवू शकतो. वृश्चिक राशीला ऑफिस पॉलिटिक्स किंवा विश्वासघाताचा सामना करावा लागू शकतो. कुंभ आणि मीन राशींनी मानसिक तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.
उपाय आणि सल्ला
मकर संक्रांतीला सूर्याला अर्घ्य देणं, तिळाचं दान करणं आणि निर्णय घेताना संयम बाळगणं फायदेशीर ठरू शकतं.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















