Mahashivratri 2023 : कर्जातून मुक्त व्हायचंय? महाशिवरात्रीला करा 'हे' सोपे उपाय, शिवपुराणात सांगितलेले फायदे जाणून घ्या
Mahashivratri 2023 : शनिवार, 18 फेब्रुवारी रोजी देशभरात महाशिवरात्रीचा सण साजरा केला जाणार आहे. शिवपुराणात या दिवसाचे महत्त्व सांगताना काही ज्योतिषीय उपाय सांगण्यात आले आहेत.
Mahashivratri 2023 : माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री (Mahashivaratri 2023) हा सण साजरा केला जातो. यावेळी ही शुभ तारीख शनिवार, 18 फेब्रुवारी रोजी आहे. या महाशिवरात्रीला शनि प्रदोष, सर्वार्थ सिद्धी असे अनेक महान योग घडत असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. शिवपुराणात मानव कल्याणासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने भगवान शंकराची कृपा होते आणि ऋणातून मुक्ती मिळते. रोजी देशभरात महाशिवरात्रीचा सण साजरा केला जाणार आहे. शिवपुराणात या दिवसाचे महत्त्व सांगताना काही ज्योतिषीय उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. महाशिवरात्रीला शिवपुराणात सांगितलेले फायदे जाणून घ्या.
शिवपुराणात सांगण्यात आलेले कर्जमुक्त होण्याचे उपाय...
माणसाला अनेक वेळा जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवते, त्याच वेळी कर्ज फेडण्यात अनेक अडचणीही येतात. कर्जमुक्तीसाठी शिवपुराणात काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे महाशिवरात्रीला केल्याने शिवाच्या आशीर्वादाने कर्जमुक्ती होते आणि आर्थिक सुबत्ता येते. जाणून घ्या शिवपुराणात सांगण्यात आलेले कर्जमुक्त होण्याचे उपाय...
या उपायाने कर्ज दूर होईल
शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन तीळ तुपात बुडवावे. यानंतर 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा 1100 वेळा जप करताना शिवलिंगावर एक एक करून तूप मिसळलेले तीळ अर्पण करावे. असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते.
या उपायाने शिव-शक्तीचा आशीर्वाद मिळेल
शनिवारी महाशिवरात्रीसोबत शनि प्रदोष व्रत देखील पाळले जाते, या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली गरीब आणि ब्राह्मणांना खीर खायला द्या. असे केल्याने धन मिळण्याची शक्यता निर्माण होते आणि भोलेनाथांच्या कृपेने कर्जापासून हळूहळू मुक्ती मिळते. असे केल्याने शिव आणि शक्तीचा आशीर्वादही प्राप्त होतो.
कर्जमुक्तीसाठी शिवलिंगाचा अभिषेक 'अशा' प्रकारे करा
कर्जमुक्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने भगवान शिवशंकर आर्थिक अडचणीतून मुक्त करतात. तसेच जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो.
प्रदोष काळात पूजा
ज्योतिषशास्त्रानुसार, महाशिवरात्रीला प्रदोष काळात पिठापासून बनविण्यात आलेल्या चारमुखी दिव्यात मोहरीचे तेल टाकून पिंपळाच्या झाडाखाली पेटवावे. यानंतर 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा जप करताना देवाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करावी. असे मानले जाते की, शनिवारी पिंपळाच्या झाडावर भगवान शिवासोबत सर्व देवता वास करतात. असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात.
मंदिरात पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात
धार्मिक मान्यता अशीही आहे की, कर्जापासून मुक्त होण्यासाठी, महाशिवरात्रीच्या दिवशी उज्जैनमधील रुणमुक्तेश्वर महादेव मंदिरात पूजा केली जाते. शनिवारी केलेल्या या पूजेला पिवळी पूजा म्हणतात. पिवळ्या रंगाची पूजा म्हणजे या पूजेत पिवळ्या कपड्यात पिवळी फुले, हळद, हरभरा, मसूर आणि थोडा गूळ बांधून शिवलिंगाला अर्पण केले जाते. पूजेत पिवळा रंग वापरला जात असल्याने त्याला पिवळ्या रंगाची पूजा म्हणतात. या पूजेनंतर व्यक्ती लवकर कर्जमुक्त होतो.
कर्जमुक्तीसाठी या मंत्राचा जप करा
महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत. या शुभ योगात ऋणातून मुक्ती मिळवण्यासाठी शिवलिंगाची विधिवत पूजा करावी. नंतर 'ओम ऋं मुक्तेश्वर महादेवाय नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते, तसेच शिवाच्या कृपेने कर्जापासून मुक्ती मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Mahashivratri 2023: महाशिवरात्रीला महादेवाला बेलपत्र अर्पण केल्याने काय होते? ज्योतिषतज्ज्ञांकडून जाणून घ्या