Maha kumbh 2025: कुंभमेळ्यात 'शाही स्नान' करून कमावायचंय पुण्य? 'हे' 3 नियम नक्की जाणून घ्या, शुभ फळ प्राप्त होईल..
Maha kumbh 2025: पौराणिक मान्यतेनुसार, असे मानले जाते की, महाकुंभ काळात पवित्र नद्यांचे पाणी अमृत बनते. सहभागी होणाऱ्या भाविकांनी काही नियमांचे पालन केले पाहिजे. याबद्दल जाणून घ्या..
Maha kumbh 2025: 2025 हे वर्ष खऱ्या अर्थाने खास ठरणार आहे. यंदा प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरू होणार आहे. कुंभमेळा हा हिंदू धर्मातील पवित्र कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. महाकुंभमेळ्याची वेळ ग्रहांची विशेष स्थिती पाहून ठरवली जाते. असे मानले जाते की, या काळात पवित्र नद्यांचे पाणी अमृत बनते. त्यामुळे महाकुंभ काळात भाविकांना गंगा, यमुना आदी नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. तथापि, काही नियम आहेत जे तुम्ही महाकुंभमध्ये स्नान करताना पाळले पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला या नियमांबद्दल सांगणार आहोत, जर तुम्हीही महाकुंभात स्नान करणार असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
शाही स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते?
धार्मिक मान्यतेनुसार, प्रयागराजमधील महाकुंभ 13 जानेवारीपासून सुरू होणार असून 26 फेब्रुवारीला या पवित्र उत्सवाची सांगता होणार आहे. या काळात कोट्यवधी भाविक प्रयागराजला पोहोचतील आणि कुंभ स्नान करतील. या काळात भाविकांनी खाली दिलेल्या नियमांचेही पालन करावे, तर तुम्हाला शुभ फळ मिळतील.
नियम 1
महाकुंभ दरम्यान, नागा साधू प्रथम स्नान करतात. नागा साधूंनी स्नान केल्यानंतरच इतर लोक स्नान करू शकतात. त्यामुळे चुकूनही महाकुंभाच्या दिवशी नागा साधूंसमोर स्नान करू नये. असे करणे धार्मिक दृष्टिकोनातून चांगले मानले जात नाही. हे नियमांचे उल्लंघन आहे आणि यामुळे कुंभातील स्नानाचे शुभ परिणाम मिळत नाहीत.
नियम 2
जर तुम्ही महाकुंभात स्नान करणार असाल तर भाविकांनी 5 वेळा स्नान करावे हे देखील लक्षात ठेवा. धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा गृहस्थ महाकुंभमध्ये 5 वेळा स्नान करतात, तेव्हाच त्यांचे कुंभस्नान पूर्ण मानले जाते.
नियम 3
महाकुंभात स्नान केल्यानंतर दोन्ही हातांनी सूर्यदेवाला जल अर्पण करावे. सूर्यदेवाची विशेष स्थिती लक्षात घेऊन कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते, त्यामुळे महाकुंभात स्नान करण्यासोबतच सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यास शुभ फल प्राप्त होते. कुंभस्नानादरम्यान सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने कुंडलीतील सूर्याचे स्थान बळकट होते.
नियम 4
कुंभमध्ये स्नान केल्यानंतर प्रयागराजमध्ये आडवे हनुमानजी किंवा नागवासुकी मंदिरातही जावे. मान्यतेनुसार या मंदिरांमध्ये गेल्यावरच भाविकांची धार्मिक यात्रा पूर्ण होते. या नियमांचे पालन करून महाकुंभात स्नान केल्यास अनेक फायदे होतात. तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते आणि तुमचा आध्यात्मिक विकासही होतो.
कुंभमेळ्यातील 2025 शाही स्नानाच्या तारखा
14 जानेवारी 2025 - मकर संक्रांती
29 जानेवारी 2025 - मौनी अमावस्या
3 फेब्रुवारी 2025 - वसंत पंचमी
12 फेब्रुवारी 2025 - माघी पौर्णिमा
26 फेब्रुवारी 2025 - महाशिवरात्री
महाकुंभ कधी सुरू होणार?
हिंदू दिनदर्शिकेनुसार, महाकुंभ 2025 हा 13 जानेवारीपासून सुरू होईल आणि 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीपर्यंत चालेल. या दरम्यान अनेक शुभ काळ आणि मुहूर्त येतील. यादरम्यान शाहीस्नानही होणार आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी एक असलेला महाकुंभ पौष पौर्णिमेच्या दिवशी सुरू होईल. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे दर 12 वर्षांनी महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. मात्र, प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर होणारा महाकुंभ सर्वात भव्य मानला जातो. महाकुंभमेळ्यात स्नानाला खूप महत्त्व आहे.
हेही वाचा>>>
Maha Kumbh 2025: महाकुंभातील मोठं आकर्षण! केवळ भाग्यवान लोकांनाच मिळते 'नागा साधूंची शाही मिरवणूक' पाहण्याची संधी? कारण जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )