(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maghi Ganesh Jayanti : मोदकांव्यतिरिक्त बाप्पाला आवडतात 'हे' 11 पदार्थ; माघी गणेश जयंतीला दाखवा खास नैवेद्य
Ganpati Favourite Foods : गणेश जयंती म्हटली की लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण आतुर असतो. यंदा 13 फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी होत आहे, या दरम्यान तुम्ही बाप्पाला त्याच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकता.
Maghi Ganesh Jayanti : माघी गणेश जयंतीचा उत्सव 13 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे आणि त्यात, गणेश जयंती म्हटली की गोड पदार्थ आलेच. गणपती बाप्पाला गोड पदार्थ किती आवडतात हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. मोदक हे गणपतीचे खूप आवडते असले तरी या व्यतिरिक्त आणखी काही पदार्थ आहेत, जे बाप्पाला खूप आवडतात. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही देखील माघी गणेश जयंतीला (Ganesh Jayanti) हे पदार्थ तयार करू शकतात आणि बाप्पाला नैवेद्य दाखवू शकतात. चला या पदार्थांवर एक नजर टाकूया.
लाडू (Ladoo)
मोदकांनंतर गणपतीचा आवडता पदार्थ म्हणजे लाडू. पौराणिक कथांनुसार, गणपतीला लाडू खूप आवडायचे. गणपतीच्या प्रत्येक फोटोमध्ये नैवेद्यात लाडू असतातच. त्यात मोतीचूर लाडू हे बाप्पाला आणि त्यांचे वाहन मोषकराज याला देखील आवडतात. शुध्द तुपापासून बनवलेले लाडू तुम्ही देवाला अर्पण करू शकता.
श्रीखंड (Shrikhand)
श्रीखंड हा गणेश पूजेतील महत्त्वाचा पदार्थ आहे. बाप्पाला श्रीखंडाचा नैवेद्य देखील फार आवडतो. हे दही, साखर आणि विविध प्रकारच्या ड्रायफ्रुट्समध्ये मिसळून बनवले जाते.
पुरण पोळी (Puran Poli)
हरभरा डाळ आणि गूळ घालून केलेली पुरण पोळी हा गणपतीचा आवडता प्रसाद आहे. घरच्या घरी तुम्ही हा नैवेद्य बनवून बाप्पाला अर्पण करू शकता, यामुळे गणपती तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल.
नारळाचा भात (Narali Bhat)
गणपतीला नारळाचा भातही खूप आवडतो आणि तिसर्या दिवशी त्यांच्या पूजेच्या वेळी तो अर्पण करावा. नारळाच्या दुधात भात शिजवून हा भोग तयार केला जातो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात गूळ किंवा साखरही घालू शकता.
केळी (Bananas)
गणेश जयंतीनिमित्त तुम्ही गणपतीला केळीचा नैवेद्य दाखवू शकता. गणेशाला केळी आवडतात आणि बंगाली परंपरेनुसार त्यांनी कोला बो, म्हणजेच केळीच्या झाडाशी लग्न केलं आहे. यामुळेच केळीशिवाय किंवा केळीच्या पानांशिवाय गणेशपूजा अपूर्ण राहते.
शिरा (Sheera)
गोड पदार्थांमध्ये तुम्ही बाप्पाला शिऱ्याचा नैवेद्य देखील दाखवू शकता. तुम्ही केळी मॅश करुन स्पेशल शिरा बनवू शकता. सत्यनारायणाच्या पूजेत बनतो अगदी तसा हा शिरा बनेल, जो बाप्पाला फार आवडतो.
हलवा (Halwa)
सध्या थंडीचा हंगाम असल्याने तुम्ही बाप्पाला गाजराचा हलवा देखील दाखवू शकता. शिऱ्यापाठोपाठ हलवा हा गणपतीला आवडणारा पदार्थ आहे.
खीर (Kheer)
खीर हा बाप्पाला प्रिय असलेला पदार्थ आहे. खीर हे एकंदर सर्वच देवतांचे आवडते अन्न असल्याचे मानले जाते आणि यामुळेच खीर हा प्रत्येक भारतीय सणांचा भाग असते. गणेश जयंतीच्या निमित्ताने दुधासह अनेक प्रकारच्या खीर घरोघरी बनवल्या जातात.
शुद्ध तूप आणि गूळ (Pure Ghee and Jaggery)
गणपतीला शुद्ध तुपात शिजवलेला गूळ खूप आवडतो, त्यामुळे बाप्पाला तुम्ही हे अर्पण करू शकता. तुम्हाला वाटल्यास तुम्ही गुळात खजूर आणि खोबरंही घालू शकता.
मुरमुऱ्यांचे लाडू (Murmura Ladoo)
जेव्हा कुबेराने गणेशाला जेवणासाठी आमंत्रित केलं तेव्हा गणपतीचं काही केल्या पोट भरत नव्हतं, त्यांना अधिक खाण्याची इच्छा होतच राहिली. तेव्हा भगवान शिवाने त्यांना भक्तीने काही फुगलेले तांदूळ अर्पण केले. असा विश्वास आहे की, त्यानंतरच गणेशाची भूक भागली. म्हणूनच गणेश जयंतीला मुरमुरा आणि गुळाचे लाडू तयार केले जातात आणि बाप्पाला नैवद्य म्हणून अर्पण केले जातात.
उकडीचे मोदक (Ukdiche Modak)
मोदक हे गणपतीचं सर्वात आवडतं खाद्य आहे. पहिल्या दिवशी तांदळाचे पीठ, नारळ आणि गुळापासून बनवलेले पारंपरिक मोदक देवाला अर्पण केले जातात. मोदक अनेक प्रकारे बनवले जात असले तरी उकडीचे मोदक हा त्यांचा आवडता भोग आहे.
हेही वाचा: