Lucky Gemstones : 'या' राशीला माणिक रत्नामुळे होता खूप फायदा
Lucky Gemstones : रत्न धारण करताना राशी आणि ग्रहांच्या स्थितीची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अन्यथा त्याचे अशुभ परिणाम देखील होऊ शकतात.
Lucky Gemstones : कुंडलीतील ग्रहांची स्थिती सतत खराब होत राहते. राशीनुसार रत्न धारण केल्याने जीवनातील समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात असे म्हटले जाते. रत्न धारण करताना राशी आणि ग्रहांच्या स्थितीची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अन्यथा त्याचे अशुभ परिणाम देखील होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांशी संबंधित वेगवेगळी रत्ने सांगितली आहेत. जाणून घेऊया सिंह राशीच्या लोकांनी कोणते रत्न परिधान करावे.
सिंह राशीसाठी माणिक रत्न आहे शुभ
सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे. कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर प्रतिष्ठा कमी होते. प्रगती थांबते आणि व्यक्तीला हृदयाशी संबंधित आजार होऊ लागतात. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य कमजोर आहे त्यांनी माणिक रत्न धारण करावे. हे रत्न धारण केल्याने सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये अपार यश मिळते.
ही रत्ने देखील आहेत शुभ
सिंह राशीच्या लोकांसाठी पुष्कराज, गोमेद आणि डायमंड देखील खूप फायदेशीर आणि प्रभावी आहेत. तुम्ही डायमंडऐवजी ओपल रत्न देखील घालू शकता. या राशीच्या महिलांसाठी पुष्कराज आणि जास्पर रत्न देखील खूप भाग्यवान मानले जातात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :
Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ