Libra March Horoscope 2024 : तूळ राशीसाठी मार्च महिना भाग्याचा; प्रलंबित कामं होणार पूर्ण, संपूर्ण मासिक राशीभविष्य जाणून घ्या
Libra Monthly Horoscope March 2024: तूळ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना कसा राहील? मार्च महिन्यात ग्रहांच्या परिवर्तनाचा तूळ राशीच्या लोकांवर कसा परिणाम होईल? मासिक राशीभविष्य जाणून घ्या.
Libra March Horoscope 2024 : तूळ (Libra) राशीच्या लोकांसाठी मार्च 2024 चा महिना खूप चांगला जाणार आहे. मार्च महिना तुमच्यासाठी प्रगतीचा असणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न देखील वाढू शकतं. कामाशी संबंधित प्रवास शुभ ठरेल. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला तर तुम्हाला मेहनतीचं फळ नक्की मिळेल.
तूळ राशीच्या लोकांसाठी व्यवसायिक, शैक्षणिक आणि कौटुंबिकदृष्ट्या मार्च महिना कसा असेल? सविस्तरपणे जाणून घेऊया.
तूळ राशीचे करिअर (Libra Job Career Horoscope March 2024)
14 मार्चपर्यंत तूळ राशीच्या दहाव्या भावात मंगळ असल्यामुळे या काळात तुमची प्रगती होऊ शकते. तुमचा पगारही वाढेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
7 मार्च ते 30 मार्च दरम्यान कला, डिझायनिंग, फॅशन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असू शकतो. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील.
14 ते 25 मार्च दरम्यान बुधादित्य योग असल्याने नोकरदारांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. सहकाऱ्यांच्या मदतीने आर्थिक लाभही होऊ शकतो. या काळात कामाशी संबंधित प्रवास तुम्हाला चांगला फायदेशीर ठरेल.
विद्यार्थ्यांसाठी महिना कसा? (Student Monthly Horoscope March 2024)
गुरू आणि शनिच्या अस्थिर स्थितीमुळे विद्यार्थ्यांना या महिन्यात थोडी मेहनत करावी लागेल. तुम्ही निष्काळजी राहिलात तर याचे वाईट परिणाम दिसतील. 15 मार्चपासून अभ्यासात तुमचं लक्ष लागेल आणि तुम्हाला तणाव जाणवणर नाही. तुम्हाला हुशारीने सर्व कामं पूर्ण करावी लागतील. 14 ते 25 मार्च या कालावधीत बुधादित्य योग असल्याने स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भरघोस यश मिळेल. महिन्याचा शेवट तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.
तूळ राशीचं मार्चमधील आरोग्य आणि प्रवास जीवन (Libra Health And Travel March 2024)
जुनाट आजारांनी त्रस्त लोकांना मार्च महिन्यात आराम मिळू शकेल. तुमच्या तब्येतीत काही बदल होऊ शकतात. 14 मार्चपासून सहाव्या भावात सूर्य-राहूचं ग्रहण दोष असल्यामुळे तीर्थयात्रेला जाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.
तूळ राशीसाठी उपाय (Libra Remedies March 2024)
8 मार्च, महाशिवरात्री :- या राशीच्या लोकांनी पाण्यात फुलं टाकून ती शंकराच्या पिंडीवर वाहावी. "ओम हर हर महादेवाय नमः" या मंत्राचा जप करावा.
24 मार्च, होळी :- होलिका दहनात काळे तीळ आणि 2 तुकडे हळकूंड अर्पण करा. दुसऱ्या दिवशी 7 चिमूट होलिका दहनाची राख कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा, तुम्हाला कायम यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: