Leo Horoscope Today 23 January 2023 :सिंह राशीच्या लोकांची आज नोकरीत होईल प्रगती, जाणून घ्या राशीभविष्य
Leo Horoscope Today 23 January 2023 : पंचांगानुसार आज म्हणजेच 23 जानेवारी 2023 सोमवार हा विशेष दिवस आहे. मेष ते मीन राशीपर्यंत सर्व राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Leo Horoscope Today 23 January 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, आज 23 जानेवारी 2023, सोमवार धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या यासह सर्व राशींसाठी हा दिवस महत्त्वाचा असणार आहे. जाणून घ्या आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? कोणत्या राशीवर या दिवशी भगवान महादेवाची कृपा होणार आहे? जाणून घ्या आजचे राशीभविष्य (Horoscope Today)
आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाणार?
सिंह राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या नोकरीत प्रगती बघायला मिळेल, त्यामुळे त्यांचे मन प्रसन्न राहील आणि घरात सुख-शांती नांदेल. जे मीडिया, बँकिंग आणि आयटी क्षेत्रात काम करतात, त्यांना नवे अधिकारी मिळण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांना यश मिळेल
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात यश मिळेल. आज तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात अभ्यासासाठी जाऊ शकता. सिंह राशीच्या लोकांच्या संचित संपत्तीत वाढ होईल. व्यवसाय करणारे लोक त्यांच्या अडकलेल्या योजना सुरू करण्यात व्यस्त राहतील, ज्यामुळे ते कुटुंबातील सदस्यांना वेळ देऊ शकणार नाहीत. कुटुंबासमवेत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचीही योजना कराल.
तब्येतीत चढ-उतार
आज तुम्ही तुमचे विचार वडिलांना सांगाल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या तब्येतीत चढ-उतार असतील, ज्यामुळे तुमचे मन उदास राहील. सरकारी योजनांचा लाभही तुम्हाला घेताना दिसत आहे. तुम्ही तुमच्या आईल कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाल, तिथे ती खूप आनंदी दिसेल. तुम्ही संध्याकाळचा वेळ तुमच्या पालकांसोबत घालवाल, जेणेकरून तुमच्या मनात काय आहे आणि त्यांच्या मनात काय आहे हे तुम्हाला कळेल.
आज नशीब 91% तुमच्या बाजूने
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. सरस्वती जिभेवर राहील म्हणून विचारपूर्वक बोला. एखाद्याला मदत करण्याची इच्छा मनात निर्माण होईल. घरातील वातावरण थोडे अशांत असू शकते. लव्ह लाईफमध्ये आनंद राहील आणि रोमान्सही वाढेल. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत कोणतीही वैयक्तिक बाब शेअर करू शकता. विवाहित लोक आज त्यांच्या जोडीदाराच्या वागण्याने थोडे निराश होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणे टाळा, अन्यथा मतभेद वाढू शकतात. आज नशीब 91% तुमच्या बाजूने असेल. प्रदोष काळात काळे तीळ मिसळलेला कच्चा तांदूळ दान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Cancer Horoscope Today 23 January 2023 : राजकारणात करिअर करणाऱ्या तरुणांसाठी आजचा दिवस चांगला, जाणून घ्या राशीभविष्य