Lakshmi Pujan 2025 : लाल, पिवळा, पांढरा आणि...लक्ष्मीपूजनाला तुमच्या राशीनुसार परिधान करा 'या' रंगाचे कपडे, देवीची कृपा राहील
Lakshmi Pujan 2025 : लक्ष्मी पूजनासाठी राशीनुसार विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते

Lakshmi Pujan 2025 : आनंदाचा, उत्साहाचा असा दिवाळीचा (Diwali 2025) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीला (Diwali 2025) लक्ष्मी पूजनासाठी राशीनुसार (Zodiac Signs) विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक मान्यता आहे.
राशीनुसार लक्ष्मी पूजनासाठी शुभ रंग (Auspicious colors for Lakshmi Puja according to zodiac sign
मेष रास - मेष राशीच्या लोकांनी लाल किवा लाल रंगाच्या छटा असलेले वस्त्र परिधान करावेत.
वृषभ रास - निळा किवा क्रीम रंग शुभ आहे.
मिथुन रास - हिरवा किवा लाल या रंगाचे कपडे परिधान करावेत.
कर्क रास - पांढरा किवा लाल रंग शुभ मानला जाईल.
सिंह रास - सिंह राशीच्या लोकांनी लाल किवा पिवळा परिधान करणं शुभ ठरेल.
कन्या रास - कन्या राशीच्या लोकांसाठी हिरवा किवा लाल रंग शुभ आहे.
तूळ रास - पांढरा क्रीम किवा निळा रंग शुभ आहे.
वृश्चिक रास - वृश्चिक राशीसाठी लाल रंग शुभ आहे.
धनु रास - धनु राशीच्या लोकांनी पिवळा किवा लाल रंग परिधान करावा.
मकर रास - मकर राशीसाठी जांभळा किवा राखाडी रंग शुभ आहे.
कुंभ रास - या राशीने पांढरा निळा किवा कथाई रंग घालावा.
मीन रास - मीन राशीने पांढरा किवा पिवळा रंग परिधान करावा.
काही महत्वाच्या गोष्टी :
काळजी घ्या : पूजेच्या वेळी काळे रंग आणि जास्त गडद निळा किंवा तपकिरी रंग पूर्णपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण ते नकारात्मकता उर्जा उत्पन्न करतात.
अन्य शुभ रंग : जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार रंग उपलब्ध नसेल, तर पिवळा, लाल, केशरी आणि चमकदार रंग हे लक्ष्मी पूजनासाठी सामान्यतः शुभ मानले जातात.
वस्त्र : तुम्ही पूर्ण वस्त्राच्या रूपात किंवा तुमच्या वस्त्रात या रंगांचा समावेश करू शकता. उदाहरणार्थ, जर पूर्ण पांढरा शक्य नसेल तर पांढरी किनार (बॉर्डर) असलेले किंवा पांढऱ्या छटा असलेले वस्त्र परिधान करू शकता.
डॉ. भूषण ज्योतिर्विद
हे ही वाचा :




















