एक्स्प्लोर

Kolhapur : श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी, नेमका काय असतो हा सोहळा?

Narsinhwadi Datta Mandir Dakshindwar : कोल्हापुरातील नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा आज पार पडला. दक्षिणद्वार सोहळ्या नंतर मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नेमका दक्षिणद्वार सोहळा असतो तरी काय? पाहूया.

कोल्हापूर : नृसिंहवाडी दत्त मंदिरात (Nrusinhawadi Datta Mandir) मंदिराच्या गाभाऱ्यात पहाटे 4 वाजता पाणी गेलं आणि दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. कोल्हापुरातील (Kolhapur) शेकडो भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. कृष्णा नदीतील पाण्याने पहाटे 4 वाजता श्रींच्या पादुकांना स्पर्श केला आणि पाणी दक्षिणदार द्वारातून बाहेर पडल्याने दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. यावेळी दिंगबरा दिंगबरा असा जयघोष करत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

मंदिरात पाणी आल्याने दक्षिणद्वार सोहळा संपन्न

मागील आठवड्याभरापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून अनेक ठिकाणी पंचगंगा पात्राबाहेर वाहत आहे. शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम होतो. यामुळे दरवर्षी पाणी वाढलं की नदीचं पाणी येथील श्रीक्षेत्र दत्त मंदिरात शिरत असतं. यंदा 16 जुलै रोजी पहाटे 4 वाजता नदीचं पाणी दत्त मंदिरात आलं आहे. यामुळे यावर्षीचा पहिला दक्षिणद्वार सोहळा पहाटेच्या सुमारास मोठ्या उत्साहात पार पडला.

दक्षिणद्वार सोहळ्यानंतर मंदिरात स्नानासाठी भाविकांची गर्दी

नृसिंहवाडी दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा जल्लोषात पार पडला, यानंतर मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती. दिगंबरा दिगंबरा अशा जयघोषात भविकांनी या पाण्यात स्नानं केलं. कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांची पाणी पातळी सध्या स्थिर आहे, त्यामुळे परिसरात इतका धोका नाही. पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांची पाणी पातळी सध्या स्थिर आहे. तरीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात बंदोबस्त तैनात आहे.

काय असतो दक्षिणद्वार सोहळा?

कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर नृसिंहवाडी इथलं दत्त मंदिर आहे. या मंदिरात कृष्णा नदीला पूर (Krishna River Flood) आल्यानंतर पाणी शिरतं. मात्र हे पाणी ज्यावेळी मंदिरातील दत्ताच्या पादुकांना लागतं, त्यावेळी त्याचं विशेष महत्त्व असतं. या मंदिराच्या रचनेनुसार उत्तर-दक्षिण वाहिनी असलेल्या कृष्णा नदीचे पाणी उत्तर दरवाज्यातून आत शिरतं आणि दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडतं, तेव्हा दक्षिणद्वार सोहळा म्हटलं जातं.

Kolhapur : श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी, नेमका काय असतो हा सोहळा?

हा सोहळा अनुभवण्यासाठी आणि यामध्ये स्नान करण्यासाठी भविकांची मोठी गर्दी होते. आज पहाटे हा सोहळा झाल्याची माहिती मिळताच भाविकानी इथल्या स्नानाचा आंनद लुटला. ज्यावेळी पूरस्थिती निर्माण होते त्याचवेळी हा सोहळा अनुभवण्यास मिळतो. त्यामुळे हा दक्षिणद्वार सोहळा भाविकांना विशेष अनुभूती देणारा ठरतो.

हेही वाचा:

Jagannath Puri : तब्बल 46 वर्षांनंतर देशातील सर्वात मोठ्या खजिन्याचं कुलूप उघडलं; जगन्नाथ पुरी मंदिराचं धन पाहून व्हाल थक्क

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?  
पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?  
व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...
व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...
मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर
मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर
खूशखबर! बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये बंपर भरती, आजच अर्ज करा!
खूशखबर! बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये बंपर भरती, आजच अर्ज करा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MNS Mumbai School Issue : बदलापूर प्रकरणानंतपर मनसेकडून मुंबईतील शाळाच्या सुरक्षेची पाहणीABP Majha Headlines : 07 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 07 PM 22 August 2024 : ABP MajhaPrithviraj Chavan Meet Manoj Jarange : मनोज जरांगेंनची भेटीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?  
पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?  
व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...
व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...
मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर
मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर
खूशखबर! बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये बंपर भरती, आजच अर्ज करा!
खूशखबर! बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये बंपर भरती, आजच अर्ज करा!
रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक का असते?, काय घ्यावी काळजी
रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक का असते?, काय घ्यावी काळजी
सुवर्णसंधी! सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या, 10 लाख रुपये जिंका, कधी, कुठं, कशी कराल नोंदणी?
सुवर्णसंधी! सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या, 10 लाख रुपये जिंका, कधी, कुठं, कशी कराल नोंदणी?
दहीहंडीला दोन बियर फ्री, वादग्रस्त जाहिरातीनंतर हिंदू आक्रमक; रिसॉर्टमालकाने जोडले हात
दहीहंडीला दोन बियर फ्री, वादग्रस्त जाहिरातीनंतर हिंदू आक्रमक; रिसॉर्टमालकाने जोडले हात
Kolhapur News : तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बहिणींना ग्वाही
तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बहिणींना ग्वाही
Embed widget