एक्स्प्लोर

Jagannath Puri : तब्बल 46 वर्षांनंतर देशातील सर्वात मोठ्या खजिन्याचं कुलूप उघडलं; जगन्नाथ पुरी मंदिराचं धन पाहून व्हाल थक्क

Puri Jagannath Mandir Ratna Bhandar : पुरीतील जगन्नाथ मंदिराचा खजिना 46 वर्षांनी खुला करण्यात आला. देशातील सर्वात मोठ्या खजिन्याचं दार रविवारी उघडण्यात आलं.

Jagannath Puri Mandir Ratna Bhandar : ओडिशातील पुरी येथील 12व्या शतकातील जगन्नाथ मंदिराचा (Jagannath Puri Temple) खजिना 'रत्नभांडार' 46 वर्षांनंतर रविवारी दुपारी पुन्हा एकदा उघडण्यात आला. मौल्यवान वस्तूंच्या यादीसाठी आणि त्याच्या संरचनेच्या दुरुस्तीसाठी हा खजिना उघडण्यात आला आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या सदस्यांनी दुपारी 12 च्या सुमारास मंदिरात प्रवेश करत धार्मिक विधी केल्यानंतर दुपारी 1.28 च्या सुमारास खजिना उघडण्यात आला. त्यासाठी सकाळी झालेल्या बैठकीत मुहूर्त काढण्यात आला. यापूर्वी हा खजिना 1978 मध्ये उघडण्यात आला होता.

खजिना उघडला तेव्हा 11 जणांची उपस्थिती

खजिना पुन्हा उघडला तेव्हा उपस्थित 11 जणांमध्ये ओरिसा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विश्वनाथ रथ, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन (SJTA) मुख्य प्रशासक अरबिंदा पाधी, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक (ASI) डी.बी. गडानायक आणि पुरीच्या नामांकित राजा 'गजपती महाराज'चे प्रतिनिधी आदींचा समावेश होता.

लवकरच मौल्यवान वस्तूंची यादी तयार होणार

"आम्ही सर्व कामं नियमानुसार पार पाडली. प्रथम रत्नभांडारची बाहेरची खोली उघडली आणि तिथे ठेवलेले सर्व दागिने आणि मौल्यवान वस्तू मंदिराच्या आतील तात्पुरत्या खोलीत हलवल्या आणि ही खोली सील केली. तूर्तास खोली सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत असेल. तर मौल्यवान वस्तूंची यादी आणि भांडार दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे.", असं पाधी यांनी पत्रकारांना सांगितलं.

भाजपची सत्ता आल्यानंतर दार उघडलं

ओडिशातील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्न भंडार पुन्हा उघडणं हा एक प्रमुख राजकीय मुद्दा होता. भाजपने रत्न भंडाराच्या हरवलेल्या चाव्यांवरून तत्कालीन सत्ताधारी बिजू जनता दलावर निशाणा साधत जिंकल्यास रत्न भंडार पुन्हा उघडण्याचं आश्वासन दिलं होतं. यानुसार दरवाजा उघडण्यातही आला. 

हरवलेल्या चाव्यांवरून राजकारण

रत्न भांडारमध्ये 2 कक्ष आहेत, एक बाह्य आणि एक आतील. SJTA च्या मुख्य प्रशासकाने सांगितलं की, बाहेरच्या चेंबरच्या 3 चाव्या होत्या, त्यापैकी एक गजपती महाराजांकडे, दुसरी SJTA कडे आणि तिसरी चावी एका सेवकाकडे होती. आतील चेंबरची किल्ली गहाळ आहे, तरी नवीन किल्लीने दार उघडलं जाईल. त्यानंतर नवीन चावी जिल्हा तिजोरीत डीएमच्या देखरेखीखाली ठेवली जाईल.

मंदिराच्या नावावर 60,822 एकरहून अधिक जमीन

सध्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग मंदिराच्या संवर्धनाची जबाबदारी सांभाळत आहे. पुरी मंदिराच्या बँकेत जमा केलेली रक्कम अंदाजे 600 कोटी रुपये एवढी आहे. रत्न भंडारात ठेवलेल्या दागिन्यांची आणि साहित्याची यादी दर तीन वर्षांनी केली पाहिजे. 1926 आणि 1978 मध्ये याद्या झाल्या, पण मूल्यांकन केलं गेलं नाही. जगन्नाथ मंदिराच्या नावावर 60,822 एकरहून अधिक जमीन आहे. ओडिशात 60,423 एकर जमीन आहे. बंगाल, म. प्रदेश, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आंधात 395 एकर जमीन आहे.

1978 मध्ये किती सोनं-चांदी होतं?

  • 128.38 किलो सोन्याच्या 454 वस्तू होत्या
  • 221.53 किलो चांदीच्या 293 वस्तू होत्या.

आतल्या खोलीत

  • 43.64 किलो सोन्याच्या 367 वस्तू होत्या
  • 148.78 किलो चांदीच्या 231 वस्तू होत्या.

बाहेरच्या खोलीत

  • 84.74 किलो सोन्याच्या 87 वस्तू होत्या
  • 73.64 किलो चांदीच्या 62 वस्तू होत्या.

हेही वाचा:

Jagannath Rath Yatra 2024 : जगन्नाथ पुरी मंदिरातील 'ही' 10 रहस्य तुम्हालाही अचंबित करतील

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Red Fort Blast : लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट; घटनास्थळावरुन ग्राऊंड रिपोर्ट
Delhi Blast Amit Shah : लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी
Delhi Red Fort Blast : दिल्लीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा वाढला, मुंबईत हाय अलर्ट
Amit Shah on Delhi Blast : लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट, गृहमंत्री अमित शाहांची प्रतिक्रिया
Delhi Blast: लाल किल्ल्यासमोर बॉम्बस्फोट, २ तासांच्या आत एका संशयिताला ताब्यात, यंत्रणांना मोठे यश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Delhi Blast : नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
Embed widget