एक्स्प्लोर

Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमेला चुकूनही 'या' गोष्टी दान करु नका; हातातून पाण्यासारखा वाहत जाईल पैसा

Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टींचं दान केल्याने पुण्य फळ मिळतं. तर, काही गोष्टी दान केल्याने तितकीच संकटही येतात.

Kojagiri Purnima 2024 : हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीच्या दुसऱ्याच दिवशीच कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2024) साजरी केली जाते. हिंदू धर्मात हा दिवस फार महत्त्वाचा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध तसेच खीर बनवण्याची परंपरा आहे. तसेच, आजच्या दिवशी काही शुभ गोष्टींचं दान करणं अशुभ मानलं जातं. 

कोजागिरी पौर्णिमेला काय दान करु नये?

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दान, स्नान करणं फार शुभ मानलं जातं. ज्योतिष शास्त्रात, अशा काही गोष्टींचं वर्णन करण्यात आलं आहे की, ज्या गोष्टी आपण कधीच कोणालाही दान करु नयेत. हे एक प्रकारे अशुभतेचं लक्षण आहे. यामुळे घरात एकामागोमाग संकटं येऊ लागतात. 

लोखंडाचं सामान

आजच्या दिवशी चुकूनही लोखंडाचं सामान कोणाला दान करु नका. एखाद्याला लोखंड दान करणं शुभ मानलं जात नाही. मान्यतेनुसार, लोखंडाचं दान केल्याने शनीदोष लागतो. त्याचबरोबर आयुष्यात तुम्हाला अनेक संकटांचा, आव्हानांचा सामना करावा लागतो. 

दही 

तसेच, आजच्या दिवशी चुकूनही कोणाला दही दान करु नये. यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारची संकटं येऊ शकतात. तुमच्या आयुष्यातून सुख-शांती निघून जाऊ शकते. ज्योतिष शास्त्रानुसार मानल्यास यामुळे तुम्हाला शुक्रदोषही लागण्याची शक्यता आहे. 

मीठ 

आजच्या दिवशी एखाद्याला मीठाचा खडा किंवा मीठ दान करणं फार अशुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या आयुष्यात खूप नकारात्मकता येऊ लागते. तसेच, तुम्ही या काळात कोणतंही नवीन काम सुरु करु शकत नाहीत. 

कोणत्या गोष्टी दान करणं शुभ?

धार्मिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ, गूळ, खीर यांचं दान करणं शुभ मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी जर तुम्ही दान केल्या तर यामुळे तुमची आर्थिक तंगीपासून सुटका होऊ शकते. तसेच, तुमच्या आयुष्यात सकारात्मकता वाढण्याची शक्यता असते. 

कोजागिरी पौर्णिमा 2024 तिथी 

वैदिक पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या पौर्णिमा तिथीची सुरुवात आज रात्रीपासून 08 वाजून 40 मिनिटांनी होणार आहे. तर, याची समाप्ती पुढच्या दिवशी म्हणजेच 17 ऑक्टोबरच्या दिवशी संध्याकाळी 04 वाजून 55 मिनिटांनी होणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Shani Dev : 10, 20 नाही तर तब्बल 500 वर्षांनी दिवाळीच्या मुहूर्तावर शनी आणि गुरुची उलटी चाल; 'या' 3 राशींना लागणार 'जॅकपॉट'

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
Hindu Religion : भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योग झाला 'Active'...17 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार पुण्य, हातात खेळणार पैसा, नशिबाचे दार उघडणार
त्रिग्रही योग झाला 'Active'...17 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार पुण्य, हातात खेळणार पैसा, नशिबाचे दार उघडणार

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget