Karwa Chauth 2023 Puja Time Live: आज करवा चौथ व्रत, चंद्रोदयाची वेळ आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
Karwa Chauth 2023 Puja Muhurta Today Live: आज करवा चौथचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. याबद्दलची पुजेशी संबंधित सर्व माहिती जाणून घ्या.
LIVE
Background
Karwa Chauth 2023 Puja Live: आज देशभरात करवा चौथचा सण साजरा केला जात आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी हे व्रत पाळलं जातं. या व्रताचं पालन केल्याने वैवाहिक जीवन सुखी होतं. काही ठिकाणी अविवाहित स्त्रियाही चांगला वर मिळण्यासाठी करवा चौथचा उपवास करतात. संपूर्ण उत्तर भारतात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी महिला निर्जळी व्रत पाळतात आणि रात्री चंद्राची पूजा करून त्याला अर्घ्य अर्पण करूनच उपवास सोडतात. करवा चौथला लग्नाशी संबंधित वस्तू जसे की सोळा शृंगार आणि संबंधित वस्तू दान करणं खूप शुभ मानलं जातं.आज करवा चौथ व्रत, चंद्रोदयाची वेळ आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया.
Karwa Chauth 2023 Niyam: करवा चौथ व्रताचे नियम
हे व्रत सूर्योदयापूर्वी सुरू करून चंद्र उगवण्यापर्यंत चालू ठेवावं. चंद्र पाहिल्यानंतरच हा उपवास मोडतो. चंद्रोदयाच्या 1 तास आधी संध्याकाळी संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा केली जाते. पूजेच्या वेळी देवतेच्या मूर्तीचं तोंड पश्चिमेकडे आणि स्त्रीने पूर्वेकडे तोंड करून बसावं.
Karwa Chauth 2023 Shubh Sanyog: आज करवा चौथ दिवशीते शुभ योग
आज करवा चौथला अनेक शुभ योग घडत आहेत. आज बुध आदित्य योग, शिवयोग, परिघ योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत. 1 नोव्हेंबरला बनत असलेला हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगात केलेली सर्व कामं यशस्वी होतात.
Karwa Chauth 2023 Puja Vidhi: करवा चौथची पूजा पद्धत
करवा चौथची पूजा संध्याकाळी चंद्रोदयानंतर केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठावं, आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. संध्याकाळच्या पूजेसाठी घराच्या भिंतीवर गेरूचा फलक बनवावा आणि त्या फलकावर करवाचं चित्र काढावं. सूर्योदयापूर्वी आंघोळ करून पूजा करावी. देवपूजा करून निर्जल व्रताची प्रतिज्ञा घ्यावी. चंद्र उगवण्याच्या एक तास आधी पूजा सुरू करावी.
Karwa Chauth Moon Time: करवा चौथ दिवशी चंद्रोदयाची वेळ
Karwa Chauth 2023: चंद्राला अर्घ्य अर्पण करून पूजा केल्यावरच करवा चौथचं व्रत पूर्ण होतं. आज 1 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 08.26 मिनिटांनी चंद्रोदय होईल.
Karwa Chauth 2023: आज साजरा केला जात आहे करवा चौथ
आज देशभरात करवा चौथचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवतात. या दिवशी महिला निर्जल व्रत पाळतात आणि रात्री चाळणीतून चंद्र पाहून उपवास सोडतात. हे व्रत सूर्योदयापासून सुरू होतं आणि चंद्रोदयानंतर समाप्त होतं.