(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kamada Ekadashi 2022: सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी करा कामदा एकादशीचे व्रत! जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त वेळ
Chiatra Ekadashi 2022 : प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीला एकादशीचे व्रत ठेवले जाते. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ‘कामदा एकादशी’ म्हणतात.
Kamada Ekadashi 2022 : प्रत्येक महिन्यात येणाऱ्या द्विपक्षीय एकादशीला एकादशीचे व्रत ठेवले जाते. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ‘कामदा एकादशी’ (Kamada Ekadashi 2022 ) म्हणतात. हिंदू नववर्षातील ही पहिली एकादशी आहे. या एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा केली जाते. एकादशीचा उपवास दशमीच्या दिवशी सूर्यास्ताच्या एक दिवस आधी सुरू होतो आणि द्वादशीच्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर सोडला जातो.
यावेळी कामदा एकादशी मंगळवार, 12 एप्रिल 2022 रोजी येत आहे. कामदा एकादशीचे व्रत केल्यास सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्याचबरोबर कोणत्याही पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी कामदा एकादशीचे व्रत करावे. पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी एकादशीचे व्रत फार महत्वाचे आहे. एकादशीचे व्रत केल्याने प्रेत योनीपासूनही मुक्ती मिळते. जाणून घेऊया कामदा एकादशीची तिथी, पूजा मुहूर्त आणि महत्त्व...
कामदा एकादशी 2022 तिथी आणि पूजा मुहूर्त
पंचांगानुसार, चैत्र शुक्ल एकादशी तिथी मंगळवार, 12 एप्रिल रोजी पहाटे 04:30 पासून सुरू होईल आणि 13 एप्रिल रोजी सकाळी 05:02 वाजता संपेल. उदयतिथीनिमित्त कामदा एकादशीचे व्रत 12 एप्रिल रोजी ठेवण्यात येणार आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग पहाटे 05.59 ते 08.35 पर्यंत आहे. त्याचबरोबर या काळात रवि योग देखील आहे. सर्वार्थ सिद्धी योगामध्ये भगवान विष्णूची उपासना करणे विशेष फलदायी असल्याचे मानले जाते.
कामदा एकादशी 2022 पराण वेळ
एकादशीचे पारण द्वादशीच्या दिवशी शुभ मुहूर्तानुसार केले जाते. एकादशीचे व्रत योग्य वेळी सोडले नाही, तर एकादशी व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. 13 एप्रिल रोजी पारण होणार आहे. पारणची अचूक वेळ दुपारी 01:39 ते दुपारी 04:12 अशी आहे.
कामदा एकादशीची पूजा विधी
या दिवशी भगवान विष्णूला फळे, फुले, दूध, तीळ, पंचामृत इत्यादी अर्पण केले जातात. या दिवशी व्रताची कथा अवश्य ऐकावी. तसेच, रात्रीच्या वेळी भगवान विष्णूची पूजा करावी आणि द्वादशीच्या दिवशी ब्राह्मण किंवा गरीब व्यक्तीला भोजन दिल्यावरच उपवास सोडावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)
हेही वाचा :