Jupiter Retrograde 2022: गुरुची वक्री चाल, 'या' 3 राशींचे बजेट बिघडणार, आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल
Jupiter Retrograde 2022: काही राशीच्या लोकांच्या खिशावर गुरूच्या वक्री चालीचा खोलवर परिणाम होणार आहे. जाणून घेऊया या बदलामुळे कोणत्या राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल
Jupiter Retrograde 2022: श्रावण महिन्यात अनेक ग्रह आपली जागा बदलतील. ग्रहांच्या संक्रमणामुळे काही राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडणार आहेत. 29 जुलै 2022 ला गुरु म्हणजेच बृहस्पती ग्रह मीन राशीत स्थलांतर करतील. गुरु हा आदर आणि आनंदाचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत, काही राशीच्या लोकांच्या खिशावर गुरूच्या वक्री चालीचा खोलवर परिणाम होणार आहे. जाणून घेऊया या बदलामुळे कोणत्या राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल, कोणाचे बजेट बिघडणार?.
सिंह
सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार, दिनचर्यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरीबद्दल बोलायचे झाले तर बदली होण्याची शक्यता आहे. यामुळे आर्थिक बजेट बिघडू शकते. व्यवसायात नवीन संधी मिळण्यासाठी वाणीवर संयम ठेवा.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी, गुरूची प्रतिगामी हालचाल त्यांच्या जीवनात खळबळ उडवून देईल. या काळात विरोधकांपासून सावध राहा. तसेच, कामाशी संबंधित प्रत्येक गोष्ट तुमच्या शुभचिंतकांशी शेअर करू नका. या काळात तुम्ही स्वतःची फसवणूक देखील करू शकता. मानसिक समस्या वाढू शकतात, त्यामुळे काळजी घ्या. अनावश्यक खर्चही होण्याची शक्यता आहे
मकर
मकर राशीच्या गुरूच्या प्रतिगामीपणामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. या दरम्यान, तुमचे मत मोकळेपणाने मांडा, जेणेकरुन लोकांच्या मनात तुमच्याबद्दल चुकीची छाप पडू नये. घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे धनहानी होऊ शकते. व्यवसायात पैशाच्या व्यवहारात सावध राहा. समाजात मान-सन्मान टिकवण्यासाठी कोणतेही वाईट काम करू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :