एक्स्प्लोर

Monthly Horoscope June 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी जून महिना कसा राहील? मासिक राशीभविष्य जाणून घ्या

June Monthly Horoscope : मासिक राशीभविष्याच्या दृष्टीने मेष ते कन्या राशीसाठी नवीन महिना महत्त्वाचा असणार आहे. या काळात काही राशींना शुभ फल प्राप्त होईल, तर काही राशींना अडचणींचा सामना करावा लागेल. जूनचं मासिक राशीभविष्य जाणून घ्या

June 2024 Monthly Horoscope : ग्रहांच्या स्थितीनुसार, जून महिना हा फार लाभदायी असणार आहे. या महिन्यात मंगळ, शुक्र आणि बुध आपल्या राशी बदलणार आहेत.  जून महिन्याची सुरुवात अपरा एकादशी आणि भागवत एकादशीने होणार आहे, त्यामुळे हा महिना अतिशय शुभ राहील. तसेच या महिन्यात अनेक मोठे ग्रहही आपली राशी बदलणार आहेत. या काळात काही राशींचं नशीब पालटेल, तर काही राशींना थोडी काळजी घेण्याची गरज आहे.

मेष आणि वृषभसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. जून महिना तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घ्या.

मेष (Aries Monthly Horoscope June 2024)

मासिक राशीभविष्यानुसार, जून महिना तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. या महिन्यात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या कोणत्याही कामात अडथळा येणार नाही. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. जूनमध्ये तुमची सर्व संकटं दूर होणार आहेत. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. मेष राशीच्या लोकांचं नशीब या महिन्यात उजळेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल. व्यवसायात चांगली प्रगती कराल. या महिन्यात तुम्हाला अनेक क्षेत्रांत विशेष लाभ मिळतील. या महिन्यात तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल. परदेशात जाण्याची दाट शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला पैशांची बचत करण्यात यश मिळेल. तुमचा बँक बॅलन्स वाढेल. 

वृषभ (Taurus Monthly Horoscope June 2024)

वृषभ राशीच्या लोकांसाठी जून महिना खूप महत्त्वाचा असणार आहे. या काळात काही कामानिमित्त परदेशात जाऊ शकता. या महिन्यात तुमच्या वैवाहिक नात्यात प्रेम वाढेल. तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं अधिक घट्ट होईल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील. तुम्ही सर्व आव्हानांवर मात कराल, तुमची एकाग्रता वाढेल. वृषभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक संबंध अनुकूल असतील. तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. करिअरच्या क्षेत्रात हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन मिळेल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. जून महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल. 

मिथुन (Gemini Monthly Horoscope June 2024)

तुम्हाला नोकरीची बदली दिली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. नवीन महिन्यात तुम्ही नोकरीच्या ठिकाणी वर्तन चांगले ठेवावे, अन्यथा तुम्हाला फटका बसू शकतो. तुमचे सहकारी तुम्हाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही शांत राहावं. व्यावसायिकांना जून महिन्यात पैशांचे व्यवहार जपून करावे. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, जोडीदाराशी किरकोळ वाद होतील. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि तुमचे विचार तुमच्या जोडीदारासमोर व्यक्त करा. मसाल्यांचे अन्न टाळावे, अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 

कर्क (Cancer Monthly Horoscope June 2024)

कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना चौफेर लाभाचा असेल. या महिन्यात तुमच्या अनेक जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील म्हणून तुम्ही खूप आनंदी व्हाल. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे मिळतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप मजबूत होईल. कर्क राशीचे लोक नवीन वाहन, नवीन जमीन किंवा प्लॉट खरेदी करू शकतात. तुमच्या करिअरसाठीही हा महिना अनुकूल राहील. विशेषत: नोकरी करणाऱ्यांना चांगला फायदा होईल. तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये जिव्हाळा राहील. या महिन्यात तुम्हाला चांगली प्रगती करण्याची संधी मिळेल. प्रवासात तुम्हाला फायदा होईल.

सिंह (Leo Monthly Horoscope June 2024)

सिंह राशीच्या लोकांसाठी जून महिना संमिश्र असणार आहे. या महिन्यात नशिबावर अवलंबून राहू नका. या काळात दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका, अचानक एखादा तुमचा विश्वासघात करू शकतो. जूनच्या मध्यात अचानक आर्थिक लाभ होईल. प्रेम जीवनात आनंद राहील. तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदाराकडून सरप्राईज मिळू शकतं. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित काही मोठे निर्णय घ्यावे लागतील. वैवाहिक जीवनात प्रेम राहील. नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.

कन्या (Virgo Monthly Horoscope June 2024)

कन्या राशीच्या लोकांना जून महिन्यात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अनेक ठिकाणांहून ऑफर लेटर मिळू शकतात. व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या, बाहेरचं अन्न टाळा. नोकरीत तुमच्या कामाला गती येईल. वेळोवेळी आर्थिक लाभ होईल. अनेक दिवस अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. या महिन्यात तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Shani Vakri : शनीची उलट चाल 'या' 4 राशींवर पडणार भारी; पुढच्या 5 महिने सावधानीचे, पाण्यासारखा पैसा वाया जाणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget