एक्स्प्लोर

Monthly Horoscope July 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जुलै महिना कसा राहील? मासिक राशीभविष्य जाणून घ्या

July Monthly Horoscope : ग्रहांच्या स्थितीनुसार, जुलै महिना हा फार लाभदायी असणार आहे. सामाजिक, आर्थिक, आरोग्य आणि कुटुंबाच्या दृष्टीकोनातून तुमचा महिना कसा जाईल? जाणून घ्या तूळ ते मीन राशीचं मासिक राशीभविष्य

July 2024 Monthly Horoscope : ग्रहांच्या स्थितीनुसार, जुलै महिना हा फार लाभदायी असणार आहे. या महिन्यात अनेक ग्रह आपली राशी बदलणार आहेत. जुलै महिन्याची सुरुवात योगिनी एकादशीने होणार आहे, त्यामुळे हा महिना अतिशय शुभ राहील. तसेच या महिन्यात अनेक मोठे ग्रहही आपली राशी बदलणार आहेत. या काळात काही राशींचं नशीब पालटेल, तर काही राशींना थोडी काळजी घेण्याची गरज आहे.

तूळ आणि वृश्चिकसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. जुलै महिना तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन  या 6 राशींचे मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घ्या.

तूळ (Libra Monthly Horoscope July 2024)

या महिन्यात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. या काळात अति बोलल्याने प्रेम संबंध खराब होऊ शकतात, त्यामुळे वाद टाळा. नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. व्यापाऱ्यांना जुलै महिन्यात त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल आणि पैसेही योग्य ठिकाणी गुंतवले जातील. विवाहित लोक हा काळ चांगला घालवतील. कुटुंबात लहान मुलाचं आगमन होण्याची देखील शक्यता आहे. या महिन्यात तूळ राशीचे लोक धार्मिक कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होतील आणि दानधर्मात पैसेही खर्च करतील. या महिन्यात तुम्हाला अहंकार टाळावा लागेल.

वृश्चिक (Scorpio Monthly Horoscope July 2024)

वृश्चिक राशीचे लोक या महिन्यात त्यांच्या नेतृत्व क्षमतेमुळे कामाच्या ठिकाणी चांगलं नाव कमावतील. जुलै महिन्यात व्यवसायात तुमच्या नशिबाचे तारे चमकणार आहेत. नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला अपेक्षित प्रगती आणि पदोन्नतीही मिळेल. हा महिना चांगला जाण्याची अपेक्षा आहे, कारण तुमच्या संपत्तीतही या काळात वाढ होण्याची शक्यता आहे. या महिन्यात पद, प्रतिष्ठा, पैसा, प्रशंसा, यश, सर्व काही मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठांचा सल्ला घेऊनच विद्यार्थ्यांनी करिअरमध्ये पुढे जावं. यावेळी आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

धनु (Sagittarius Monthly Horoscope July 2024)

धनु राशीच्या लोकांसाठी जुलै महिना भाग्याचा ठरेल, कारण या महिन्यात तुमचा व्यवसाय नवी उंची गाठेल आणि तुमच्याकडे भरपूर पैसाही जमा होईल. तुम्ही नोकरी करत असाल तर या महिन्या तुम्हाला भरपूर लाभ मिळतील. या महिन्यात धार्मिक किंवा व्यावसायिक प्रवास होण्याची शक्यता आहे, जो यशस्वी होईल. या महिन्यात तुम्हाला इच्छित यश आणि आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना करिअरच्या क्षेत्रातही चांगलं यश मिळेल. या दिवसात तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडूनही लाभ मिळू शकतो. एकंदरीत हा महिना खूप चांगला जाणार आहे.

मकर (Capricorn Monthly Horoscope July 2024)

मकर राशीच्या लोकांसाठी जुलै महिना लाभदायक ठरेल. संपत्तीच्या बाबतीतही या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. अचानक कुठूनतरी पैसे मिळण्याचे संकेत आहेत. यावेळी तुम्ही एखाद्याला आर्थिक मदत देखील कराल. मीडिया किंवा जनसंवादाशी संबंधित काम करणाऱ्यांना बढती मिळू शकते. या महिन्यात तुम्हाला घरात आई किंवा पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. जमीन आणि मालमत्ता खरेदीच्या बाबतीत जुलै महिना भाग्यवान ठरणार आहे. लहान मुलांपासून सावधगिरी बाळगा, कारण या दिवसात बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या आजारांपासून त्यांचं संरक्षण करावं लागेल. या महिन्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचे संबंध दृढ बनतील.

कुंभ (Aquarius Monthly Horoscope July 2024)

कुंभ राशीच्या अविवाहितांना या महिन्यात चांगलं स्थळ येईल. नोकरदारांना पगारवाढ मिळेल आणि पदोन्नती होईल. यावेळी तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत फिरायलाही जाऊ शकता. कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायातही हा महिना यश देईल. यावेळी पालकांच्या आरोग्याची चिंता असू शकते. या महिन्यात तुम्ही काही धाडसी निर्णयही घेऊ शकता. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ फारशी लाभदायक नाही, त्यामुळे भागीदारीत मोठे आर्थिक निर्णय घेणं टाळा. रोमान्ससाठीही हा महिना चांगला म्हणता येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सावधगिरी बाळगणंही खूप गरजेचं आहे.

मीन (Pisces Monthly Horoscope July 2024)

मीन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना लाभदायक ठरू शकतो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं भविष्यात चांगलं सिद्ध होऊ शकतं. या महिन्यात कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याचीही शक्यता निर्माण होत आहे. पार्टी, पिकनिकचा आनंदही घ्याल. या महिन्यात नक्षत्रं पैशाच्या दृष्टीने अनुकूल आहेत, परंतु तरीही सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. व्यापारी वर्गासाठी हा महिना अनुकूल आहे. या दिवसात वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे नातं आणखी बिघडू शकतं. त्यामुळे बोलण्याकडे लक्ष द्यावं लागेल. यावेळी नोकरदार लोकांना चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. अविवाहितांना चांगला जोडीदार मिळण्यासही हा महिना मदत करेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Monthly Horoscope July 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी जुलै महिना कसा राहील? मासिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget