Janmashtami 2025 : पैसा, प्रतिष्ठा आणि पार्टनर...जन्माष्टमीनंतर 'या' राशींना लागणार जॅकपॉट; लक्ष्मी नारायण योगामुळे मिळतील फायदेच फायदे
Janmashtami 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह सध्या कर्क राशीत स्थित आहे. 21 ऑगस्ट 2025 रोजी शुक्र ग्रहसुद्धा याच राशीत संक्रमण करणार आहे. यामुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होणार आहे.

Janmashtami 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनुसार राशी परिवर्तन करतात. कधी कधी एकाच राशीत दोन ग्रहांची युती होते यामुळे अनेक शुभ अशुभ योग निर्माण होतात. जेव्हा ग्रहांची स्थिती शुभ असते तेव्हा सर्व राशींना लाभ मिळतो. मात्र, जर ग्रहांची स्थिती अशुभ असेल तर काही राशींना संकटांचा सामना करावा लागतो. या ठिकाणी आपण जन्माष्टमीनंतर (Janmashtami) कोणकोणत्या राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे याविषयी जाणून घेणार आहोत.
ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह सध्या कर्क राशीत स्थित आहे. 21 ऑगस्ट 2025 रोजी शुक्र ग्रहसुद्धा याच राशीत संक्रमण करणार आहे. यामुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होणार आहे. जेव्हा शुक्र आणि बुध ग्रह एकाच राशीत असतात तेव्हा लक्ष्मी नारायण योग जुळून येतो. या काळात तीन राशींना सर्वात जास्त फायदा होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी हा लक्ष्मी नारायण योग फार प्रभावशाली असणार आहे. या काळात तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, जुन्या कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, नवीन प्रकल्प हाती येण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग फार सकारात्मक ठरणार आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. रिलेशनशिपमध्ये तुमचा चांगला प्रभाव दिसून येईल. तसेच, देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहून तुम्हाला आशीर्वाद देील. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांवर लक्ष्मी नारायण योगामुळे फार सकारात्मक परिणाम पडणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडतील. सेच, जर तुम्हाला नवीन घर किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ फार शुभ्र असणार आहे. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. धार्मिक कार्यात तुमचा रस वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















