(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today, September 17, 2022 : मिथुन, कन्यासह ‘या’ राशींची आर्थिकस्थिती सुधारणार! जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today, September 17, 2022 : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चिक असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वाचा संपूर्ण राशीभविष्य...
Horoscope Today, September 17, 2022 : सूर्याने आज कन्या राशीत प्रवेश केला आहे. आज रोहिणी नक्षत्र असून, चंद्र वृषभ राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चिक असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वाचा संपूर्ण राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चिक असणार आहे. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. परंतु, अनावश्यक खर्च तुम्हाला त्रासदायक ठरतील. यामुळे आर्थिक बजेटही कोलमडू शकते. ताणताणावातून मुक्ती मिळेल. मित्रांच्या मदतीमुळे अनेक अडचणी दूर होतील. वैयक्तिक कामात कोणाचाही सल्ला घेणे टाळावे लागेल. अन्यथा तुमचे निर्णय चुकू शकतात.
वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस उत्साही आणि आनंदाचा असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमची हातातील कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आरोग्य चांगले असल्याने आनंदाची भावना निर्माण होईल. नातेवाईक किंवा मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. बाहेर फिरायला जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. आज आर्थिक लाभ होण्याची शक्यताही आहे.
मिथुन (Gemini Horoscope) : आज तुमची कामे वेळेत पूर्ण होतील. जर, तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस खूप चांगला आहे. एखाद्या मित्रासोबत बाचाबाची होऊ शकते. पण नंतर सर्व काही ठीक होईल. जोडीदाराच्या पाठिंब्याने तुम्हाला काही मोठ्या कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. गुंतवणूक करायची असेल तर आजच करा, फायदा होईल.
कर्क (Cancer Horoscope) : आत्मविश्वास वाढेल, पण संयम ठेवा. अनावश्यक राग आणि वाद टाळा. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात वाढ होईल. लाभाच्या संधी मिळतील. बोलण्यात संयम बाळगा. व्यवसायात वाढ होईल. मालमत्ता उत्पन्नाचे नवे साधन बनू शकते. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. स्थलांतराचीही शक्यता वर्तवली जात आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
सिंह (Leo Horoscope) : आज प्रत्येक कामात नशीब तुमची साथ देईल. तुमचे विरोधक तुमच्या विरोधात कट रचण्यात अपयशी ठरतील. ऐहिक सुखाच्या साधनांवर चांगला खर्च झाल्यामुळे आनंद वाटेल. नात्यांमधील कटुता परस्पर सामंजस्याने संपुष्टात येईल. विचारपूर्वक केलेली कामे लवकर पूर्ण होतील. व्यावसायिक योजनांचे चांगले फळ मिळू शकते. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
कन्या (Virgo Horoscope) : आज आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रगतीच्या संधी मिळतील. कोणतेही काम उद्यासाठी पुढे ढकलू नका, अन्यथा ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. सर्व कामे वेळेवर पूर्ण केल्याने कौतुक होईल. ज्यामुळे शत्रू तुमचा हेवा करतील. क्षेत्रात नवीन काही करण्याचा विचार असेल, तर नक्कीच करा. विरोधकांना घाबरण्याची गरज नाही. तुमचा एखादा मित्र मदतीसाठी पुढे येऊ शकतो.
तूळ (Libra Horoscope) : कोणत्याही महत्त्वाच्या कामात भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल. कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होऊ शकते. कामात उत्साह वाटेल. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. तुमची सर्वत्र प्रशंसा होईल. व्यवसायाच्या दृष्टीने केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमची सर्जनशील प्रतिभा सर्वांसमोर येईल. आर्थिक स्थितीही चांगली राहील. मेहनतीचे फळ मिळेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. दैनंदिन कामे लवकर पूर्ण झाल्याने, तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकाल. मित्रांसोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रम होईल. एखाद्या ठिकाणी भेट देण्याचा कार्यक्रम करू शकता. व्यवसाय आणि भागीदारीच्या कामात लाभ होईल. सार्वजनिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल.
धनु (Sagittarius Horoscope) : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामात यश मिळवून देणारा असेल. घरात पैसा आणि अन्नधान्य बरकत होईल. तसेच, आज तुमचे शत्रू तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत. एखाद्या शुभ कार्यात भरपूर खर्च होऊ शकतो. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. इतरांचे सहकार्य घेण्यात यश मिळेल. व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल.
मकर (Capricorn Horoscope) : काही कामानिमित्त केलेला प्रवास लाभदायक ठरेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील नातेवाईकाच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. काही खास लोकांची भेट होईल. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगले ग्राहक मिळतील. आर्थिक स्थितीतल सुधारणा होऊ शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कुंभ (Aquarius Horoscope) : आज तुम्हाला नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल, परंतु कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा. कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. मात्र, दुपारनंतर परिस्थिती बदलेल. एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळ निर्माण होईल. एखाद्याच्या बोलण्याने आणि वागण्याने मन दुखावले जाईल. घर किंवा जमिनीच्या कागदपत्रांशी संबंधित कोणतेही काम करू नका.
मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष लाभदायी असणार आहे. सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते, त्यामुळे त्यांचा पगारही वाढू शकतो. चांगल्या कामामुळे तुम्ही नोकरीच्या ठिकाणी नवीन ओळख निर्माण करू शकाल. अधिकाऱ्यांकडून स्वतःची प्रशंसा ऐकून तुम्हाला आनंद होईल. व्यवसायात नफ्याच्या अनेक संधी मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या