Horoscope Today, May 27, 2022 : 'या' राशींच्या लोकांची इच्छा होईल पूर्ण; जाणून घ्या आजचं राशीभविष्य
वृषभ आणि सिंह या राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण होईल. जाणून घेऊयात आजचं राशीभविष्य...
Horoscope Today, May 27, 2022 : आज शुक्रवार आहे. आजच्या दिवशी मेष, कर्क आणि मीन राशींच्या लोकांना उद्योगामध्ये लाभ होईल. तर वृषभ आणि सिंह या राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण होईल. जाणून घेऊयात आजचं राशीभविष्य...
मेष (Aries Daily Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी असणार आहे. आज धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग घेतल्यानं मानसिक शांती मिळेल. ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी दिवस चांगला जाईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल.
वृषभ (Taurus Daily Horoscope)
आज तुम्हाला कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल, परंतु तुमच्या शेजारच्या व्यक्तीमध्ये भांडणे होत असतील तर तुम्ही त्यात पडणे टाळावे अन्यथा वाद होतील. आज मुलाकडून काही कामे होतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. इच्छा पूर्ण होईल.
मिथुन (Gemini Daily Horoscope)
आज खूप पैसे खर्च होतील. जर तुम्ही एखाद्या कामात गुंतवणूक केलीत तर त्यात तुमचे नुकसानही होऊ शकते. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना मित्राच्या मदतीने आर्थिक लाभ होऊ शकतात.
कर्क (Cancer Daily Horoscope)
तुमच्या बुद्धिमत्तेुळे तुम्हाला काही नवीन कामेही कळतील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसाठी काही भेटवस्तू घेऊन येऊ शकता. राजकारणाच्या दिशेने काम करणाऱ्यांनी सावध राहावे लागेल.
सिंह (Leo Daily Horoscope)
मौल्यवान वस्तू मिळतील. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. परंतु मुलांची तब्येत अचानक बिघडल्याने तुम्ही त्रस्त व्हाल. संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.गरिबांना मदत करण्याची संधी मिळाली तर नक्की करा.
कन्या (Virgo Daily Horoscope)
मित्रांच्या भेटीमुळे तुम्ही प्रसन्न राहाल. तुम्ही मित्रांसोबत हँग आउट करण्याची योजना कराल, अविवाहित लोकांच्या जीवनात नवीन पाहुणे येऊ शकतात. तुमचा आईशी वाद होऊ शकतो
तूळ (Libra Daily Horoscope)
जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचे अधिकार वाढतील, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. परंतु तरीही तुम्हाला संयमाने काम करावे लागेल, तरच तुम्ही यश मिळवू शकाल. तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो.
वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. पण तुमच्यासमोर असे काही खर्च असतील, जे तुम्हाला करावे लागतील. तुमच्या मुलाकडून कोणतीही चांगली बातमी मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल. जर तुम्हाला डोळ्यांशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही त्यामध्ये वैद्यकीय सल्ला घ्यावा.
धनु(Sagittarius Daily Horoscope)
आज तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये काही कमतरता जाणवेल, परंतु व्यवसायात तुम्हाला तुमच्या मनातील काहीही इतरांसमोर उघड करण्याची गरज नाही. तुम्ही असे केल्यास इतर लोक त्याचा फायदा घेतील. मुलांच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर ते नाराज होतील.
मकर (Capricorn Daily Horoscope)
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील, कारण त्यांच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. तुमच्या निर्णय क्षमतेचा फायदा तुम्हाला मिळेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्याच्या भविष्याशी संबंधित निर्णय घ्यावा लागेल.
कुंभ (Aquarius Daily Horoscope)
भविष्यासाठी नवीन योजना आखाव्या लागतील. आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. चांगले कर्म केल्याने तुमच्या कुटुंबाचे नाव उज्वल होईल, यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी राहतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या समस्यांसाठी शिक्षकांचा सल्ला घ्यावा लागेल.
मीन (Pisces Daily Horoscope)
करिअरच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल, कारण तुम्हाला नोकरीची चांगली संधी मिळू शकते, परंतु कुटुंबात सुरू असलेल्या कलहामुळे तुमच्या मनात अशांतता राहील. व्यवसायात तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे लाभ मिळतील, ज्यामुळे तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :
- 'या' राशीच्या लोकांना त्रास देण्यासाठी येणार शनि, चुकूनही करून नका 'हे' काम
- Mars Transit 2022 : 'या' राशींच्या लोकांच्या वाढणार अडचणी
- Astrology : 'या' राशींच्या व्यक्ती पैशांचा करतात योग्य वापर