Horoscope Today, May 22, 2022 : आज सूर्योदयाच्या वेळी चंद्र धनिष्ठ नक्षत्र आणि मकर राशीत आहे. दुपारी 12.57 नंतर चंद्र कुंभ राशीत प्रवेश करेल. गुरु मीन राशीत आहे आणि सूर्य शुक्र वृषभ राशीत आहे. वृषभ, मीन, मकर या राशीच्या लोकांनी आज इतरांच्या सल्ल्याकडे लक्ष न देता स्वतःच्या निर्णयांना प्राधान्य दिले पाहिजे. जाणून घ्या आजचे संपूर्ण राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : आज तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, अन्यथा कुटुंबात मतभेद होऊ शकतात. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. रखडलेले काम पूर्ण होईल. ऑफिसमध्ये आज तुमचे कौतुक होईल. कार्यक्षेत्राच्या विस्तारात मित्राची साथ मिळेल. पैशाच्या बाबतीत यश मिळेल.
वृषभ (Taurus Horoscope) : गुंतवणूक फायदेशीर ठरेल. धार्मिक कार्यात रुची राहील. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. घरात सकारात्मकता राहील. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकते. इतरांची मदत घेण्यापेक्षा स्वतःच्या निर्णयाला प्राधान्य द्या. व्यवसायात गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. अनावश्यक वादात अडकणे टाळा. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. संभाषणात संयम बाळगा.
मिथुन (Gemini Horoscope) : आई-वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे जाल. शारीरिकदृष्ट्या तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तुम्हाला कठोर परिश्रमाचे चांगले परिणाम दिसतील. रागाचा अतिरेक टाळा. शत्रूंवर विजय मिळेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन गोष्टी शिकण्यात थोडा वेळ जाईल. जवळच्या व्यक्तीकडून वाईट बातमी मिळू शकते.
कर्क (Cancer Horoscope) : अनावश्यक खर्चापासून दूर राहून अत्यावश्यक खर्चाला प्राधान्य द्या. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. खर्च वाढतील. कौटुंबिक मतभेद होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक समस्या कमी होऊ शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्राची साथ मिळेल.
सिंह (Leo Horoscope) : जास्त कामामुळे थकवा येईल. आरोग्याच्या बाबतीत कुरबुरी सुरु होतील. नवीन ठिकाणाहून फायदा होऊ शकतो. घरातील समस्या बाहेरच्या व्यक्तीसोबत शेअर करू नका. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन काम सुरू करण्याचा विचार करू शकता. कोणताही करार अंतिम स्वरूप घेऊ शकतो. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
कन्या (Virgo Horoscope) : व्यवसायात मोठे यश मिळेल. परदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते. एखादा जुना व्यावसायिक सौदा तुम्हाला अचानक नफा देऊ शकतो, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आज सुरु केलेल्या कामात यश मिळेल. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो. आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल, अन्यथा फसवणूक होऊ शकते.
तूळ (Libra Horoscope) : नातेवाईकांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. वागण्यातील आक्रमकतेमुळे लोक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक योजना सहजपणे पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळा. तसेच, कोणाशीही पैशाची देवाणघेवाण करू नका.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. पुढे जाण्यासाठी नवीन योजना आखू शकता. व्यापार्यांसाठी दिवस चांगला राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. लाभाच्या संधी मिळतील.
धनु (Sagittarius Horoscope) : नवीन कामात फायदा होईल. गुंतवणुकीचा विचार कराल. हितचिंतकांचा सल्ला घ्यावा. तुम्ही जे काम करण्याचा प्रयत्न करत आहात, त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील. कोणतेही महत्त्वाचे काम करताना घरातील अनुभवी सदस्यांचा सल्ला घ्या. नोकरीच्या ठिकाणी कोणतेही काम काळजीपूर्वक करा. अनावश्यक वादात पडणे टाळा.
मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाऊ शकता. कार्यालयातील सहकाऱ्यांशी एखाद्या प्रकल्पाबाबत किरकोळ वाद होऊ शकतात. व्यवसायातही काळजी घ्यावी लागेल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. इतरांच्या सल्ल्यावर जास्त विसंबून राहू नका, अन्यथा अडचणीत येऊ शकता.
कुंभ (Aquarius Horoscope) : पूर्ण एकाग्रतेने स्वतःच्या कामांवर लक्ष केंद्रित करा. आज कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे हानिकारक ठरेल. नात्यातही दुरावा येऊ शकतो. नोकरी शोधणाऱ्यांना इच्छित नोकरी मिळाल्याने आनंद होईल. नवीन काम सुरू करू शकाल. काही जुन्या गोष्टींमुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. शेअर मार्केटशी संबंधित लोकांना उत्कृष्ट लाभ मिळू शकतो. कोणाशीही वाद घालणे टाळा. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.
मीन (Pisces Horoscope) : आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, आहाराकडे लक्ष द्या. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. वडिलधाऱ्यांचा सल्ला घेऊनच आज व्यवसायात नवीन काम सुरू केले, तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. कामाच्या ठिकाणी गडबड होऊ शकते. मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी काही महत्त्वाच्या योजना आखल्या जातील. इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या निर्णयांना प्राधान्य द्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :