Astrology, Zodiac Sign : आपल्यावर भरभरून प्रेम करणारी व्यक्ती प्रत्येकालाच आवडते. ज्योतिष शास्त्रात कुंडलीचे पाचवे घर प्रेमाचे मानले जाते. यासोबतच जेव्हा एखाद्या कुंडलीमधील या घरात शुभ राशी किंवा ग्रह असतात, तेव्हा असे लोक आपल्या प्रिय व्यक्तीला खूप आनंदी ठेवतात. प्रेम मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. असे लोक खूप रोमँटिक असतात. चला तर, जाणून घेऊया कोणतीय ही रास...


एकूण बारा राशींपैकी ही रास आहे ‘मिथुन’ (Gemini). मिथुन राशीचे लोक प्रेमाच्या बाबतीत इतरांपेक्षा खूप वेगळे असतात. ते सच्चे प्रेमी आहेत. ते एखाद्या व्यक्तीवर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करू शकतात. ते कधीही प्रेमात कुणाला फसवू शकत नाहीत. त्यांचे प्रेम इतके उत्कट असते की, कधीकधी ते समोरच्या व्यक्तीसाठी समस्या देखील निर्माण करते.  मिथुन राशीच्या व्यक्ती प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात. या राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव दिसतो.


मैत्रीपूर्ण रास!


ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन ही तिसरी राशी मानली जाते. या राशीचे चिन्ह जुळ्या व्यक्ती आहेत, जे दर्शवतात की या राशीचे लोक आकर्षक आणि मैत्रीपूर्ण स्वभावाचे आहेत. ते लगेचच कोणाशीही मैत्री करू शकतात. मिथुन राशीचा अधिपती ग्रह बुध आहे. बुध हा ग्रहांचा राजकुमार आहे, असे म्हटले जाते. बुध हा सौम्य ग्रह आहे. हा ग्रह जेव्हा शुभ असतो, तेव्हा तो माणसाला ज्ञानी बनवतो. ज्या लोकांचे नाव 'क', 'छ' आणि 'घ' ने सुरू होते, त्यांची रास मिथुन असते.


खूप सर्जनशील असतात मिथुन राशीचे लोक!


बुध ग्रहाच्या प्रभावामुळे या राशीचे लोक चांगले वक्ते, कवी, गीतकार, लेखक, स्टँड-अप कॉमेडियन आणि गायक देखील असतात. बुधामुळे त्यांच्या स्वभावात चंचलता आढळते, ते अधिक कल्पनाशील असतात. रोमान्सच्या बाबतीत ते इतरांपेक्षा चांगले मानले जातात. प्रेमाच्या बाबतीत ते गंभीर आणि निष्ठावान असतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


हेही वाचा :