एक्स्प्लोर

Horoscope Today, June 2, 2022 : वृषभ, मकरसह ‘या’ राशींना अनुभवी लोकांचा सल्ला घेणे ठरेल लाभदायी! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, June 2, 2022 : मेष राशीच्या लोकांना विशेष कामात यश मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. जाणून घ्य आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, June 2, 2022 : आज आद्रा नक्षत्र आहे. चंद्र मिथुन राशीत आहे. शनि आज कुंभ राशीत आहे. गुरु स्वराशी मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना विशेष कामात यश मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. जाणून घ्य आजचे राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज तुम्हाला काही विशेष कामात यश मिळू शकते. तुमच्या कार्यक्षमतेने लोक प्रभावित होतील. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित काही काम असेल, तर तेही आज होऊ शकते. विद्यार्थ्यांनी वाईट संगती व सवयींपासून दूर राहावे. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन व सल्ले पाळा. नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये मोठा सन्मान मिळू शकतो. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची दाट शक्यता आहे.

वृषभ (Taurus Horoscope) : प्रतिष्ठित लोकांच्या भेटीमुळे तुमच्या व्यक्तिमत्वातही भर पडेल. इतरांची मदत घेण्यापेक्षा तुमच्या निर्णयाला प्राधान्य द्या. यावेळी नशीब तुमच्या सोबत आहे. सर्व जबाबदाऱ्या स्वतः घेण्याऐवजी त्या वाटून घ्यायला शिका, अन्यथा तुमचे वैयक्तिक काम अपूर्ण राहू शकते. व्यवसायात गुंतवणूक करताना अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चिक असणार आहे.

मिथुन (Gemini Horoscope) : अचानक तुम्ही कामाच्या बाबतीत उदासीन होऊ शकता. नवीन काम शिकण्यात थोडा वेळ जाईल. जवळच्या व्यक्तीकडून वाईट बातमी मिळू शकते. त्यामुळे काही महत्त्वाची कामे पुढे ढकलली जाऊ शकतात. कोणाचा सल्ला स्वीकारण्यापूर्वी त्यावर योग्य चर्चा करा. कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये तुमचा प्रभाव कायम राहील. व्यावसायिक लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.

कर्क (Cancer Horoscope) : एखाद्या जवळच्या व्यक्तीची समस्या सोडवण्यात विशेष भूमिका बजावू शकता आणि तुमच्या निर्णयाचे कौतुक होईल. घराच्या नूतनीकरणाची योजना पूर्ण होतील. अनावश्यक खर्चापासून दूर राहा आणि महत्त्वाच्या खर्चाला प्राधान्य द्या. व्यवसायाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे फायदेशीर ठरेल. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. एखादे अवघड काम तुम्ही सहज पूर्ण करू शकाल.

सिंह (Leo Horoscope) : मन अस्वस्थ होऊ शकते. स्वावलंबी व्हा. पालकांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक कार्यात रस घ्याल. कामासाठी प्रवासाला जाऊ शकता. आत्मविश्वास भरपूर असेल. वडिलांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. गुंतवणूक आणि नोकरीत लाभ मिळेल. व्यवसाय चांगला चालेल. कार्याच्या विस्तारासाठी योजना आखल्या जातील. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा.

कन्या (Virgo Horoscope) : वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेबाबत काही वाद सुरू असतील, तर त्यावर आज तोडगा मिळेल. हितचिंतकाच्या प्रेरणेने तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकता. काहीही बोलतांना अपशब्द वापरू नका, त्यामुळे तुमची प्रतिष्ठा खराब होऊ शकते. अनावश्यक कामांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी करिअरवर लक्ष केंद्रित करा. व्यावसायिक दृष्टिकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे.

तूळ (Libra Horoscope) : आर्थिक योजना सहजपणे पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. रोजच्या कामातून आराम मिळण्यासाठी आज एकांतात थोडा वेळ घालवा. रागाच्या ऐवजी शांतपणे नकारात्मक परिस्थिती सोडवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी अभ्यासाबाबत बेफिकीर राहिल्याने त्यांच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. व्यवसायातील मंदीचा तुमच्या व्यवसायावरही परिणाम होऊ शकतो.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : मेहनतीने काही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, यामुळे यश मिळेल. जवळच्या नातेवाईकालाही मदतीची गरज भासू शकते. तुम्हाला नकारात्मक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. नवीन योजना सुरू होतील. मुलांची प्रगती शक्य आहे. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कामे पूर्ण होतील. मन शांत राहील. मित्राच्या मदतीने आर्थिक लाभ होतील.

धनु (Sagittarius Horoscope) : आज महत्त्वाचा दिवस आहे, तो आपल्या प्रियजनांसोबत उत्साहाने साजरा करावा. तुमच्या नेतृत्वामुळे आर्थिक फायदा होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची आज निराशा होईल. काही लोक कामात अडथळा आणू शकतात. आजूबाजूच्या लोकांबद्दल जागरूक रहा. जवळचा मित्र किंवा नातेवाईक भेटल्याने तुम्हाला त्रासातून आराम मिळेल. आळस आणि राग यामुळे गोष्टी बिघडू शकतात.

मकर (Capricorn Horoscope) : खूप दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. आज तुम्ही मुलांच्या समस्या ऐका आणि त्यावर उपाय शोधा. कौटुंबिक उपक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमांवरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, हे लक्षात ठेवा. न्यायालयात कोणतेही प्रकरण प्रलंबित असल्यास अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानेच ते दूर करा. कामाचा ताण जास्त असला तरी कामात घाई करू नका, काम बिघडू शकते.

कुंभ (Aquarius Horoscope) : वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. एखाद्या व्यक्तीशी भांडण किंवा वादाची परिस्थिती उद्भवू शकते. कामाच्या ठिकाणी स्पर्धक सक्रिय होऊ शकतात. घरातील वातावरण आनंददायी आणि चांगले ठेवता येईल. नकारात्मक कामांपासून दूर राहा. मनात कोणत्याही प्रकारची उत्सुकता असेल, तर वरिष्ठांकडून मार्गदर्शन घ्यावे. त्यांच्या मार्गदर्शनाने तुमचा मार्ग सुकर होईल.

मीन (Pisces Horoscope) : वैवाहिक सुखात वाढ होईल. व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे. एखाद्या मित्राची मदत मिळू शकते. रखडलेले पैसे परत मिळू शकतात. आत्मविश्वास कमी होईल. मानसिक त्रास वाढू शकतो. कुटुंबात धार्मिक कार्य होईल. लांबच्या प्रवासाला जावे लागेल. एखाद्या खास व्यक्तीच्या सहवासात राहिल्याने तुमच्या विचारातही सकारात्मक बदल होऊ शकतो. कोणत्याही अडचणीत जवळच्या लोकांचे योग्य सहकार्य मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 23 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सWalmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखलABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Horoscope Today 23 January 2025 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Income Tax Raid At Pushpa 2 Director House: 'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Embed widget