एक्स्प्लोर

Horoscope Today, July 24, 2022 : मेष ते मीन राशींच्या लोकांसाठी कसा असणार आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, July 24, 2022 : मेष राशीच्या लोकांना पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल.

Horoscope Today, July 24, 2022 : आज रोहिणी नक्षत्र आहे. चंद्र वृषभ राशीत आहे. शनि आज मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आणि सूर्य मिथुन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : कौटुंबिक आणि कार्यालयीन गोष्टींमध्ये सामंजस्य ठेवाल, तर वाद कमी होतील. बोलण्यात संयम ठेवणे फायदेशीर ठरेल, अन्यथा भांडण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्ही फक्त तुमच्या विचारांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मित्रांकडून लाभ मिळेल. व्यावसायिकांनी पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा त्रास होऊ शकतो.

वृषभ (Taurus Horoscope) : मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्याची ओढ वाढेल. आज सुरू केलेल्या व्यवसायात यश मिळेल. बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहेत. दृढ विचारांमुळे तुम्ही तुमचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल. कल्पनाशक्तीला अधिक वाव मिळेल. सर्जनशील कार्यात रस घ्याल. व्यवसाय आणि नोकरदार लोकांना कोणतेही अपूर्ण काम पूर्ण केल्याने खूप दिलासा मिळेल.

मिथुन (Gemini Horoscope) : प्रत्येक कामात काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद होऊन तुमचे नुकसान होऊ शकते. कुटुंब आणि मुलांशी मतभेद होऊ शकतात. अचानक येणाऱ्या खर्चाच्या बोजला सामोरे जाण्यासाठी तयार राहा. आज व्यर्थ धावपळ होईल. धार्मिक कार्याकडे कल वाढेल. कुटुंबासोबत खरेदीला गेल्याने खर्च वाडू शकतो. एखाद्या स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना खूप मेहनत करावी लागू शकते.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस या राशीसाठी खूप खास असणार आहे. आज सुरु केलेल्या कामात यश मिळेल. तरुणांना करिअरशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात लाभ होईल. उत्पन्नाच्या स्त्रोतात वाढ होऊ शकते. नोकरदार लोक आपली कामे पूर्ण करण्यासाठी शक्य ती मेहनत करतील. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. मात्र, प्रेमाच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.

सिंह (Leo Horoscope) : नोकरी आणि व्यवसायासाठी लाभदायक दिवस आहे. आपापल्या क्षेत्रात वर्चस्व आणि प्रभाव पाडण्यास सक्षम असाल. पूर्ण आत्मविश्वास आणि दृढ मनोबलामुळे तुमचे काम सहज पूर्ण होईल. अधिकारीवर्ग तुमच्या कामाचे कौतुक करेल. पदोन्नतीची शक्यता आहे. खर्च वाढल्याने आर्थिक परिस्थितीवर परिणाम होईल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांच्या कामात वाद होण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo Horoscope) : आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप मेहनत करावी लागेल. शत्रूंपासून सावध राहा, ते विश्वासघात करू शकतात. व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा, अन्यथा नुकसान होऊ शकते. जोडीदारासोबत एखाद्या विषयावर वाद होऊ शकतो. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. आर्थिक लाभ होईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. उत्पन्न वाढवण्याचे नवे मार्ग खुले होतील.

तूळ (Libra Horoscope) : अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, आज नवीन काम सुरू करू नका. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गुप्त शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. मनातील विचार मित्रांनाही सांगू नका. अतिघाईमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. अविवाहित लोकांसाठी चांगले स्थळ येऊ शकते.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या. संध्याकाळी कुटुंबासह धार्मिक सहलीला जाऊ शकता. मित्र किंवा कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. सार्वजनिक जीवनात तुमची प्रतिष्ठा वाढेल. वैवाहिक जीवनात चांगले क्षण अनुभवाल. प्रिय व्यक्तीशी भेट होईल.

धनु (Sagittarius Horoscope) : आर्थिक आणि व्यावसायिक कार्यक्रमांसाठी आजचा दिवस शुभ आहे. कामे सहज पूर्ण होतील. मनात परोपकाराची भावना असेल. तुमचा दिवस आनंदात जाईल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल आणि सन्मान मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण होईल. जोडीदारासोबत प्रेमाचे क्षण अनुभवाल. तुमचे नाते अधिक घट्ट होईल. आज तुम्हाला एखादी नवीन व्यक्ती भेटू शकते.

मकर (Capricorn Horoscope) : आज सुरु केलेल्या कामात यश मिळेल. नातेवाईक घरी येऊ शकतात. बोलण्यात खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. समाजात तुमची बदनामी होण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबत आनंदात वेळ जाईल. शेअर बाजार किंवा गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकेल.

कुंभ (Aquarius Horoscope) : नकारात्मक विचारांमुळे मनात निराशा येईल. काळजी करण्यासारखे एखादे मोठे कारण असू शकते. मनात रागाची भावना जास्त राहील. खर्च वाढतील. बोलण्यात संयम न ठेवल्याने कुटुंबात मतभेद आणि भांडण होण्याची शक्यता आहे. तब्येत खराब राहील. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. लग्नाशी संबंधित चर्चा घरात होऊ शकतात.

मीन (Pisces Horoscope) : आज दिवसाच्या सुरुवातीला काही चांगली बातमी मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मित्रांसोबत आजचा दिवस मजेत जाईल. वैचारिक स्थिरतेमुळे आज तुमची कामे चांगल्या प्रकारे पूर्ण होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. भाऊ-बहिणींकडून लाभ होईल. कामात यश मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस
Shahada Accident : भीषण अपघात! प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर तर दोघांची प्रकृती चिंताजनक, कारचा अक्षरश: चक्काचूर
भीषण अपघात! प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर, तर दोघांची प्रकृती चिंताजनक, कारचा अक्षरश: चक्काचूर
Akola News : कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
Nanded Municipal Election 2026: 'एक वेळेस संधी द्या, वर्षभरात विकास झाला नाही तर राजीनामा देईन'; ठाकरे गटाच्या महिला उमेदवाराकडून थेट शासकीय बाँडवर हमी!
'एक वेळेस संधी द्या, वर्षभरात विकास झाला नाही तर राजीनामा देईन'; ठाकरे गटाच्या महिला उमेदवाराकडून थेट शासकीय बाँडवर हमी!
Kolhapur Municipal Corporation Election: 'निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही' कोल्हापुरात 'आप' राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांचे मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र
'निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही' कोल्हापुरात 'आप' राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांचे मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र
Embed widget