Horoscope Today, July 22, 2022 : वृषभ. कन्यासह ‘या’ राशींना घ्यावी लागणार अधिक काळजी! जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today, July 22, 2022 : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल. तर, वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक समस्या निर्माण होईल.
Horoscope Today, July 22, 2022 : आज भरणी नक्षत्र आहे. चंद्र मेष राशीत आहे. शनि आज मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे आणि सूर्य आता कर्क राशीत आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल. तर, वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक समस्या निर्माण होईल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यही चांगले राहील. आज तुम्ही केलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. नोकरीत नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. नवीन लक्ष्य मिळू शकेल. घरातील वातावरण आनंदाचे राहील. आज तुम्ही यशस्वी व्हाल. यशामागे कुटुंबीयांचाही विशेष हातभार असेल.
वृषभ (Taurus Horoscope) : आज तुम्ही स्वतःच्या कामात अडथळे निर्माण करू शकता. नवा वाद निर्माण होऊ शकतो. खर्च वाढत राहिला, तर आर्थिक समस्या निर्माण होईल. तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. मन अनेक प्रकारच्या चिंतांनी वेढलेले असेल. आरोग्यही नरम राहील. कोणतेही नवीन काम सुरू करण्याऐवजी अपूर्ण काम करण्याचा प्रयत्न करा. वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्या.
मिथुन (Gemini Horoscope) : नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा वाढेल. मित्रांकडून फायदा होईल आणि त्यात पैसाही खर्च होईल. दिवस आनंददायी जाईल. योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. जास्त आळशीपणामुळे उत्साह कमी होईल. परंतु. नंतर परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. तुम्हाला तुमची जबाबदारी समजेल.
कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम गोष्टी घडवणारा असेल. तुम्ही कोणतेही पूर्ण मेहनतीने कराल, तर तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल. तुमची काही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी नव्या योजनाही बनवू शकता. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात उच्च अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनाने तुमचा उत्साह द्विगुणित होईल. पगार वाढ किंवा बढतीची बातमी देखील मिळू शकते.
सिंह (Leo Horoscope) : मनातील विचार थोड्या वेळाने बदलत राहतील, त्यामुळे कोणताही ठोस निर्णय घेणे कठीण होईल. कोणत्याही परिस्थितीत आनंदाचे साधन वाढवण्यावर लक्ष असेल. अनैतिक मार्गाने नफा मिळवण्याचा विचार मनात येऊ शकतो. धार्मिक आणि शुभ कार्यात व्यस्त राहण्याची शक्यता आहे. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांची बातमी मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता.
कन्या (Virgo Horoscope) : तुमच्या वागणुकीमुळे कुटुंबातील सदस्य नाराज होतील. बोलण्यात गोडवा ठेवा. नशीबावर अवलंबून न राहता तुम्हाला कोणतेही नवीन काम आत्मविश्वासाने करावे लागेल, तरच तुम्ही त्यात यश मिळवू शकाल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. लोकांशी संवाद साधताना अत्यंत सावधगिरी बाळगा. कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे..
तूळ (Libra Horoscope) : तुमची कामे करण्याची पद्धत दुसऱ्यासाठी त्रासदायक ठरू शकते. गरजेच्या वेळी पैसे न मिळाल्यास निराशा येईल. कुटुंबातील सदस्यांच्या वागणुकीकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल. खास व्यक्तीसोबत राहून तुम्हाला आनंद मिळेल. कौटुंबिक सदस्यांसोबत सुरू असलेले जुने मतभेद दूर होऊ शकतात. तुमच्या काही जुन्या रखडलेल्या कामांना पुन्हा गती मिळेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : शारीरिक व मानसिकरित्या आनंदी असल्यामुळे काम करण्यात उत्साह राहील. व्यवसायात कर्मचार्यांचे सहकार्य मिळाल्याने तुम्ही अनेक कामे पूर्ण करू शकाल. योग्य खर्चामुळे तुम्हाला टेन्शन राहणार नाही. उत्पन्न आणि खर्चात समतोल राहील. कामाचा व्याप वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. मात्र, अपेक्षित यश न मिळाल्याने दुःखी व्हाल.
धनु (Sagittarius Horoscope) : आज तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळाले नाही, तर निराश होऊ नका. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमचे नेमून दिलेले काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. इतरांशी वाद घालणे टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. शक्य असल्यास आज प्रवास करू नका. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बेजबाबदार वागण्यामुळे त्रास होईल. कामात निष्काळजीपणाही जास्त राहील.
मकर (Capricorn Horoscope) : कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. वेळेवर मदत न मिळाल्यामुळे मन उदास राहील. आज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक त्रास होईल. प्रत्येक काम काळजी घेऊनच पूर्ण करा. कार्यक्षेत्रावर ताण येईल. हातातील जुनी कामे पूर्ण करण्याकडे अधिक लक्ष द्या. त्यानंतरच नवीन कामे हाती घ्या. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला ऐकणे फायदेशीर ठरेल.
कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्या अपेक्षेनुसार जाईल. सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमची बरीचशी कामे सहज पूर्ण होतील. प्रॉपर्टीशी संबंधित कामे करणे शुभ राहील. मनावरील चिंतेचे ढग दूर झाल्याने तुमचा उत्साह वाढेल. घरामध्ये भावंडांशी तुमचे संबंध चांगले राहतील. त्यांच्यासोबत वेळ आनंदाने जाईल. मित्र आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.
मीन (Pisces Horoscope) : बोलण्यावर संयम न ठेवल्याने भांडण होण्याची शक्यता आहे. खर्चावरही नियंत्रण ठेवावे लागेल. पैशाशी संबंधित व्यवहारातही काळजी घेणे आवश्यक आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यात घट होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होऊ शकतात. अनोळखी लोकही तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. नवीन मित्रमंडळी भेटतील. व्यवसायात जोखीम घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :