एक्स्प्लोर

Horoscope Today, July 21, 2022 : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, July 21, 2022 : मेष राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नये.

Horoscope Today, July 21, 2022 : आज चंद्र मेष राशीत असून, अश्वनी नक्षत्र आहे. सूर्य कर्क राशीत आणि गुरू मीन राशीत आहे. शनि मकर राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नये. जाणून घ्या मेष ते मीन संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : नवीन काम उत्साहाने सुरू कराल. या दरम्यान, अतिउत्साहाने नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमची कामे सहज पूर्ण होतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. तुमच्या आयुष्यात एखाद्या नवीन व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो.

वृषभ (Taurus Horoscope) : जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. दोघांपैकी एकाने शांत राहून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अचानक घडणाऱ्या घटनांमुळे तुम्ही चिंतेत असाल. कामाच्या ठिकाणी इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका. नातेवाईकांशी वाद होऊ शकतात. आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका, खर्च जास्त होईल. कठोर मेहनत केल्यावरच यश मिळेल.

मिथुन (Gemini Horoscope) : पैसे कमावण्याच्या नव्या संधी मिळतील. मित्रांसोबत अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. मित्रांकडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांकडूनही एखाद्या गोष्टीत लाभही मिळू शकतो. कोणत्याही प्रकारच्या वादांपासून दूर राहा. आज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतील.

कर्क (Cancer Horoscope) : एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. आज ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. यासोबतच तुम्हाला कंपनीकडून एखादी खास भेटही मिळू शकते. सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय सहज पूर्ण होतील. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांशी महत्त्वाची चर्चा होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन नोकरी देखील मिळू शकते. व्यवसायातही नफा मिळेल.

सिंह (Leo Horoscope) : हातात असलेले काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. ध्येयावर लक्ष केंद्रित कराल. धार्मिक आणि शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. परदेशातील मित्र किंवा नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. एखादा व्यवसाय करणाऱ्यांना आज खूप फायदा होऊ शकतो. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल.

कन्या (Virgo Horoscope) :  आज कोणताही मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता, स्वतःवर विश्वास ठेवा. कोणतेही काम करताना ज्येष्ठांचे मत विचारात घ्या. एखाद्या कामासाठी तुम्हाला बाहेर जावे लागेल. नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. बाहेरचे खाणे टाळा, अन्यथा तब्येत बिघडू शकते. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला विशेष सन्मान मिळेल. भागीदारीच्या कामात फायदा होईल. काही नवीन गोष्टी खरेदी करता येतील. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कामाबाबत काही नवीन योजना तयार करू शकता. रुग्णांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कामात थोडी सर्जनशीलता आणण्याचा प्रयत्न करा. लोकांसोबत मिळून एकत्र काम करा. तुमच्या समोर आलेल्या संधी हातातून निसटताना दिसतील. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. विरोधकांपासून सावध राहा. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढू शकते. नवीन काम किंवा योजना सुरू करू नका.

धनु (Sagittarius Horoscope) : कामात अपेक्षित यश न मिळाल्याने निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. इतरांशी वाद घालण्याऐवजी शांत राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात धार्मिक कार्ये होतील. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. घरगुती वस्तूंच्या खरेदीवरही पैसे खर्च कराल.

मकर (Capricorn Horoscope) : व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. जर तुम्ही व्यवसायात काही बदल करण्याचा विचा करत असाल, तर तेही तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक समस्या तुमच्या मनावर परिणाम करतील. मित्रांकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणीही वाद होऊ शकतात.

कुंभ (Aquarius Horoscope) : मनातील नकारात्मक विचारांना तुमच्यावर अधिक प्रभाव होऊ देऊ नका. तरुणांनी सकारात्मक विचार ठेवला, तरच ते पुढे जाऊ शकतील. वडिलांकडून आर्थिक मदत होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. अचानक लाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.

मीन (Pisces Horoscope) : कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. संध्याकाळी मित्रांसह बाहेर फिरायला जाऊ शकता. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज नवीन संधी मिळू शकतात. प्रेमसंबंध मजबूत होतील. मादक पदार्थांपासून दूर राहा. आर्थिक व्यवहारात अधिक काळजी घ्या. नकारात्मक विचारांना स्वतःपासून दूर ठेवा. नोकरदार लोकांना त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Embed widget