एक्स्प्लोर

Horoscope Today, July 13, 2022 : ‘या’ राशींसाठी गुरुपौर्णिमेचा दिवस ठरेल खास, जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, July 13, 2022 : मेष राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला काही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते. तर, वृषभ राशीच्या लोकांना जेवण आणि झोप वेळेवर न घेतल्याने मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Horoscope Today, July 13, 2022 : आज गुरूपौर्णिमा, गुरूपूजनाचा दिवस. आज चंद्र पूर्वाषाढा नक्षत्रात असून, धनु राशीत आहे. सूर्य मिथुन राशीत आणि शनि मकर राशीत आहे. गुरू मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला काही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते. तर, वृषभ राशीच्या लोकांना जेवण आणि झोप वेळेवर न घेतल्याने मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीला काही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. वैयक्तिक गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. आज तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. रागामुळे कोणतेही काम किंवा नाते बिघडू शकते. शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवेल. आज गुंतवणूक केल्याने तुम्हाला फायदा होईल.

वृषभ (Taurus Horoscope) : कामाचा अतिरेक आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये निष्काळजीपणा यांमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जेवण आणि झोप वेळेवर न घेतल्याने मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे. वेळेवर काम पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. पालकांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला आहे.

मिथुन (Gemini Horoscope) : शारीरिक आणि मानसिकरित्या आज ताजेतवाने वाटेल. कुटुंब आणि मित्रांसह छोटीशी पार्टी आयोजित करता येईल. आज तुमच्याकडे मनोरंजनाची सर्व साधने उपलब्ध असतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायातही तुमची प्रगती पाहून तुमचे विरोधक आश्चर्यचकित होतील. कुटुंबात मंगल कार्याचे नियोजन करता येईल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी घरातील सदस्यांचा सल्ला घ्या.

कर्क (Cancer Horoscope) : तुम्ही तुमच्या गोड वागण्याने लोकांना प्रभावित कराल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला आहे. घरामध्ये मंगल कार्यक्रमाचे नियोजन करता येईल. नशिबाने साथ दिल्याने तुमचा दिवस आनंदात जाईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरदारांचे कार्यालयीन वातावरण चांगले राहील. अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील.

सिंह (Leo Horoscope) : नोकरी किंवा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अनुकूल आहे. घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. सावध राहा, रागावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली कामगिरी करता येईल. प्रेमात यश आणि प्रिय व्यक्तींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील.

कन्या (Virgo Horoscope) : आज दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला अशा काही बातम्या मिळू शकतात, ज्यामुळे कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांशी मतभेदामुळे अशांतता राहील. बदनामी होण्याची शक्यता आहे. मालमत्ता आणि वाहने इत्यादी कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी, ती नीट वाचून घ्या.

तूळ (Libra Horoscope) : व्यवसायासाठी एखाद्या नवीन व्यक्तीशी भेट होईल. परदेशातून चांगली बातमी येईल. आज तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. आर्थिक लाभाचा योग आहे. भांडवल गुंतवणुकीसाठी आज अनुकूल दिवस आहे. धार्मिक कार्याकडे कल वाढेल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना आज एखाधी खास भेट मिळू शकते.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. वैद्यकीय खर्च वाढू शकतो. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. बोलण्यात सौम्यता राहील. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. आज तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. या राशीच्या व्यावसायिकांना आज त्यांचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.

धनु (Sagittarius Horoscope) : व्यापाऱ्यांना विशेष लाभ होईल. परदेशाशी संबंधित व्यवसायात लाभ होईल. घरामध्ये एखादे शुभ कार्य केले जाऊ शकते. प्रिय व्यक्ती आणि मित्रांच्या भेटीने आनंद होईल. आर्थिक लाभ होईल. जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळेल. या राशीच्या व्यावसायिकांना आज अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. शैक्षणिक कार्यासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल.

मकर (Capricorn Horoscope) : आत्मविश्वास वाढेल. धार्मिक कार्यात रस घ्याल. भावाच्या मदतीने आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रॉपर्टी डीलर्सना आज अचानक आर्थिक लाभ होईल. मनात एखाद्या गोष्टीची चिंता असू शकते. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. नोकरदार लोकांवर अधिकारी नाराज राहतील. धार्मिक कार्यात पैसा खर्च होईल. अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात रुची राहील. शत्रूंचा त्रास वाढेल.

कुंभ (Aquarius Horoscope) : नवीन कामाच्या आयोजनासाठी दिवस शुभ आहे. अविवाहित लोकांसाठी स्थळ येण्याची शक्यता आहे. पत्नी आणि मुलांकडून चांगली बातमी मिळेल. घरगुती आणि वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधानाची भावना राहील. वैयक्तिक गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. आज कोणीतरी तुमचा विश्वासघात करू शकतं. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील, हे टाळण्यासाठी धार्मिक स्थळी जा.

मीन (Pisces Horoscope) : मन प्रसन्न राहील. घरामध्ये मंगल कार्यक्रमाचे नियोजन करता येईल. संध्याकाळी मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. या राशीच्या व्यावसायिकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. तुमची सर्व कामे आज यशस्वीपणे पूर्ण होतील. नोकरीत पदोन्नती होईल. व्यापाऱ्यांचे अडकलेले पैसे परत मिळतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Union Budget 2025: आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
Budget 2025 Income Tax Slab: मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 01 February 2025Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP MajhaZero Hour | Namdev Shastri On Dhananjay Munde | नामदेवशास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण,विरोधकांचे सवालZero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Union Budget 2025: आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
Budget 2025 Income Tax Slab: मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Embed widget