एक्स्प्लोर

Horoscope Today, July 12, 2022 : वृषभ, सिंहसह ‘या’ राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, July 12, 2022 : मेष राशीच्या लोकांना बोलण्यावर आणि वागण्यावर संयम ठेवावा लागेल. वृषभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Horoscope Today, July 12, 2022 : आज मूळ नक्षत्र आहे. चंद्र धनु राशीत आहे, तर शनी आज कुंभ राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. सूर्याने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. मेष राशीच्या लोकांना बोलण्यावर आणि वागण्यावर संयम ठेवावा लागेल. वृषभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या आजचे संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. बोलणे आणि वागण्यावर संयम ठेवणे हिताचे ठरेल. दुपारनंतर नोकरी आणि व्यवसायात रुची वाढेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. अचानक आर्थिक लाभ संभवतो. व्यवसायात मनाप्रमाणे फायदा होईल. या राशीच्या अविवाहित लोकांना नवीन जोडीदार मिळू शकतो. मित्राच्या मदतीने व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. उत्पन्न वाढेल.

वृषभ (Taurus Horoscope) : कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढतील. लोकांशी बोलताना तुमचे ज्ञान आणि अहंकार मधे आणू नका. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. मागील बऱ्याच काळापासून विचारात असलेले काम आज पूर्ण होईल. अचानक धन लाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. नोकरीच्या मुलाखतींमध्ये यश मिळेल. काही जुने मित्र भेटू शकतात.

मिथुन (Gemini Horoscope) : कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. शारीरिक ऊर्जा आणि मानसिक आनंदाचा अनुभव घ्याल. अपूर्ण काम पूर्ण झाल्याने आनंदात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कार्यालयातील अधिकाऱ्यांशी कोणत्याही विषयावर वाद होऊ शकतो. व्यावसायिकांनी पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढेल.

कर्क (Cancer Horoscope) : भविष्यासाठी आर्थिक योजना बनवण्यासाठी वेळ चांगला आहे. एकाग्रतेने काम केल्यास यश नक्कीच मिळेल. कोणाशीही वाद घालू नका. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. एखाद्या गोष्टीबद्दल मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकता. संयमाने केलेल्या कामात यश मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. संयम कमी होऊ शकतो. व्यावसायिकांनी पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस आनंदाचा आहे. अचानक धनलाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. खूप दिवसांपासून अडकलेले पैसे आज तुम्हाला मिळू शकतात. भविष्यातील गुंतवणुकीशी संबंधित योजनेवर आज काम करू शकता. मेहनतीनुसार फळ मिळेल. विद्यार्थ्यांना कामात यश मिळेल. बौद्धिक आणि राजकीय चर्चा करू नका. नवीन कामाला सुरूवात करू नका.

कन्या (Virgo Horoscope) : ऑफिसमधून काही चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. उत्पन्न वाढेल. व्यावसायिकांना अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही नवीन योजना देखील करू शकता. एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेत राहू शकता. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू शकते.

तूळ (Libra Horoscope) : रागाचा अतिरेक होऊ शकतो. मित्राच्या मदतीने व्यवसायात बदल घडवू शकता. कामाचा व्याप वाढेल. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. दीर्घकाळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होईल. भाग्य तुम्हाला साथ देईल. कामात यश मिळेल. जवळचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत संबंध चांगले राहतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : मन कामात व्यस्त राहील. कौटुंबिक वातावरण आनंदमय असेल. रागावर नियंत्रण ठेवा. काही नकारात्मक विचार तुम्हाला त्रास देऊ शकतात. एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. ऑफिसमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने नोकरीत प्रगती शक्य आहे. व्यवसायात चांगला फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कोणताही निर्णय भावनेच्याभरात घेऊ नका.

धनु (Sagittarius Horoscope) : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वाहन खर्च वाढू शकतो. मित्रांचे सहकार्य मिळेल. आज केलेला प्रवास लाभदायक ठरेल. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. कठोर परिश्रमाने यश मिळवू शकाल. वाणीवर संयम ठेवा आणि रागावू नका. कामात यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र आणि प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल.

मकर (Capricorn Horoscope) : व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कामात व्यत्यय आल्याने आज तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आज तुमचे कोणतेही जुने वाद मिटू शकतात. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. कुटुंबासह एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ (Aquarius Horoscope) : मन प्रसन्न राहील. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. कामाचा व्याप वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात लाभ होईल. कुटुंब आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत पदोन्नती होईल. अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. गुंतवणुकीची योजना करू शकता. जुने मित्र भेटतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.

मीन (Pisces Horoscope) : ऑफिसमध्ये अतिरिक्त जबाबदाऱ्या खांद्यावर पडल्याने मानसिक त्रास वाढू शकतो. या राशीच्या व्यावसायिकांना आज कठोर मेहनतीनंतर पैसा मिळेल. खर्चात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. प्रवास घडण्याची शक्यता आहे. परदेशात राहणाऱ्या मित्र आणि प्रियजनांशी गप्पागोष्टी होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Shubh Yog: आजचा श्रावणी शुक्रवार पॉवरफुल, पंचमहापुरुष राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, कुबेराची कृपा..
आजचा श्रावणी शुक्रवार पॉवरफुल, पंचमहापुरुष राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, कुबेराची कृपा..
Horoscope Today 14 August 2026 : आज शुक्रवारचा दिवस 7 राशींसाठी संकटाचा, तर, 5 राशी असतील निवांत, वेळोवेळी लागणार संकटाची चाहूल, आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस 7 राशींसाठी संकटाचा, तर, 5 राशी असतील निवांत, वेळोवेळी लागणार संकटाची चाहूल, आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: ऑगस्टचा तिसरा आठवडा 7 राशींचं नशीब पालटणारा! सणांची रेलचेल, ग्रहांचे पॉवरफुल योग, कोणत्या राशी मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
ऑगस्टचा तिसरा आठवडा 7 राशींचं नशीब पालटणारा! सणांची रेलचेल, ग्रहांचे पॉवरफुल योग, कोणत्या राशी मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 14 August 2026: आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget