(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today, July 11, 2022 : वृषभ, मिथुनसह ‘या’ राशींना होणार आर्थिक फायदा! जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today, July 11, 2022 : मेष राशीच्या लोकांना आज आध्यात्मिक विचारांमध्ये अधिक रस असेल. वृषभ राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
Horoscope Today, July 11, 2022 : आज चंद्र अनुराधा नक्षत्रात असून, वृश्चिक राशीत आहे. सूर्य मिथुन राशीत आणि शनि मकर राशीत आहे. गुरू मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना आज आध्यात्मिक विचारांमध्ये अधिक रस असेल. वृषभ राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : आज तुम्हाला आध्यात्मिक विचारांमध्ये अधिक रस असेल. विज्ञानाकडे विशेष आकर्षण राहील. चिंतन केल्याने अलौकिक अनुभूती येईल. वाणीवर संयम ठेवल्यास अनेक गैरसमज टाळता येतील. अचानक आर्थिक लाभ होईल. गुप्त शत्रूंपासून दूर राहा. आज नवीन काम सुरू करू नका. शैक्षणिक कार्यात रस घ्याल. आज कुटुंबात काही चांगली बातमी मिळू शकते.
वृषभ (Taurus Horoscope) : आज कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांसोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रम होईल. एखाद्या लहान सहलीचे आयोजन केले जाऊ शकते. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांशी बोलणी होईल. व्यापाऱ्यांना व्यवसायात फायदा होईल. नोकरदार लोकांसाठीही आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रस घ्याल. प्रवासाचे योग आहेत. सावध राहा, रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वाद होऊ शकतो.
मिथुन (Gemini Horoscope) : अपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. कामात विजय मिळून यशात वाढ होईल. इतर लोकांशी संवाद साधताना रागावर नियंत्रण ठेवा. वाणीवर संयम ठेवल्यास दुरावा निर्माण होणार नाही. पैसा मिळेल. आवश्यक गोष्टींवर पैसा खर्च होईल. विरोधकांवर विजय मिळेल. नोकरदार लोकांना फायदा होईल.
कर्क (Cancer Horoscope) : तुमच्या मेहनतीमुळे व्यवसायात प्रगती शक्य आहे. दिवसाची सुरुवात चिंता आणि गोंधळाने होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला नाही. आकस्मिक पैसा खर्च होईल. प्रेमीयुगुलांमधील वादविवादामुळे दुरावतील. प्रवास कठीण होईल. शक्य असल्यास, आज प्रवास टाळा. घरातील लहान मुलांशी वाद टाळा. बहुतेक वेळ शांततेत घालवा. व्यापार्यांसाठी आजचा दिवस सामान्य आहे.
सिंह (Leo Horoscope) : घरगुती कामात अनावश्यक धावपळ होईल. व्यवसायात मेहनतीनंतर फायदा मिळेल. आज तुम्ही एखाद्या गोष्टीने चिंतेत असाल. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. जमीन, घर आणि वाहन खरेदीसाठी किंवा कागदोपत्री कामासाठी अनुकूल वेळ नाही. नकारात्मक विचारांमुळे निराशा होईल. आज जोडीदारासोबत वैचारिक मतभेदही होऊ शकतात. मात्र, दुपारनंतर अध्यात्मिक राहिल्याने तुमचे मन शांत राहील.
कन्या (Virgo Horoscope) : आज कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. कामात यश मिळेल. विरोधकांनाही पराभूत करू शकाल. भाऊ-बहिणी आणि शेजाऱ्यांशी चांगले संबंध राहतील. लहान भावंडांना भेटवस्तूही देऊ शकता. आर्थिक लाभही होईल. प्रेम जीवनात सकारात्मकता येईल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. सार्वजनिक जीवनात मान-सन्मान मिळेल. मनात आनंद राहील.
तूळ (Libra Horoscope) : मानसिक त्रासामुळे आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. आज कोणतेही नवीन काम सुरु करू नका. कुटुंबातील सदस्यांशी वाद टाळायचा असेल, तर बोलण्यावर संयम ठेवा. आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात मेहनतीनंतर फायदा होईल. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. सामाजिक कार्यात रस घ्याल. शैक्षणिक कार्यात रस घ्याल. घरगुती कामात अनावश्यक धावपळ होईल.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमचे शरीर आणि मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवू शकाल. मित्र आणि प्रियजनांकडून एखादे गिफ्ट मिळेल. प्रियजनांसोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रम करू शकाल. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. घरात पाहुण्यांच्या आगमनाने मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा त्रासदायक असेल. तब्येत खराब राहील. कुटुंबियांशी वादामुळे मन उदास राहील. परिणामी तुम्ही मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ व्हाल. रागावर नियंत्रण ठेवा. अपघात होण्याची भीती राहील. सावधगिरी बाळगा. न्यायालयीन प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक काम करा. जास्त खर्चामुळे पैशाची कमतरता भासेल.
मकर (Capricorn Horoscope) : नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात आजचा दिवस लाभदायक असेल. कामाच्या ठिकाणी अपूर्ण काम पूर्ण करण्यात पुढाकार राहील. मित्र, नातेवाईक यांच्यासोबत फिरायला जाल. एखाद्या मंगल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्र आणि परिवाराची साथ लाभेल. विवाहयोग्य तरुण-तरुणींसाठी चांगले स्थळ सांगून येईल.
कुंभ (Aquarius Horoscope) : आज तुमची सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. यामुळे तुम्हाला आनंद होईल. नोकरी आणि व्यवसायात परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील. कामात यश मिळेल. वडीलधार्यांच्या आणि अधिकार्यांच्या आशीर्वादाने तुम्ही मानसिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या ओझ्यापासून मुक्त व्हाल. कौटुंबिक जीवनात समाधान राहील. पैसा आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे
मीन (Pisces Horoscope) : नकारात्मक विचार तुमच्या मनावर वर्चस्व गाजवणार नाहीत याची काळजी घ्या. मानसिक आजारामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. तब्येतीची तक्रार राहील. नोकरीत उच्च अधिकार्यांशी जपून बोला, विरोधक त्यांच्या चालींमध्ये यशस्वी होतील. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय न घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जर तुम्ही आज भविष्यासाठी काही योजना करत असाल तर तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :