एक्स्प्लोर

Horoscope Today, July 10, 2022 : तूळ, धनुसह ‘या’ राशींना ठेवावे लागणार रागावर नियंत्रण! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, July 10, 2022 : मेष राशीच्या लोकांनी दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करू नका. वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात उत्तम लाभ होणार आहे.

Horoscope Today, July 10, 2022 : आज विशाखा नक्षत्र असून, चंद्र वृश्चिक राशीत आहे. शनी मकर राशीत, तर गुरु मीन राशीत आहे. सूर्य मिथुन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांनी दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करू नका. वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात उत्तम लाभ होणार आहे. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : कौटुंबिक कार्यक्रमात मन व्यस्त राहील. गोड बोलण्याने अधिक फायदा मिळेल. आजचा दिवस थोडासा कठीण असणार आहे. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे धावपळ होईल. दुसऱ्यांची मदत केल्याने मनाला आनंद होईल. जोखमीची कामं करणं टाळा. दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करू नका. करिअरमध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. यासाठी कुटुंबातील लोकांचा सल्ला घ्या.

वृषभ (Taurus Horoscope) : आज तुम्हाला व्यवसायात उत्तम लाभ होणार आहे. रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा वाद उद्भवू शकतात. जोडीदाराची साथ मिळेल. घरात धार्मिक कार्याचे आयोजन होईल. काही महत्त्वाची कामे लांबणीवर पडू शकतात. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, अशांना आज आनंदाची बातमी मिळेल. एखाद्या मित्राकडून धोका मिळण्याची शक्यता आहे. सावध राहा. लोकांच्या सांगण्यावरून एखाद्यावर विश्वास ठेवू नका.

मिथुन (Gemini Horoscope) : आरोग्याच्या कुरबुरी सुरु राहतील. नोकरीत बदल करण्याच्या विचार करत असाल, तर काळजीपूर्वक निर्णय घ्या. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. भावंडामध्ये काही वाद सुरु असतील, तर आजच मिटवावे. नोकरदार वर्गाला प्रमोशन मिळण्याचे संकेत आहेत. एखादा प्रवास घडू शकतो, ज्यामुळे मनःशांती मिळेल. व्यवसायात तोटा झाला असेल, तर तो आज भरून निघण्याची शक्यता आहे.  

कर्क (Cancer Horoscope) : आज एखाद्या कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात मनासारखा फायदा झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता. धार्मिक गोष्टींकडे कल वाढेल. मात्र, आजच्या दिवशी कामाचा ताण वाढल्याने थोडी चिडचिड देखील होऊ शकते. मन शांत ठेवा आणि राग टाळण्याचा प्रयत्न करा.

सिंह (Leo Horoscope) : आज मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव दिसून येईल. वादविवाद होऊ शकतात. विद्यार्थ्यांना देखील आज खूप मेहनत करावी लागणार आहे. नवीन घर घेण्याचे योग बनत आहेत. व्यवसायात साधारण लाभ होईल. अनावश्यक खर्च वाढल्याने आर्थिक स्थितीवर परिणाम दिसून येईल. प्रतिस्पर्धी तुमच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अडकलेले काम पूर्ण करण्यासाठी विशेष मेहनत करावी लागेल.

कन्या (Virgo Horoscope) : नवीन गोष्टी करण्याकडे कल असेल. घरातील वातवर आनंदी राहील. एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून गुंतवणूक करणे महागात पडू शकते. कुठलीही गुंतवणूक करताना पूर्ण विचार करा. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा अनेक गोष्टी बिघडू शकतात. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. घरात एखाद्या मंगल कार्याचे आयोजन केले जाऊ शकते.

तूळ (Libra Horoscope) : नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस अतिशय चांगला असणार आहे. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. व्यासायात एखादा मोठा बदल होण्याची देखील शक्यता आहे. मनात नकारात्मक विचार येतील. रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. नोकरीत अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज तुम्हाला मानसिक शांती मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. एखाद्या मित्राच्या सल्ल्याने चांगल्या ठिकाणी गुंतवणूक कराल. प्रवास करणे शक्यतो टाळा. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. खर्च करताना विचार करावा. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा एखादी व्यक्ती तुमचा फायदा घेऊ शकते.

धनु (Sagittarius Horoscope) : अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. धार्मिक कार्यात रुची वाढेल. आई-वडिलांच्या मदतीने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. व्यवसायात वाद करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. स्वभावात थोडा चिडचिडेपणा असू शकतो. आळस वाढू शकतो. मात्र, हातातीत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष द्या.

मकर (Capricorn Horoscope) : हातातील कामे पूर्ण झाल्याने मन आनंदी राहील. एखादी आनंदाची बातमी मिळाल्याने कुटुंबात उत्साहाचे वातावरण असले. आर्थी उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या दृष्टीने केलेला प्रवास लाभदायी ठरू शकतो. कुणाशीही आपल्या घरातील गोष्टी शेअर करू नका. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते.

कुंभ (Aquarius Horoscope) : नोकरीत बढतीची संधी मिळू शकते. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. कुटुंबात छोटेसे वाद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक स्थितीत बदल होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. एखादी मालमत्ता खरेदी करत असला, तर त्याची कागदपत्र काळजीपूर्वक तपासून घ्यावी. अनावश्यक खर्चांवर लगाम घालण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात याचा फटका बसू शकतो.  

मीन (Pisces Horoscope) : विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. अभ्यासाचा ताण कमी होईल. व्यवसाय करणाऱ्यांना आज एखादी चांगली बातमी मिळू शकते. एखादा नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर, आई-वडिलांचा सल्ला घ्या. कोणतेही काम आज सहज पूर्ण होईल. राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनाही आज आनंदाची बातमी मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 August 2026: आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
Shravan 2026 : श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
Chandra Grahan 2026: सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget