एक्स्प्लोर

Horoscope Today, April 8, 2022 : मेष, वृषभ, कर्कचा फायदा होणार, तर ‘या’ राशींना सावध राहावं लागणार! जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Horoscope Today 2 April 2022 : आज वृषभ आणि मकर राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. आज कन्या आणि मिथुन राशीच्या लोकांना नोकरीत नवीन संधी मिळतील.

Horoscope Today 2 April 2022 : आज चैत्र नवरात्री सप्तमीच्या शुभ दिवशी चंद्र मिथुन राशीत आहे आणि आद्रा नक्षत्र आहे. गुरु कुंभ राशीत आहे. शनी सध्या मकर राशीत आहे. उर्वरित ग्रहांची स्थिती तशीच राहील. आज वृषभ आणि मकर राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. आज कन्या आणि मिथुन राशीच्या लोकांना नोकरीत नवीन संधी मिळतील. आज चंद्र आणि शनीच्या संक्रमणामुळे वृषभ आणि मीन राशीच्या लोकांनी नोकरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चला आता जाणून घेऊया आजचे सविस्तर राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : तुमचे वागणे अतिशय सौम्य असणार आहे. वर्तनातील बदल हा इतरांसाठी चर्चेचा विषय बनेल. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. कामात मेहनत कराल. कुटुंबातील सदस्याकडून छोटे कर्ज घ्यावे लागेल. कोणतेही नवीन काम करत असाल, तर त्यामध्ये तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्यावा, तरच तुम्हाला त्यात यश मिळेल. नोकरीशी संबंधित लोकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांपासून दूर जावे लागू शकते, त्यांची बदली होऊ शकते.

वृषभ (Taurus Horoscope) : प्रेमात असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. जोडीदारासोबत थोडा वेळ एकांत घालवाल. व्यवसायाशी संबंधित समस्या सहज सुटतील. विद्यार्थ्यांनी ज्या स्पर्धेत भाग घेतला होता, त्यात ते जिंकू शकतील. संध्याकाळी कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. चांगल्या लोकांशी संपर्क स्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. नवीन मैत्री तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. नशीब खूप साथ देणार आहे.

मिथुन (Gemini Horoscope) : वडीलधाऱ्यांचा आदर करण्यात तुम्ही आघाडीवर राहाल. कामात यश मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रभाव आणि वैभव वाढवणारा असेल. भावनेच्या आहारी जाऊन तुम्हाला कोणताही निर्णय घेण्याची गरज नाही, अन्यथा ते तुमच्यासाठी पुढे अडचणी निर्माण करू शकतात. कोणाच्याही बोलण्यात अडकू नका. नातेवाईकांपैकी कोणाशीही भागीदारीत व्यवसाय करणे टाळा, अन्यथा तुमचे परस्पर संबंध बिघडू शकतात.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी लोक तुमची स्तुती करताना दिसतील आणि तुमच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. जुन्या गुंतवणूक योजनांचा लाभ मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. रोजगारासाठी इकडे-तिकडे भटकणाऱ्या लोकांना थोडाफार दिलासा मिळू शकतो. मित्र आणि ओळखीच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. नवीन बिझनेस प्लॅनवर काम करण्यासाठी तुमच्यासाठी ही चांगली वेळ आहे. हुशारी वापरून काम कराल, त्यात यश मिळेल.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस कामात चांगले यश मिळवून देणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. मात्र, प्रकृती बिघडू शकते, त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत जाईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे लग्न निश्चित होऊ शकते, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी राहतील. कायदेशीर वादात विजय मिळू शकतो. कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यावा लागेल, तरच ते कार्य यशस्वी होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना डील फायनल करण्यासाठी वाट पहावी, फायदेशीर ठरेल. संध्याकाळी, मित्रांसोबत पिकनिकला जाण्याची तयारी करू शकता.

कन्या (Virgo Horoscope) : आज काही जबाबदाऱ्यांचे ओझे वाढू शकते. घराची जुनी कामे पूर्ण करण्यासाठी भावांकडे मदत मागू शकता. जर, मुलाला नोकरीची संधी मिळाली, तर त्यांना पाठवा, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. जोडीदाराशी बोलल्यानंतर गुंतवणूक करणे तुमच्यासाठी चांगले राहील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कार्यक्षेत्रात दिवस चांगला जाईल. घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. शिक्षक आणि वडीलधाऱ्यांबद्दल आदर आणि आदराची भावना तुमच्या मनात वाढेल.

तूळ (Libra Horoscope) : हुशारी दाखवून कामे सहज पूर्ण कराल. बोलण्यात गोडवा राहील, त्यामुळे मित्र-मैत्रिणींसोबतच्या नात्यात गोडवा राहील. घरातील कोणतेही शुभ कार्य पूर्ण होईल. जोडीदारासाठी खरेदी करताना तुम्हाला तुमच्या खिशाची काळजी घ्यावी लागेल. मुलांच्या संगतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, अन्यथा काही चुकीची संगत लागू शकते. व्यवसायात रखडलेले पैसे परत मिळतील, ज्यातून तुम्ही तुमचे दैनंदिन खर्च भागवू शकाल. आईने तुमच्यावर एखादे काम सोपवले, तर ते तुम्हाला वेळेवर पूर्ण करावे लागेल, अन्यथा ती तुमच्यावर रागावू शकते.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्ततेचा असेल. जुना मित्र अचानक भेटल्याने आनंद होईल. नोकरीशी संबंधित लोकांकडून काही माहिती ऐकायला मिळू शकते. परंतु, छोट्या व्यावसायिकांना व्यवसायात काही समस्यांना सामोरे जावे लागेल, त्यासाठी त्यांना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. जर तुमच्या मनात एखादी कल्पना आली, तर तुम्हाला लगेच त्याचा पाठपुरावा करावा लागेल, तरच त्यातून फायदा मिळवता येईल. जे काम हातात घ्याल, त्यात यश मिळेल.

धनु (Sagittarius Horoscope) : कामासाठी दिवस चांगला आहे. नवीन मित्राच्या मदतीने तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील, पण अचानक खर्चही वाढणार आहेत. आजचा दिवस नक्कीच फलदायी असेल. कार्यक्षेत्रात प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमची प्रगती होईल. घरामध्ये काही वादविवाद होत असतील तर वडिलधाऱ्यांसोबत त्यात पडू नका. तसेच कोणतेही काम करताना त्यांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्ही तुमच्या वडिलांना कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकता.

मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस उत्साहपूर्ण असेल. भविष्याशी निगडीत निर्णय घ्यायचा असेल तर नक्कीच तुमच्या जोडीदाराशी सल्लामसलत करा, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. जे लोक परदेशाशी करार करतात, ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतील. कर्ज देणे टाळावे लागेल, अन्यथा तुमचे नातेही बिघडू शकते. संध्याकाळी सांस्कृतिक उत्सवात सहभागी होऊ शकता. शत्रूंचा पराभव करण्यात यशस्वी व्हाल. आरोग्यासाठीही दिवस चांगला आहे.

कुंभ (Aquarius Horoscope) : चपळाईने प्रत्येक काम अगदी सहजतेने पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत यश मिळेल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असेल. नोकरीशी संबंधित लोकांना आणखी काही नव्या नोकरीची ऑफर मिळू शकते, ज्यामध्ये त्यांना बढती देखील मिळू शकते. काही कामासाठी सल्ला घ्यायचा असेल, तर तो अनुभवी व्यक्तीकडून घ्या. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.

मीन (Pisces Horoscope) : आज तुम्ही खूप आनंदी राहाल. प्रतिष्ठाही वाढताना दिसते. कोणताही जुना रखडलेला व्यवसाय सुरू करू शकता. सामाजिक वर्तुळात काम करणाऱ्या लोकांशी संबंध वाढू शकतात. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे यश पाहून तुम्हाला आनंद होईल. संध्याकाळी, तुम्ही प्रवासाला जाण्याची तयारी करू शकता. विनाकारण कोणाशी वाद घालणे टाळा. आरोग्य चांगले राहील. नोकरी असो किंवा व्यवसाया चांगले यश मिळेल. कार्यक्षेत्रात दिवस लाभदायक ठरेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Embed widget