एक्स्प्लोर

Horoscope Today, April 23, 2022 : कर्क, सिंहसह ‘या’ राशींच्या लोकांना घ्यावी लागणार अधिक काळजी, जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, April 23, 2022 : आज कर्क, सिंह राशींच्या लोकांना शांत राहण्याचा सल्ला दिला जात आहे. तूळ आई वृश्चिक राशीच्या लोकांचा दिवस आनंदमय असणार आहे.

Horoscope Today, April 23, 2022 : आज वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीचा दिवस आहे. आज चंद्र मकर राशीत असून, उत्तराषाद नक्षत्रात आहे. गुरु कुंभ राशीत आहे. शनि मकर राशीत आणि गुरू मीन राशीत आहे. आज कर्क, सिंह राशींच्या लोकांना शांत राहण्याचा सल्ला दिला जात आहे. तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांचा दिवस आनंदमय असणार आहे.

मेष (Aries Horoscope) : आजच्या दिवसांत तुमचे दीर्घकाळ चाललेले कायदेशीर वाद संपण्याची शक्यता आहे. मालमत्ता, जमी-जुमला खरेदी करण्याची इच्छा देखील पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी टीमवर्क करून काम केल्याने फायदा होईल. सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. नोकरीच्या बाबतीत कामांवर लक्ष केंद्रित करावे. कदाचित तुमचे संशोधन सर्वोत्तम असेल. व्यवसायात काही बदल करायचे असतील तर, जरा वेळ थांबा. 

वृषभ (Taurus Horoscope) : नफा मिळवण्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी नियोजन करण्याची वेळ आता आली आहे. कुणाशीही वाद घालू नका, अन्यथा तणाव जाणवेल. कौटुंबिक वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. चांगला संवाद समस्या सोडवतो. मित्राने मदत मागितल्यास, त्याला मदत करा. मुलांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील.  

मिथुन (Gemini Horoscope) : तुमच्या आर्थिक समस्या आज सुटणार आहेत. कुटुंबातील व्यक्तीचे लग्न निश्चित झाल्यामुळे वातावरण शुभ राहील. जबाबदाऱ्या पार पाडण्यात चुकू नका. गोड बोलून लोकांची मने जिंकू शकाल. व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला मोठे भागीदार आणि ग्राहक मिळू शकतात. यामुळे व्यवसाय आणखी वाढणार आहे. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात आणखी जोर लावावा लागणार आहे.

कर्क (Cancer Horoscope) : आजच्या दिवसांत कुणावरही रागवू नका. रागामुळे तुमचे आरोग्य बिघडेल, तणाव देखी वाढेल. कामात निष्काळजीपणे करू नका. व्यापाऱ्यांना नफा होण्याची शक्यता आहे. अध्यात्मिक ओढ वाढेल. कुटुंबासह धार्मिक स्थळी तीर्थयात्रेला जाऊ शकता. कोणतेही रखडलेले काम आज पुन्हा सुरू करू शकता. नोकरीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा फायदा तुम्हाला मिळेल.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा कठीण जाईल. नोकरीत पदोन्नतीला मुकण्याची शक्यता आहे. मात्र, एखाद्याला सरकारी नोकरी देखील मिळू शकते. शांत राहण्याचा प्रयत्न करा. कापडाचे काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विवाह योग्य लोकांना चांगली स्थळे सांगून येतील.

कन्या (Virgo Horoscope) : सरकारी खात्यात काम करणाऱ्या लोकांनी आपले काम काळजीपूर्वक करावे. बदलत्या काळानुसार स्वतःला बदला. जमीन किंवा घराशी संबंधित अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची वेळ आली आहे. आज तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. पैशाशी संबंधित समस्याही दूर होईल. कुणाही पैसे उधार देताना नीट विचार करा.

तूळ (Libra Horoscope) : आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. मात्र, कुणाशीही वाद घालणे टाळा. कामाकडे सकारात्मकतेने पहा. पैसे गुंतवताना अधिक काळजी घ्या, अन्यथा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कोणत्याही नात्यातील अंतर दूर करण्यासाठी एकमेकांशी संवाद साधा. यामुळे अनेक गोष्टी सोप्या होतील.   

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज तुमच्यासाठी दिवस आनंद आणि उत्साहाचा असेल. मात्र, गर्वाने फुगून बेडकाचा बैल होऊ देऊ नका. व्यवसायात पैसे गुंतवावे लागतील. निद्रानाश अनेक आजारांना जन्म देऊ शकतो. यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. बोलण्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न करा. एखाद्याला तुमच्या आर्थिक मदतीची गरज भासू शकते.

धनु (Sagittarius Horoscope) :  आज तुम्हाला काही कामासाठी थोडीशी धावपळ करावी लागेल. मात्र, कामे सहज पूर्ण होतील. नोकरपेशा लोकांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल.  प्रिय व्यक्तीसह प्रवासाची संधी मिळेल. स्वभावात सौम्यता आणण्याचा प्रयत्न करा. बदलते हवामान लक्षात घेऊन हलके व पचणारे अन्न खावे. तब्येत सांभाळा. वाद निर्माण करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा.

मकर (Capricorn Horoscope) : ध्येयावरील लक्ष विचलित होऊ देऊ नका. आज आरोग्याच्याही काही कुरबुरी जाणवतील. सर्व प्रकारे सावध रहा. घरातील काही जबाबदाऱ्या आज तुमच्या अंगावर पडू शकतात. मित्रांसोबत गप्पा गोष्टी केल्याने मन आनंदी होईल. दैनंदिन व्यवहारात काही बदल करू शकता. हातातील कामे वेळच्यावेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

कुंभ (Aquarius Horoscope) : आज तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात काही नवीन लोकांशी संपर्क फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांसह कोणत्याही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. राजकारणात रस असणाऱ्यांना आता संधी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. भजन कीर्तन केल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल.

मीन (Pisces Horoscope) : आज खर्च करताना विचार करूनच करा. इतरांना सल्ले देणं टाळा. शारीरिक दुखापत होण्याची शक्यता आहे. व्यवसायात काही लाभाच्या संधी मिळतील. रखडलेले सौदे पूर्ण होतील. मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. बुद्धीशी संबंधित कामांमध्ये खूप फायदा होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. नोकरी करणाऱ्या लोकांना कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Shravan 2026 Wishes: श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
Shravan 2026: उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
Hindu Religion: देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget