एक्स्प्लोर

Horoscope Today, April 11, 2022 : आठवड्याचा पहिला दिवस ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायी, जाणून घ्या आजचं राशीभविष्य...

Horoscope Today 11 April 2022 : आज चंद्राचे भ्रमण वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांना लाभदायक ठरेल. मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांची व्यवसायात प्रगती होईल.

Horoscope Today 11 April 2022 : आज सूर्योदयाच्या वेळी पुष्य नक्षत्र आणि चंद्र कर्क राशीत आहे. सूर्य मीन राशीत, तर गुरू कुंभ राशीत आहे. उर्वरित ग्रहांची स्थिती सारखीच आहे. आज चंद्राचे भ्रमण वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांना लाभदायक ठरेल. मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांची व्यवसायात प्रगती होईल. मेष आणि मकर राशीच्या लोकांना बँकिंग आणि मीडियामध्ये यश मिळेल. मिथुन आणि मीन राशीच्या राजकारण्यांना राजनैतिक यश मिळेल. जाणून घेऊया आजचं राशीभविष्य....

मेष (Aries Horoscope) : सोमवारी आखलेल्या योजना पूर्णपणे अंमलात आणता येतील आणि त्या फायदेशीर परिणाम देऊ शकतील. पगारदार लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल योग्य कौतुक आणि आदर मिळू शकतो. आजचा दिवस कामाच्या ठिकाणी खूप चांगला जाईल. इतरांना मदत केल्याने तुम्हाला आराम मिळेल. जोडीदाराची तब्येत बिघडल्यामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

वृषभ (Taurus Horoscope) : कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ घालवाल. कौटुंबिक कलह बराच काळ टिकला असेल, तर तो संपेल आणि सर्वजण एकत्र दिसतील. एखाद्या सभासदाच्या सरकारी नोकरीसंदर्भात कुठेतरी बोलणी सुरू असतील, तर ती पूर्ण होऊन त्यांना कोणतेही पद मिळू शकते. संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या उत्सवात सहभागी होऊ शकता. पोटदुखी, गॅस, अपचन यांसारख्या काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही प्रकरण प्रलंबित असल्यास त्याचा निर्णय तुमच्या बाजूने होईल.

मिथुन (Gemini Horoscope) : तुमच्या प्रयत्नांना फळ मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. सामाजिक वर्तुळ वाढेल आणि तुम्ही काही महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करू शकाल. आजचा दिवस तुमच्यासाठी मौल्यवान वस्तू मिळवण्यासाठी असेल. नवीन वाहन, घर, दुकान इत्यादी खरेदी कराल. कुटुंबातील सदस्यांसाठी पार्टीचे आयोजनही कराल. कोणाशीही बोलताना बोलण्यातला गोडवा हरवणार नाही याची दक्षता घ्या. संध्याकाळच्या वेळी भरधाव वेगाने जाणारी वाहने वापरताना काळजी घ्यावी लागेल.

कर्क (Cancer Horoscope) : मान-सन्मानात वाढ होईल. जर, तुम्ही घाईत भावनिक निर्णय घेतला असेल, तर तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागेल. अचानक हाती आलेल्या मोठ्या रकमेमुळे तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही आणि तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आकांक्षा पूर्ण करताना दिसाल. काही अर्धवेळ काम करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी वेळ काढू शकाल. साहित्य, कला, लेखन, संगीत, चित्रपट किंवा क्रीडा यासारख्या सर्जनशील क्षेत्रांशी संबंधित लोकांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. 

सिंह (Leo Horoscope) : कामाच्या ठिकाणी खूप उत्साही असाल. व्यवहारात कमालीचे यशस्वी व्हाल आणि ग्राहकांशी कायमचे नाते निर्माण कराल. योग्यता सिद्ध करण्यासाठी चांगल्या संधींचा फायदा घ्याल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल, कारण ते काही मोठ्या नेत्यांना भेटू शकतात. स्पर्धेच्या क्षेत्रात तुम्ही पुढे जाल आणि तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. खूप दिवसांनी प्रिय मित्र भेटू शकतो. एखाद्याला पैसे उधार दिले असतील, तर ते परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.

कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस धर्मादाय कार्यात जाईल. वृद्ध लोकांच्या सेवेवर आणि कामावरही काही पैसा खर्च कराल. प्रतिस्पर्धी मैदानात डोकेदुखीचे कारण बनतील, त्यामुळे सावध राहावे लागेल. नोकरीशी संबंधित लोकांना प्रमोशन किंवा पगार वाढ यासारखी कोणतीही आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. वडिलांना डोळ्यांशी संबंधित काही समस्या असू शकतात, यामध्ये तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुप्त शत्रूंनी निर्माण केलेल्या काही किरकोळ समस्यांना तोंड द्यावे लागेल. अधिकाऱ्यांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा आणि त्यांचा विरोध टाळा.

तूळ (Libra Horoscope) : व्यापारी नवीन ट्रेंड शोधतील. आज आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल आणि पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील. तुमची बचत तुमच्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरेल. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस असेल, कारण तुम्ही काही नवीन कामाबद्दल उत्साहित असाल आणि ते पूर्ण होण्याची अपेक्षा कराल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची भरभरून साथ मिळत असल्याचे दिसते. कुटुंबातील सदस्यांसोबत एकांतात वेळ घालवाल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमची कीर्ती आणि सन्मान वाढवणारा असेल. प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील कोणत्याही वरिष्ठ सदस्याशी वाद घालणे टाळा. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला, तरी त्यात धैर्याने काम करावे लागेल. गुणवत्तेनुसार बक्षिसे किंवा प्रगती मिळू शकते. लग्न किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात जाण्याचीही शक्यता आहे. जर परदेशात जाण्याचा विचार करत असाल, तर लवकरच या दिशेने पावले उचला.

धनु (Sagittarius Horoscope) : तुमची लोकप्रियता शिखरावर असेल आणि इतर अनेकांवर तुमचा अधिक प्रभाव पडेल. अधिकाऱ्यांशी वाद टाळल्यास व्यावसायिक क्षेत्रात चांगली प्रगती करू शकाल. सांसारिक सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल. त्यासाठी तुम्ही काही पैसेही खर्च कराल. परंतु, पैशाचे व्यवहार करण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी लागेल. कामाच्या ठिकाणी, तुमचे विरोधक तुमच्या विरोधात कट रचण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील, जे तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल.

मकर (Capricorn Horoscope) : आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. जर तुम्ही तुमच्या व्यवसायात काही पूर्वीच्या योजनांचा विचार करून अंमलात आणाल तर ते तुम्हाला नक्कीच नफा मिळवून देतील. वाहन वापरताना सावधगिरी बाळगावी लागेल. व्यवसाय चालवण्याचा विचार करत असाल, तर त्यात नातेवाईकांपैकी कोणाला भागीदार बनवणे टाळावे लागेल, अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत, तुम्हाला काही जुनाट आजारांचा त्रास होऊ शकतो.

कुंभ (Aquarius Horoscope) : व्यावसायिक कामात काही अनावश्यक तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुमचे मन थोडे विचलित होऊ शकते. रसिकांसाठी हा काळ उपयुक्त आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असेल, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ असाल. तुमच्या कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी-विक्रीबाबत तुम्ही काही अधिकार्‍यांशी समेटही करू शकता. जास्त धावपळ केल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल आणि तुमचा खर्चही जास्त होईल. परंतु, व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे लाभ मिळणार नाहीत. राजकारणाच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते, कारण त्यांना काही जाहीर सभा घेण्याची संधी मिळेल.

मीन (Pisces Horoscope) : विवाहित लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. जोडीदारासोबत सहलीला जाण्याची तयारी करू शकता. व्यवसाय करणाऱ्या लोकांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे ते आनंदी होतील. अनेक आर्थिक लाभ होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. व्यवसायाच्या संदर्भात चांगला काळ आहे, परिणाम तुमच्या बाजूने येईल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सर्व काही ठीक होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan discharged from hospital : चेहऱ्यावर स्मित हास्त ठेवून सैफची घरात एंट्री #abpमाझाWalmik Karad CCTV : देशमुखांच्या हत्येआधी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये भेट, कराड उपस्थित; ऑफिसबाहेरुन Exclusive आढावाSaif Ali Khan Discharged : सैफ अली खानला डिस्चार्ज, Lilavati रुग्णालयातून घरी दाखल, EXCLUSIVE दृश्येSaif Ali Khan Discharge : व्हाईट शर्ट, डोळ्यांना गॉगल; ६ दिवस उपचार घेऊन सैफ घरी परतला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Embed widget