(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 9 June 2024 : आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी प्रगतीचा; नोकरी-व्यवसायात मिळणार लाभच लाभ, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 9 June 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 9 June 2024 : पंचांगानुसार, आज 9 जून 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अभ्यासासाठी चांगला दिवस. प्रकृतीच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
त्वचा विकार असणाऱ्यांनी औषधोपचार घ्यावा. गरजेल तो पडेल काय असे आव्हान देण्याची पाळी इतरांवर येऊ देऊ नका.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मुळव्याध रक्तदाबाच्या विकारांवर पथ्य पाणी सांभाळणे आवश्यक. जसे बोलाल तसे वागण्याचा प्रयत्न करावा लागेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
तुमच्याबद्दल विश्वास संपादन करण्यासाठी त्याप्रमाणे काम करावे लागेल. एकाच वेळी अनेक कामे करताना थोडा वैचारिक बंद होण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo Horoscope Today)
धंद्यामध्ये बरेच पैसे अडकल्याने त्याबाबतीत जास्त प्रयत्न करावे लागतील यासाठी तुमची धोरणे आज थोडी बदलावी लागतील.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी आपण त्याचा सामना कसा करू शकतो हे आज जगाला दाखवून द्याल.
तुळ रास (Libra Horoscope Today)
आज शत्रूंना गारद कराल. याबाबतीत तुम्ही सरस ठरल्यामुळे कोणतेही काम विनासायास होईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
आज कामाचा उरक चांगला राहील का काम आणि वेग याचे गणित उत्तम जमवाल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
सरकारी नोकरीत प्रमोशनचे योग येतील हाडांचे विकार हृदयविकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
भाग्याची साथ लागल्यामुळे सर्व बाबतीत तुमची सरशी होईल. समाजात मानाचे स्थान मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
तुमच्या दिलदार आणि उदार वृत्तीचा अनुभव लोकांना द्याल. तुमच्यातले चांगले गुण हेरले जातील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
तुमच्या सुस्वभावी व्यक्तिमत्वा मुळे अनेक माणसे जोडली जातील. महिला दुसऱ्याला जास्तीत जास्त मदत करतील.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: