Horoscope Today 8 June 2024 : आज 'या' राशींवर राहणार शनीची कृपा; आर्थिक स्थिती सुधारणार, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 8 June 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 8 June 2024 : पंचांगानुसार, आज 8 जून 2024, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. थोड्याशा कारणावरून मानसिक स्वास्थ्य बिघडू न देण्याची काळजी घ्या.
वृषभ (Taurus Horoscope Today)
आर्थिक प्रश्न थोडे भेडसावतील, परंतु कर्जावर रक्कम मिळू शकते. रात्र थोडी आणि सोंगे फार याचा अनुभव आज घ्याल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
वाहने जपून चालवा. घरात आणि घराबाहेर संघर्ष टाळण्याची प्रवृत्ती ठेवावी लागेल.
कर्क (Cancer Horoscope Today)
भांडणाचा आवेश ठेवलात तर गोष्टी अंगलट येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्यावं लागेल.
सिंह (Leo Horoscope Today)
भावंडांशी मतभेद संभवतात. व्यवसाय-धंद्यात हाती घ्याल ते तडीस न्याल.
कन्या (Virgo Horoscope Today)
आज तुमची चिकित्सक आणि संशोधक वृत्ती कामाच्या बाबतीत उपयोगी पडेल. महिला मुलांच्या कला कलाने वागतील.
तूळ (Libra Horoscope Today)
बरेच दिवसांपासून नोकरी धंद्यामध्ये येणाऱ्या अडचणींना तोंड दिले तर, आज त्यातून सुटका मिळेल. कामे मार्गी लावाल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
घरामध्ये खूपच कमी वेळ द्याल, त्यावरून वैवाहिक जीवनात थोडे वादाचे प्रसंग उद्भवतील.
धनु (Sagittarius Horoscope Today)
कोर्ट कचेरीमध्ये समोरचा प्रतिवादी थोडा कमी पडण्याची शक्यता असल्यामुळे बऱ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील.
मकर (Capricorn Horoscope Today)
सर्व बाबतीत मनासारखे लाभ झाल्यामुळे मानसिक स्थिती चांगली राहील. कलाकारांच्या उत्तम कलाकृतींना रसिकांची दाद मिळेल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
नेत्रविकाराच्या दृष्टीने डॉक्टरी सल्ला घेणे क्रमप्राप्त ठरेल. महिला जरा जास्त धार्मिक बनतील.
मीन (Pisces Horoscope Today)
कापड धंदा, टेलरिंग व्यवसाय संबंधी निगडीत असणाऱ्यांना भरपूर काम मिळेल. मित्रपरिवाराशी मोठ्या प्रमाणात संपर्क येतील.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: